* प्रतिनिधी
तुम्ही अनेकदा डॉक्टरांकडून हे ऐकले असेल की तुमची इम्यूनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ति कमकुवत आहे. म्हणूनच तुम्ही बऱ्याचदा खोकला, सर्दी किंवा इतर आजारांना लवकर बळी पडता. आजारी पडण्याचा प्रतिकारशक्तिशी काय संबंध आहे हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल? आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की तुमची रोगप्रतिकारक शक्ति शरीराचे विविध रोगांपासून संरक्षण करते. तुमची रोगप्रतिकार शक्ति जितकी अधिक कणखर होईल तितके तुम्ही आजारी पडण्याची शक्यता कमी आहे.
हवामान कोणतेही असो, आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ति योग्य ठेवणे महत्वाचे आहे.
आपण खाल्लेल्या प्रत्येक गोष्टीचा आपल्या रोगप्रतिकारक शक्तिवर परिणाम होतो. पुढील खाद्यपदार्थ आपली रोगप्रतिकार शक्ति बळकट करतात :
बदाम : दररोज ८-१० भिजवलेले बदाम खाल्ल्याने केवळ शरीराची प्रतिकारशक्तिच वाढते असे नाही तर मेंदूला ताणतणावाशी सामोरे जाण्याची शक्तिदेखील मिळते. व्हिटॅमिन ई शरीरात नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या नैसर्गिक किलर पेशींना वाढविण्यास मदत करते, ज्या विषाणू आणि कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यास मदत करतात. बदामात आढळणारे व्हिटॅमिन ई त्वचा निरोगी बनवते तसेच सुरकुत्या पडण्याची प्रक्रिया कमी करते.
लसूण : ही मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट बनवून आपल्या रोगप्रतिकार क्षमतेला आजारांशी लढण्याचे सामर्थ्य देते. यामध्ये एलिसिन नावाचा घटक आढळतो, जो शरीराला संसर्ग आणि बॅक्टेरियांशी लढण्याची शक्ति देतो.
आंबट फळे : संत्री, लिंबू, अननस आणि ईडलिंबूसारख्या आंबट फळांमध्ये व्हिटॅमिन सी पर्याप्त प्रमाणात आढळते, ज्यामुळे सर्व प्रकारच्या संक्रमणाशी लढणाऱ्या पांढऱ्या रक्त पेशी तयार होण्यास मदत होते. या फळांच्या सेवनाने तयार झालेल्या अँटीबॉडीज पेशींच्या पृष्ठभागावर एक कोटिंग बनवतात, ज्यामुळे विषाणू शरीरात प्रवेश करू शकत नाही. यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन सीमुळे एलडीएल म्हणजेच शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढते, जे कार्डियो व्हॅस्क्युलर रोगांपासून संरक्षण करते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवते. म्हणून आपल्या दैनंदिन आहारामध्ये काही आंबट फळांचा समावेश अवश्य करा.
पालक : पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या या पालेभाजीला सुपर फूड म्हणून ओळखले जाते. यामध्ये फोलेट नावाचा घटक आढळतो, जो शरीरात नवीन पेशी तयार करण्याबरोबरच त्या पेशींमध्ये असलेल्या डीएनएची दुरुस्ती करण्याचेही काम करतो. यामध्ये असलेले फायबर लोह, अँटिऑक्सिडेंट घटक आणि व्हिटॅमिन सी शरीराला सर्व प्रकारे निरोगी ठेवतात. उकडलेल्या पालक भाजीच्या सेवनाने पचनयंत्रणा योग्यरित्या कार्य करते.
मशरूम : यामुळे शरीराची रोग प्रतिकारकशक्ति वाढते. हे पांढऱ्या रक्त पेशी सक्रिय करण्यात मदत करते. यात सेलेनियम नावाचे मिनरल, अँटीऑक्सिडेंट घटक, व्हिटॅमिन बी आणि नाइसिन नावाची खनिजे आढळतात. यांमुळे मशरूममध्ये अँटीव्हायरल, अँटीबॅक्टेरिअल आणि अँटीट्यूमर घटक आढळतात. शिटाके, मिटाके और रेशी नावाच्या मशरूमच्या प्रजातीमध्ये शरीराची रोग प्रतिकारशक्ती बळकट करणारे घटक पुरेशा प्रमाणात आढळतात.
ब्रोकोली : यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी व्यतिरिक्त ग्लूटाथिओन नावाचा एक अँटीऑक्सिडेंट घटकदेखील आढळून येतो. ही एक अशी भाजी आहे जी रोगप्रतिकार शक्ति बळकट करते, ज्याचा वापर तुम्ही दररोजच्या आहारात सहजपणे करू शकता. थोडयाशा पनीरमध्ये वाफवलेल्या ब्रोकोलीचे मिश्रण करून एक चविष्ट कोशिंबीर तयार केली जाऊ शकते, ज्याच्या सेवनामुळे शरीराला पुरेशा प्रमाणात प्रोटीन आणि कॅल्शियम देखील मिळते.
लाल शिमला मिरची : ही भोजनाचा स्वाद तर वाढवतेच, तसेच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. यात व्हिटनि सी पुरेशा प्रमाणात असते, जे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट असते. लाल शिमला मिरचीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन बी ६ असते.