* नम्रता विजय पवार
- पंचामृत
यादिवशी कडुलिंबाच्या नवीन मोहराचा वापर जेवणात करतात. म्हणजेच कुठल्यातरी पदार्थात शास्त्रापुरती ही फुलं घालायची. पंचामृत हे एक आंबट, तिखट, गोड असं तोंडीलावणं आहे.
साहित्य
- 5-6 हिरव्या मिरच्यांचे तुकडे
- अर्धी वाटी दाण्याचं कूट
- अर्धी वाटी तिळाचं कूट
- अर्धी वाटी चिंचेचा कोळ
- अर्धी वाटी किसलेला गूळ
- पाव वाटी ओल्या खोब-याच्या कातळ्या
- ७-८ कढीपत्त्याची पानं
- मोहरी-हिंग-हळद
- १ टेबलस्पून तेल
- मीठ आणि २ टीस्पून काळा मसाला.
कृती
एका कढईत तेल गरम करून नेहमीसारखी मोहरी-हिंग-हळद अशी फोडणी करा. त्यात कढीपत्ता आणि मिरच्यांचे तुकडे घाला. जरासं परतून त्यात चिंचेचा कोळ आणि गूळ घाला. गूळ वितळून हे सगळं एकजीव झालं की त्यात खोब-याच्या कातळ्या घाला. एक कपभर पाणी घाला. चांगली उकळी आली की मीठ, काळा मसाला, दाण्याचं आणि तिळाचं कूट घाला. नीट हलवून घ्या. जितपत घट्ट-पातळ हवं असेल तितकं पाण्याचं प्रमाण वाढवा. मंद गॅसवर पाच मिनिटं उकळा. गॅस बंद करा. यामध्ये कडुलिंबाची फुले घाला.
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...
गृहशोभा से और