* सोमा घोष

सुभाष आणि स्नेहाचं लग्न होऊन ८ वर्षं झाली. त्यांच्या जीवनात असे अनेक प्रसंग आले की, ज्यावेळी त्यांनी एकमेकांना अनपेक्षितपणे भेटवस्तू देऊन आश्चर्यचकित केलं होतं. ते दिवस अजूनही त्यांना आठवतात. सुभाषला तो दिवस अजून आठवतो, ज्यावेळी त्याच्याजवळ त्याच्या नातेवाइकाच्या लग्नाला जाण्यासाठी नवे कपडे घेण्यासाठी पैसे नव्हते. सुभाषने निराश होऊन जुने कपडेच घालून जाण्याचं मनात ठरविलं होतं. परंतु लग्नाचा दिवस जवळ आल्यावर स्नेहाने आपल्या जमवलेल्या पैशांतून त्याच्यासाठी नवे कपडे खरेदी केले व त्याला भेट दिले. हे सुभाषला अनपेक्षित होतं व ही गोष्ट आजही आठवल्यानंतर सुभाषच्या डोळ्यांत पाणी येतं. अशी अनपेक्षित भेटवस्तू परस्परांतील प्रेम द्विगुणित करते. भेटवस्तू देणाऱ्यात व घेणाऱ्यात एक प्रकारचा नवा उत्साह संचारतो आणि एकमेकांतील स्नेहबंध अधिकच दृढ बनतात.

भेटवस्तू देणंघेणं

भेटवस्तू देण्याघेण्यामुळे आपल्या जीवनात अधिक आनंद येतो. आपापसांतील नाती दृढ होण्यामध्ये तिची प्रमुख भूमिका असते. भेटवस्तू एकमेकांविषयीचं प्रेम, आदर व सद्भावना व्यक्त करतात. त्यातसुद्धा जर अनपेक्षित भेटवस्तू मिळाली तर मिळणाऱ्या आनंदाचं वर्णन काय करावं? कारण यामुळे व्यक्तिला अपूर्व सुख मिळतं. रंगमंचांवर काम करणारी मंजुळा म्हणते, ‘‘माझ्या पतीकडून मला नेहमीच अनपेक्षित भेटवस्तू मिळाली आहे, जिचं मोल माझ्या दृष्टीने खूपच अधिक आहे. कारण यावरूनच त्यांची माझ्याविषयीची आत्मीयता दिसून येते.’’

तुम्हाला तुमचा पती जर अनपेक्षित भेटवस्तू देत असेल तर त्याचा अर्थ स्पष्ट आहे की, तुम्ही तुमच्या पतीला मनापासून आवडता.

उद्योजिका लीना सांगते, ‘‘लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला मला माझ्या पतीने ज्वेलरीच्या दुकानात नेऊन एक सोन्याचं ब्रेसलेट खरेदी केलं, पण त्याची ऑर्डर त्यांनी आधीच नोंदविली होती. त्यावेळी मी आश्चर्यचकित झाले. मला असं वाटतं की, अनपेक्षित भेटवस्तू देऊन तुम्ही आपल्या रागावलेल्या जोडीदाराला मनवू शकता किंवा जोडीदाराचा गैरसमजही दूर करू शकता.

भेटवस्तू निवडताना

एका पाहाणीत दिसून आलं की, अनपेक्षित भेटवस्तू केवळ एक साधी वस्तू नसते, तर तुमच्याबद्दल वाटणाऱ्या आत्मीयतेचं ते प्रतीक असतं. परंतु तुम्ही जेव्हा जोडीदाराला अनपेक्षित भेटवस्तू द्याल त्यावेळी पक्कं लक्षात घ्या की, ती वस्तू त्याच्या उपयोगाची आहे की नाही व तुम्हा दोघांची अधिक जवळीक त्याने साधेल की नाही?

काही वेळेला अगदी विचार करून दिलेली वस्तूसुद्धा त्यावेळी तुमच्या जोडीदारास जरुरीची वाटत नाही अथवा त्याला ती तितकीशी पसंत पडत नाही. अशा वेळी तुमचे पैसेही अनाठायी खर्च होतात व जोडीदारास वस्तूही आवडत नाही. यासाठी जोडीदाराच्या आवडीनिवडीकडे नीट लक्ष द्या.

अनपेक्षित भेटवस्तूमध्ये किमतीला तितकंसं महत्त्व नसतं. फक्त प्रेम व आत्मीयतेला महत्त्व असतं म्हणून गिफ्ट खरेदी करणाऱ्याला गिफ्ट घेताना पूर्ण उत्साहाने खरेदी करावी लागते आणि हेसुद्धा दर्शवायला हवं की ही भेटवस्तू त्याच्या दृष्टीने कशी अनमोल आहे.

एका कंपनीत काम करणाऱ्या पूनमला तिचा पती ती प्रत्येक वेळी रागावल्यानंतर अनपेक्षित भेटवस्तू देऊनच खूष करतो.

भेटवस्तू अनमोल आहे हेच खरं. पण कोणती भेटवस्तू व त्याची निवड कशा तऱ्हेने करावी हे जाणून घ्यायला हवं. जेव्हा तुम्ही एखादी भेटवस्तू जोडीदाराला देता तेव्हा त्याची प्रतिक्रिया तुम्हाला लगेचच दिसून येते. यामुळे आपला जोडीदार पती असो अथवा पत्नी तिची अथवा त्याची पसंती वा नापसंती जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे व त्यानुसारच भेटवस्तूची निवड केली पाहिजे.

काही अनपेक्षित भेटवस्तू

* फोटो अल्बम : जोडीदाराच्या बालपणीच्या फोटोंसह, मित्रमैत्रिणींबरोबरचे फोटो (एखाद्या घटनेशी संबंधित) अशा तऱ्हेने एकत्र केलेले फोटो लावलेला अल्बम.

* ग्रीटिंग कार्ड : जे तुम्ही स्वत: बनवलेलं अथवा खरेदी केलेलं असेल. त्यामध्ये चांगलं चित्रसुद्धा तुम्ही लावू शकता.

* सोन्याचांदीच्या वस्तू तर सर्वांनाच आवडतात. परंतु जोडीदाराच्या आवडीनिवडीकडे विशेष लक्ष पुरवून त्यांची खरेदी करावी.

* प्रवासाचं ट्रॅव्हल वाउचर.

* जरुरीचं सामान, रेसिपी बुक, पुस्तकं, घरसजावटीच्या वस्तू किंवा काही अशा वस्तू ज्याची अपेक्षा तुमच्या जोडीदाराने कधीच केली नसेल. सरळच आहे की, त्यायोगे तो अगदी संतुष्ट होईल व त्याचा अंशत: फायदा तुम्हालाही मिळेल.

जेव्हा भेटवस्तू द्यायची असेल

* एखादं नवपरिणीत जोडपं एखाद्या नव्या शहरात जाणार असेल तर त्यांना त्यांच्या नव्या घरासाठी उपयुक्त वस्तू जशा की, टीव्ही, फ्रिज, मायक्रोवेव, इस्त्री, फूड प्रोसेसर याप्रमाणे गृहोपयोगी उपकरणं भेटवस्तू म्हणून देऊ शकता.

* फर्नीचरसुद्धा एक उत्तम भेटवस्तू होऊ शकते. त्यांच्या घरासाठी डायनिंग सेट, सोफा सेट इत्यादी सामान देऊ शकता. त्यांचं घर किती मोठं आहे याचा विचार करूनच निर्णय घ्या.

* क्रॉकरी व कटलरीसुद्धा नवदाम्पत्यांसाठी चांगल्या भेटवस्तू होऊ शकतात.

* नवदाम्पत्यांसाठी काही वेगळं म्हणून, घड्याळ, परफ्यूमसुद्धा देऊ शकता.

* याव्यतिरिक्त सजावट म्हणून काचेच्या वस्तू, अॅण्टिकपीस, ऑइलपेंटिंग, नाइट लॅम्प, फोटोफ्रेम इत्यादी भेटवस्तूंचासुद्धा तुम्ही विचार करू शकता.

* प्रवासी सामान नवदाम्पत्यांसाठी चांगली भेटवस्तू होऊ शकते. कित्येक प्रकारच्या सूटकेसेस, व्हॅनिटी केस यामधून तुम्ही निवड करू शकता.

* ब्लँकेट, ब्रेडशीट इत्यादी वस्तूसुद्धा भेट म्हणून देऊ शकता. हवामानानुसार या वस्तूसुद्धा योग्य वेळी देऊ शकता.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...