* एनी अंकिता

टीनएजमध्ये प्रामुख्याने नेहमीच होणारी चूक म्हणजे, कोणत्याही पेहरावावर कोणतीही ब्रा वापरली जाणे. तुम्ही म्हणाल, काय फरक पडतो... परंतु आपण हे जाणून घेणं आवश्यक आहे की, कोणत्या पेहरावावर कोणती ब्रा वापरली पाहिजे. जरा विचार करा, तुम्ही एक छानसा महागडा ड्रेस घातलाय आणि त्यासोबत एक जुनी साधी ब्रा घातलीय... कसे दिसेल. खरे तर तुम्हाला त्याच्या जोडीने एक पॅडेड ब्रा घातली पाहिजे. अन्यथा तुमचा लूक अट्रॅक्टिव्ह वाटणार नाहीच आणि मग आपला मूडही जाईल.

अशा वेळी आईने विचार केला पाहिजे की, तुम्ही आपल्या टीनएज मुलीसाठी जेव्हा शॉपिंगला जाल, तेव्हा त्यांच्यासाठी वेगवेगळया व्हरायटी व डिझाइन्सच्या ब्रा जरूर खरेदी करा जेणेकरून ब्राच्या फॅशनमध्ये त्या अपडेट राहातील.

टीशर्ट ब्रा : टीशर्ट ब्रामध्ये शेप देण्यासाठी हलकासा पॅड लावलेला असतो. ही आरामदायक असतेच, पण यामुळे क्लिन लूक मिळतो. खासकरून आपण जेव्हा फिटिंगचा व पातळ ड्रेस परिधान करता तेव्हा.

स्ट्रॅपलेस ब्रा : नावावरून तुम्हाला कळले असेल, यामध्ये स्ट्रॅप नसतात. जर तुम्ही स्ट्रॅपलेस ड्रेस, टँक टॉप, हॉल्टर नेकचा ड्रेस परिधान करत असाल, तर या ब्राची निवड करा. स्ट्रॅपलेस ब्रा खरेदी करताना हे जरूर लक्षात घ्या की, ब्राची साइड आणि मागची पट्टी रुंद असावी. जेणेकरून ब्रा आपल्या योग्य जागी टिकून राहून तुम्हाला योग्य फिटिंग देईल.

पुशअप ब्रा : टीनएज तरुणी विचार करतात की, त्यांना पुशअप ब्राची काय गरज आहे. परंतु आपली फिगर चांगली दिसावी, असे वाटत असेल, तर आपण ही ब्रा अवश्य वापरा. या ब्रामध्ये जेलयुक्त कप लावलेले असतात, जे ब्रेस्टला उभार देतात. ही वेगवेगळया डिझाइन्स, कलर, प्रिंट व लेसवर्कमध्ये मिळते.

वायरलेस ब्रा : ही खूप आरामदायक असते. जर तुम्हाला अंडरवायर ब्रामध्ये कंफर्टेबल वाटत नसेल, तर हे आपल्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. ही टॉप, ड्रेस, स्वॅट शर्टवर चांगली दिसते.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...