* शैलेंद्र सिंह

प्रेमाच्या पार्टीत महिलांनी एकाहून एक उत्तम डिझायनर ड्रेस घातले होते. रेखा तिथे पोचल्यावर प्रत्येकाची नजर तिच्यावर खिळली होती. रेखाने ब्लॅक वेस्टर्न ट्राऊजरवर अतिशय ग्लॅमरस टॉप घातला होता. रेशमच्या सुंदर चमकत्या स्कार्फने टॉप जोडलेला होता. केसांना सोनेरी रंगही लावण्यात आला होता. या सर्वांमध्ये तिचा सुवर्ण ब्रोच खूप चांगला दिसत होता. एका आवाजात सर्व जणी म्हणाल्या की आजच्या पार्टीची राणी तर रेखा आहे.

खरं तर, रेखाला पार्टी क्वीन बनविण्यात सुंदर ब्रोचने सर्वात महत्वाची भूमिका बजावली, जो तिला इतरांपेक्षा खूप वेगळी बनवित होता.

प्रत्येक पार्टीत हिट ब्रोच

ब्रोचचा ट्रेंड नवीन नाही. साडीच्या पल्लूवर ब्रोच आधीही वापरला जात असे. साडीचा पल्लू इकडे-तिकडे होऊ नये म्हणून ब्रोचच्या मदतीने साडी उडण्यास रोकले जाई. फॅशनच्या बदलत्या शैलीमुळे ब्रोचचा वापर सलवार सूटवरदेखील होऊ लागला. सलवार-सुटवर घालण्यात येणाऱ्या दुप्पटयांना ब्रोचद्वारे रोकले जाई. यास लावल्याने सलवारसुट्समध्ये ट्रेंडी लुक येतो. आता तो पार्टीत घालण्यात येणाऱ्या वेस्टर्न ड्रेसमध्येही वापरला जात आहे. पूर्वी ब्रोचची रचना फारशी खास नव्हती. फॅशनच्या ट्रेंडसह याच्या डिझाईन्सदेखील बदलल्या. याच बदलाने ब्रोचला पुन्हा फॅशनच्या नव्या ट्रेंडवर आणले आहे.

फॅशन अँड ज्वेलरी डिझायनर नेहा दीप्ती म्हणतात की ब्रोच वापरुन साध्या फॅशनलाही ट्रेंडी लुक देता येईल. हे परिधान करणाऱचे व्यक्तिमत्वदेखील एका वेगळया प्रकारे सादर करते. बऱ्याच स्त्रिया ब्रोचला ज्वेलरी मानतात. त्यांना सोने, चांदी आणि डायमंडमध्येच यास बनविणे आवडते. हे खूप महाग असते. परंतु ज्यांना यावर जास्त खर्च करायचा नाही, त्या कृत्रिम ब्रोचचा म्हणजे अॅल्युमिनियम, पितळ, तांबे आणि स्टीलने बनवलेल्या ब्रोचचा वापर करतात.

विविध प्रकारचे ब्रोच

बदलत्या फॅशनच्या शैलीत स्थान मिळवल्यानंतर ब्रोचची शैलीदेखील बदलली आहे. आज बाजारात वेगवेगळया प्रकारचे ब्रोच उपलब्ध आहेत. यापैकी, सर्वात जास्त पसंत करण्यात येणाऱ्या डिझाईन्स म्हणजे बटरफ्लाय आणि फ्लॉवर शेप. काही फॅशनेबल महिलांना अॅनिमलशेपदेखील आवडतात. काही त्यांच्या आद्याक्षरांचे ब्रोचदेखील वापरतात.

बाजारात हँगिंग ब्रोचदेखील खूप विकले जातात. आपल्या ड्रेसशी जुळणारा ब्रोच घालण्यासाठी महिलांनी फॅब्रिकपासून बनविलेला ब्रोचसुद्धा घालायला सुरुवात केली आहे. त्यांची खास गोष्ट म्हणजे ते ड्रेसशी जुळतात. फॅशनमध्ये ही अँटिक लुक देणाऱ्या महिलांना अँटीक ब्रोच खूप आवडतात. त्यांना सजवण्यासाठी स्टोन्सचा वापर केला जातो. ते खूप रंगीबेरंगीदेखील असतात.

याशिवाय लाकूड, प्लास्टिक आणि मोतींपासून बनवलेले ब्रोचसुद्धा चांगले दिसतात. ब्रोचचे मार्केट खूप मोठे आहे. सर्व प्रकारच्या पोशाखांवर घालण्यासाठी कमीतकमी किंमतीतही ब्रोच उपलब्ध आहेत. ही किंमत २०० ते १,२०० रुपयांपर्यंत असू शकते. चांदी, सोने व प्लॅटिनमचे बनलेले ब्रोचेस किंमतीत वेगवेगळे असतात. आजकाल सोन्याचे प्लेटेट ब्रोच जास्त पसंत केले जात आहेत.

एक ब्रोच खरेदी करताना आपण त्यास कोणत्या प्रकारच्या ड्रेसबरोबर घालायचे आहे याची खूप काळजी घेतली पाहिजे. कधीकधी मोठा आणि भडक दिसणारा ब्रोच चांगला दिसत नाही.

ब्रोच खरेदी करताना हेदेखील पाहिले पाहिजे की तो असा असावा, ज्यामध्ये कापड अडकणार नाही. मोती आणि स्टोन्सचे ब्रोचेस खरेदी करताना, ते बाहेर पडणारे नसावेत हे पहा, कारण अधिक स्टोन्स आणि मोती असलेल्या ब्रोचेसमध्ये त्यांचे बाहेर पडण्याचा धोका जास्त असतो.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...