* अमरजीत साहिवाल
‘हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना,’ तू माझ्या रोमारोमांत वसतोस आणि म्हणूनच मी जगत आहे, ‘तू एक शब्द असेल ज्याचा अर्थ आहे आनंद,’ ‘तुला काय सांगू, तू माझा आधार आहेस, तुझ्या प्रेमातच माझं अस्तित्त्व आहे…’
जसजसा फेब्रुवारी महिना जवळ येऊ लागतो, प्रेमी जोडपी आपल्या जोडीदाराला व्हॅलेंटाइनच्या भेटवस्तूवर काहीशा अशाच ओळी लिहून देत असतात. कारण त्यांच्यासाठी तर हे दिवस आनंद, आशा आणि उमेद घेऊन येत असतात.
मग या तुम्हीदेखील थोडे रोमॅण्टिक होऊन हे जाणून घ्या की व्हॅलेंटाइन डे नक्की काय आहे, ज्याने भारताच्या धरतीवर हळुवारपणे पाऊल टाकून मग हळूहळू सर्व तरुणांना आपल्या मोहपाशात घेतलं.
हा उत्सव साजरा करण्याची पद्धत आणि रीतिभाती फारच रोमांचक आणि विलक्षण होत्या. इतिहासाची पानं उलटली तर म्हटलं जातं की व्हॅलेंटाइन डे, हा एका अशा माणसाच्या बलिदानाचा दिवस आहे ज्याने प्रेम केलं आणि प्रेम करणाऱ्यांना एका पवित्र बंधनामध्ये बांधण्याचा प्रयत्न केला. त्याच्या काळात क्लोडियम हा रोमचा शासक होता जो खूपच क्रूर आणि कडक स्वभावाचा होता. त्याने आपल्या शासनकाळात सर्व शिपायांवर असं बंधन टाकलं होतं की कोणी आपल्या प्रेयसीला भेटणारही नाही आणि लग्नही करणार नाही. पण व्हॅलेंटाइनने राजाच्या मर्जीच्या विरुद्ध प्रेमी जोडप्यांचं लपूनछपून लग्न लावलं आणि प्रेम करणाऱ्यांचं मीलन करून दिलं किंवा असं म्हटलं तरी चालेल की तो प्रेमाचा देवता झाला. मात्र क्लोडियमला हे सगळं सहन झालं नाही आणि त्याने व्हॅलेंटाइनला मृत्युदंड दिला. ही गोष्ट १४ फेब्रुवारी, ईसवी सन् २६९ची आहे.
व्हॅलेंटाइनची एक मैत्रीण होती जी जेलरची मुलगी होती, तिला मृत्युपूर्वी व्हॅलेंटाइनने एक पत्र लिहिलं होतं. त्यानंतरपासून दरवर्षी १४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाइनच्या स्मृत्यार्थ साजरा केला जात आहे आणि त्याला नाव दिलंय व्हॅलेंटाइन डे.
सुरुवातीला या दिवशी लोक प्रेमपूर्ण पत्र लिहायचे पण नंतर आपल्या प्रियजनाला पत्रासोबत भेटवस्तू देण्याचंही चलन सुरू झालं आणि आज तर बाजार याच्याशी निगडित भेटवस्तूंनी भरून गेला आहे.
मग या जाणून घेऊया यावेळी कोणत्या खास भेटवस्तू दिल्या जातात आणि त्यांचं काय महत्त्व आहे.
गुलाब : प्रेम व्यक्त करण्याची सर्वात उत्तम पद्धत आहे लाल गुलाब. पण ही गोष्टदेखील लक्षात ठेवा की प्रेमीजनांना दिल्या जाणाऱ्या गुलाबांची संख्याही काहीतरी सांगते. जसं की प्रेम व्यक्त करण्यासाठी एकच गुलाब पुरेसं आहे. जर आभार मानत असाल तर अभिनंदनासाठी २५ आणि विना अटीच्या प्रेमासाठी ५० गुलाबांचा सुवासिक फुलांचा गुच्छ योग्य ठरतो. बस्स, अट ही आहे की, ते तुम्ही लव्हर्स नॉटमध्ये बांधून द्या.
हृदय/हार्ट : व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी बाजारात असंख्य गुलाब तर मिळतातच शिवाय हृदयाच्या आकाराचे वेगवेगळ्या प्रकारचे कार्ड्स आणि गिफ्ट आयटमही पाहायला मिळतात. पूर्वी कामदेवाच्या तीरद्वारे बांधलेलं हृदय रतिसाठी प्रेमाच्या अभिव्यक्तचं फार सुंदर माध्यम होतं. प्रेम करणाऱ्यांना व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी हृदयाच्या शेपमध्ये बनलेले कार्ड्स आणि शोपीस, टेडी बियर, पाउच, इअररिंग्स, रिंग्स, ज्वेलरी बॉक्स, सिरॅमिक कॉफी मग, कुशन कव्हर, पिलो कव्हर आणि शोपीस मिळतील.
कबूतराचं जोडपं : ‘तुझ्याविना मी जगू शकणार नाही,’ ‘तुझ्यापासून दुरावण्यापूर्वी मला मरण यावं,’ अशा प्रकारचे प्रेमपूर्ण संवाद प्रेमीजन कायम एकमेकांना बोलत राहातात. कदाचित हे फारच कमी लोकांना माहीत असेल की नर आणि मादी कबूतर अशाच प्रेमाची साक्ष असतात, की त्यांच्यापैकी कोणाही एकाचा मृत्यू झाला तर दुसरा नवीन साथीदाराचा शोध घेत नाही. प्रेम म्हणजे समर्पण असतं. प्रेम आणि त्याच्या प्रती संपूर्ण आस्था दर्शवण्यासाठी शॉपिंग मॉल्स आणि गिफ्ट शॉप्समध्ये अशा कबूतरांची जोडपी असलेले वेगवेगळ्या मुद्रेचे गिफ्ट आयटमही पाहायला मिळतात.
मॅपल लीफ : कॅनडा येथील राष्ट्रीय वृक्ष मॅपल ट्रीची पानं आजही जपानी आणि चीनी सभ्यतेमध्ये प्रेमाला प्रतिबिंबित करतात. ही पानं गोड असतात. कदाचित म्हणूनच असं म्हटलं जातं. अमेरिकेत अनेक प्रेमी जोडपी खरं प्रेम मिळवण्यासाठी आपल्या बेडखाली जमिनीवर मॅपलची पानं ठेवतात. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी मॅपल पानं असलेले अनेक कार्ड्स पाहायला मिळतील. त्यावर काही रोमॅण्टिक शेर लिहिलेले असतात किंवा तीरद्वारे बांधलेलं हृदय असतं.
ट्यूलिप फ्लॉवर : कुठेकुठे लग्नाच्या अकराव्या वाढदिवसाचं प्रतीक ट्यूलिप फ्लॉवरला मानतात. ट्यूलिप फ्लॉवरच्या मधोमध असलेल्या काळ्या मखमली भागाला प्रियकराचं हृदय समजलं जातं. प्रेमीजनांची पहिली पसंत समजलं जाणारं ट्यूलिप फूल प्रसिद्ध प्रेमी जोडपं शीरीफरहादच्या प्रेमाचं प्रतीक समजलं जातं. असं सांगतात फरहाद जो तुर्कीचा रहिवासी होता तो शीरीवर अतिशय प्रेम करायचा. जेव्हा फरहादला कळलं की शीरी या जगात राहिली नाही तेव्हा तो वेड्यासारखा डोंगराच्या शिखरावर चढला आणि प्रेमात वेडा होऊन त्या शिखरावरून त्याने उडी मारली. मग जिथे जिथे त्याच्या रक्ताचे थेंब पडले, तिथे तिथे लाल ट्यूलिपची फुलं उमलली. बस्स, तेव्हापासून हे प्रेमात पडलेल्या प्रेमीजनांसाठी प्रेमाचं प्रतीक बनलं.
व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी प्रेमी जोडपी प्रेमात जगण्यामरण्यासाठी ट्यूलिप भेट करतात.
डायमंड/हिरा : प्रेम व्यक्त करण्यासाठी हिऱ्यापेक्षा उत्तम भेट काय असू शकते. प्रेम हे अमर असतं. हे व्यक्त करण्यासाठी हिरा एक अनुपम भेट आहे. ग्रीक संस्कृतीत तर हिऱ्यांना देवतांचे ओघळलेले अश्रू समजलं जातं. रोमन संस्कृतीत याला आकाशातून तुटलेला तारा म्हटलं जातं.
दुकानदार अशा प्रकारच्या भ्रामक समजुतींना अधिकच उत्तेजन देतात. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी दागिन्यांच्या दुकानांवर भेट देण्यासाठी हिरा घेणाऱ्यांच्या रांगा लागलेल्या असतात. असंही म्हटलं जातं की जो हिरा घालतो त्याच्या वागणुकीत एक स्थैर्य आणि संतुलन झळकतं. प्रेयसीला इम्प्रेस करण्याचा उत्तम दिवस आहे व्हॅलेंटाइन डे आणि उत्तम भेटवस्तू आहे हिरा.
हार्टशेपच्या भेटवस्तू : प्रेम व्यक्त करण्याची आणखीन एक पद्धत म्हणजे हृदयाचा आकार असलेली कोणतीही भेटवस्तू देणं. हृदयांपासून हृदयाची गोष्ट बोला. बाजारात रेशीम किंवा वेलव्हेट कपड्यांपासून बनलेल्या हृदयाच्या आकाराचे लहानमोठे गिफ्ट बॉक्स किंवा डब्या मिळतात. बाजारातून घ्यायचं नसेल तर आपल्या कल्पनेला उंच भरारी द्या आणि मनापासून साजरा करा व्हॅलेंटाइन डे…