* गरिमा
जरी एखाद्या स्त्रीच्या सौंदर्याचे मोजमाप गोऱ्या रंगावरून केले जात असले, तरी आजच्या युगात रंगापेक्षा फॅशन, स्मार्टनेस, आत्मविश्वास आणि मेकअपची शैली यांना जास्त महत्व दिले जाते. जर तुमच्या त्वचेचा पोत सावळेपणाकडे झाकणारा असेल, तर तुम्ही आपले अन्य पैलू सक्षम करा. सावळया रंगांबाबत आपल्या मनातील वैषम्य दूर करा आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार द्या.
बना स्मार्ट आणि कॉन्फिडंट
धीट बना : आपल्या व्यक्तिमत्वात धीटपणा आणि स्मार्टनेस आणा. कोणत्याही स्पर्धेत भाग घेताना माघार घेऊ नका. आव्हानं स्वीकारा. कोपऱ्यात लपलेली दबलेली मुलगी बनण्यापेक्षा नेहमी पुढे येऊन नेतृत्व करायला तयार राहा. कोणी तुम्हाला पुढे या आणि हे करा असे म्हणणार नाही. स्वत:ची पात्रता आपली आपणच सिद्ध करावी लागेल जेणेकरून प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी लोक तुमच्याकडेच पाहतील.
नजरेला नजर भिडवून बोला : कोणाशीही बोलताना नजरेला नजर भिडवून बोला. इकडे तिकडे बघत बोलणाऱ्यांवर कोणी विश्वास ठेवत नाही आणि खाली नजर खिळवणारे नेहमी मागे पडतात. संपूर्ण आत्मविश्वासाने नजर समोर ठेवून बोलायचा सराव करा.
दुसऱ्याशी आपली तुलना करू नका : दुसऱ्याशी आपली तुलना करण्याची सवय असेल, तुमचा विश्वास डळमळू शकतो. समोरचा तुमच्यापेक्षा हुशार आहे असा विचार करण्याऐवजी आपल्यातील गुणवत्तेचा विचार करा. स्वत:ला कधीच कमी समजू नका. यशस्वी होणारच असा विश्वास बाळगून काम करता राहा.
भीतीवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करा : घाबरत राहण्यापेक्षा ज्या गोष्टीची भीती वाटते ती पुन्हा पुन्हा करून भीतिला पळवून लावणे आवश्यक आहे. काही लोकांना स्टेजवर जायची भीती वाटते, काहींना पोहण्याची, काहींना उंचीची, काहींना एकटा प्रवास करण्याची तर काहींना प्रेझेंटेशन देण्याची भीती वाटते. तुम्ही तुमच्या भीतिवर विजय मिळवा. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही बोल्ड आणि कॉन्फिडंट दिसाल.
आपल्या बलस्थानांवर लक्ष केंद्रित करा : जीवनाने सगळयांनाच काहीतरी खास देऊ केले आहे. कोणी सुंदर असते, कोणी छान गाते, कोणाची तार्किक क्षमता चांगली असते, कोणी नृत्य छान करते, तर कोणी छान लिहिते. तुमचा रंग सावळा आहे असा न्यूनगंड मनात येऊ देण्यापेक्षा आपल्यातील अन्य गुणांना आकार द्या. जी गुणवत्ता तुमच्यात आहे ती इतर कोणात असू शकत नाही. आपला स्मार्टनेस, क्षमता आणि चांगली वागणूक यामुळे तुम्ही इतरांच्या नजरेत भरता.
मनातून सुंदरतेचा अनुभव करा : तुम्ही सुंदर आणि स्मार्ट तेव्हाच दिसाल जेव्हा सुंदरता अनुभवाल. मनात दु:ख, न्यूनगंड, संताप, मत्सर अशा भावना वरचढ ठरतील तर त्या चेहऱ्यावर दिसून येतील, कारण मनस्थितीचा संबंध त्वचेच्या तेजाशी असतो. जर सावळी त्वचा चमकदार आणि निरोगी असेल तर ती गोऱ्या पण मुरमांनी भरलेल्या त्वचेपेक्षा जास्त छान दिसते.
भूतकाळातील स्मृती आठवा : तुम्हाला जीवनात जेव्हा केव्हा यश मिळाले होते, ते क्षण आठवून मनात नेहमी उत्साह, सकारात्मकता आणि स्फूर्ती कायम ठेवा. आपल्या आत नेहमी आत्मविश्वासाचा दिवा तेवत ठेवा.
अशा दिसा स्टायलिश
कपडे परिधान करण्याचे तारतम्य : व्यक्तिमत्वाला आकर्षक बनवण्यात वेशभूषेचे महत्वाचे योगदान असते. कपडयाचा रंग, पॅटर्न, फॅब्रिक आणि स्टाईल अशी असावी जी तुमच्यावर शोभेल आणि स्मार्ट लुक देईल. स्वत:साठी कपडे निवडताना काही विशेष गोष्टींकडे लक्ष ठेवा. जसे चमकदार रंगाचा वापर करू नका. पिवळा, नारिंगी, नियॉन यासारखे रंग टाळा. असे भडक रंग सावळया रंगावर चांगले दिसत नाही. फिकट आणि त्वचेच्या टोनशी जुळणारे रंग तुमच्यावर जास्त खुलून दिसतील. तुम्ही प्लम, ब्राऊन, फिकट गुलाबी, लाल यासारखे रंग वापरून पाहू शकता.
फॉर्मल लुकबाबत म्हणायचे झाले तर बेज कलरचा साधा आखूड ड्रेस परिधान करू शकता, ज्यावर थोडेफार प्रिंट केले असेल. अशा आखूड ड्रेससोबत हाय हिल्स, सुंदर घडयाळ आणि कोट परिधान करुन तुम्ही ऑफिस लुक कॅरी करू शकता. सेल्मन पिंक कलरचे प्रॉपर फॉर्मल आऊटफिट खूपच सुंदर दिसेल.
सावळया सौंदर्यासाठी ड्रेसिंग स्टाईल
फॅशन डिझायनर, अशिमा शर्मा यांच्या मते जर तुम्ही सावळ्या रंगाच्या असाल तर तुम्ही या गोष्टींकडे अवश्य लक्ष द्या :
* तुम्ही डेनिमचे कपडे वापरा. जसे डेनिम जीन्स, प्लाझो, डेनिम शर्ट इत्यादी. हे सगळे कॉम्बो सुंदर दिसतील.
* तुम्ही तुमच्या ड्रेसच्या फॅब्रिकसोबत निरनिराळे कॉम्बिनेशन्स करूनही सुरेख लुक मिळवू शकता. जर तुम्ही एक काळया रंगाचा आखूड ड्रेस परिधान केला आहे आणि त्यात नेट, सिफॉन यासाखे कापड असेल हे तुमच्या लुकचे सौंदर्य वाढवण्यात मदत करेल.
* ब्लिंगी गोल्ड तुमच्यासाठी अतिशय सुंदर ठरू शकेल. जर तुम्हाला गाउन परिधान करायला आवडत असेल तर लाल रंगाचा फ्लोर लेन्थ गाउन परिधान करू शकता. ऑफ शोल्डर, शोल्डरलेस, सिंगल शोल्डर गाऊन तुमच्यावर छान शोभतील. यावर आपले केस स्ट्रेट ठेवा.
* जर फॉर्मल्सबाबत बोलायचे झाले तर तुमच्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत, जे तुम्ही ऑफिसमध्ये घालून जाऊ शकता. हाय वेस्ट जीन्स तुम्ही सॉलिड ट्विस्ट टॉप सोबत वापरू शकता. अशाप्रकारच्या लुकसाठी तुम्ही तुमचे केस बांधून ठेवा.
* पेन्सिल स्कर्टसोबत फिकट मिंट कलरचा रूफल स्ट्रिप्ड टॉप वापरा. केस मोकळे ठेवा.
कसा असावा सावळया मुलीचा मेकअप
सुंदर दिसण्यासाठी सगळयात आवश्यक आहे निरोगी त्वचा ना की गोरा रंग. चमकत्या त्वचेसाठी तुमची जीवनशैली आणि आहार, उत्तम आरोग्य, पुरेशी झोप आणि मन:शांती आवश्यक आहे. जर त्वचा निसर्गत: चमकदार असेल तर कमीतकमी मेकअप करूनही तुम्ही आकर्षक दिसू शकता.
सादर आहे, अश्मीन मुंजालयांच्या सावळया कांतीसाठी काही मेकअप टीप्स :
* सर्वात आधी याकडे लक्ष द्या की तुमच्या चेहऱ्यावर नको असलेले केस तर नाही ना. आयब्रोज, अप्पर लीप, लोअर लीप, फोरहेड, चिकबोन यावरचे केस काढून टाका. आवश्यक असेल तर ते कन्सिल करा, जेणेकरून तुमचा लुक खुलून येईल .
* आता मेकअप सुरु करा. त्वचेच्या टोनसोबत त्वचेचा पोत लक्षात घ्या. एका चांगल्या प्रायमरने सुरुवात करा. जर त्वचेवर शुष्कता, दाग अथवा अनइवन्नेस असेल, तर ब्युटी बामचा वापर करू शकता.
* प्रायमरनंतर फाउंडेशन लावा. त्वचेचा प्रकार आणि आवश्यकतेनुसार फाउंडेशन ग्लॉसी, जेलबेस्ड, एचडी अथवा सिलिकॉन घ्या. फाउंडेशन समान टोनचेच घ्या. सावळ्या त्वचेवर थोडे जरी गोऱ्या त्वचेचे फाउंडेशन वापरले तर त्वचा चोक्ड होते आणि पांढरी वाटू लागते.
* कटुरिंगसुद्धा सावळया त्वचेच्या मेकअपमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावते. तुमच्या चेहऱ्यावरील उंचवटे हायलाईट करा आणि छिद्र असतील तर ती भरा. यामुळे त्वचा समान आणि आकर्षक दिसू लागते
* बेस, फाउंडेशन, कटूरिंग आणि ब्लशऑननंतर ओठाचा मेकअप करा. सावळया त्वचेच्या ओठांच्या मेकअपसाठी ब्राऊन, मरून, रेड आणि चेरी रेड यासारखे अर्थी कलर्स अथवा कोरल कलर्सचा वापर करा.
* डोळयांच्या मेकअपकडे जास्त लक्ष द्या, कारण सुंदर डोळे सावळया मुलींना आणखी आकर्षक लुक देतात. स्मोकी डोळयांकरिता काळा रंग वापरू नका, उलट वाईन स्मोक, ब्राऊन स्मोक, ग्रे स्मोक यासारखे पर्याय आणि कोरल रंग वापरून पहा. नकली पापण्यासुद्धा सुंदर भारतीय लुकसाठी वापरून बघू शकता.