* डॉ. पूजा राणी, आयव्हीएफ एक्सपर्ट, इंदिरा आयव्हीएफ हॉस्पिटल, रांची

प्रश्न :  माझ्या सुनेचे वय ३१ वर्षे आहे. लग्नाला ६ वर्षे झाली आहेत. मात्र, अजून ती आई बनू शकली नाही. मुलगा आणि सुनेच्या अनेक तपासण्या आणि उपचार केले, परंतु समस्या दूर झाली नाही. सून खूप उदास राहू लागली आहे. कधी-कधी कारणाशिवाय रडू लागते. कृपया सांगा काय करू?

उत्तर : कुठल्याही महिलेसाठी आई बनणे हा तिच्या जीवनातील सर्वात सुखद अनुभव असतो. अशा वेळी तुम्हाला तुमच्या सुनेची मनस्थिती समजू शकते. तुमच्या सांगण्यावरून वाटते की आई न बनल्यामुळे तुमच्या सुनेला नैराश्य आले आहे. तुम्हाला तिला या स्थितीतून बाहेर काढावे लागेल. कारण तणाव वांझपणाची समस्या आणखी वाढवतो. तणावामुळे प्रजनन तंत्रासंबंधी अनेक समस्या निर्माण होतात. जगभरात वांझपणाची ५० टक्के प्रकरणे तणाव व इतर मानसिक समस्यांमुळे होतात. तुम्ही त्यांना एखाद्या चांगल्या मानसशास्त्र तज्ज्ञाला दाखवा. तिला खूश ठेवण्याचा हर प्रकारे प्रयत्न करा. कदाचित त्यांचे आई न बनण्याचे कारण मानसिकही असू शकते.

प्रश्न : मी लठ्ठपणामुळे आधी गर्भधारणा करू शकले नव्हते. परंतु आता मी माझे वजन कमी केले आहे, तरीही गर्भधारणा करण्यात मला समस्या येत आहे. गर्भधारणा करण्यासाठी आता आयव्हीएफ हाच एकमेव उपाय राहिला आहे का?

उत्तर : लठ्ठपणामुळे गर्भधारणा करण्यात समस्या येऊ शकते. परंतु लठ्ठ महिला कधीही आई बनू शकत नाहीत, असे नाही. आता तर तुम्ही तुमचे वजनही कमी केले आहे. सर्वप्रथम एखाद्या स्त्रीरोग तज्ज्ञाला भेटून आपल्या वांझपणाचे कारण जाणून घ्या.

आयव्हीएफ वांझपणावर उपचार करण्यासाठी एकमेव उपाय नाहीए. या समस्येची अनेक कारणे असू शकतात. जेव्हा यावर योग्य प्रकारे डायग्नोसिस आणि उपचार केले जातील, तेव्हा सहजपणे गर्भधारणा करता येऊ शकते. फर्टिलिटी ट्रीटमेंटमध्ये औषधे, हार्मोन थेरपी, आययूआय सर्वात प्रभावी उपचारपद्धती आहे.

काही वेळा जीवनशैलीत बदल करूनही वांझपणाची समस्या दूर होऊ शकते. जर या सर्व प्रयत्नांनंतरही संतानसुखाची प्राप्ती झाली नाही, तर मात्र आयव्हीएफ तंत्राची मदत घेता येईल.

प्रश्न :  माझे वय ३८ वर्षे हे आणि आता माझा मेनोपॉज सुरू झाला आहे. माझ्यासाठी आयव्हीएफद्वारे गर्भधारणा होण्याची काही शक्यता आहे का?

उत्तर : मेनोपॉजसाठी ३८ वर्षे ही खूप लहान वय आहे. अशा प्रकारच्या प्रकरणात आम्ही हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतो की हा खरोखरच मेनोपॉज आहे की दुसऱ्या कुठल्या कारणामुळे मासिक पाळी बंद झाली आहे. अल्ट्रासाउंडने मेनोपॉजची पुष्टी होते. मेनोपॉजमध्ये अंडेनिर्मितीची प्रक्रिया बंद होते. त्यामुळे सहजरीत्या गर्भधारणा करणे अशक्य आहे. अशा वेळी आयव्हीएफ तंत्र गर्भधारणा करण्यात मदत करते. डोनर प्रोग्रामद्वारे दुसऱ्या एखाद्या महिलेचे अंडे घेतले जाते आणि त्यांना जोडीदाराच्या स्पर्मने फलित केले जाते. या भ्रूणाला महिलेच्या गर्भाशयात इम्प्लान्ट केले जाते.

जर दुसऱ्या एखाद्या कारणामुळे मासिक पाळी बंद झाली असेल, तर त्या कारणाचा शोध घेऊन उपचार घेऊ शकतो.

प्रश्न : मी ३३ वर्षीय गृहिणी आहे. लग्नाला १२ वर्षे झाली आहेत, पण आम्हाला अजून मूलबाळ नाही. आम्हाला आयव्हीएफद्वारे मूल हवे आहे, पण मी असे ऐकलेय की अशा प्रकारे जन्मलेल्या मुलामध्ये जन्मत:च दोष निर्माण होण्याची जास्त शक्यता असते?

उत्तर : आयव्हीएफ तंत्राद्वारे जन्म घेणाऱ्या मुलांमध्ये जन्मत:च विकृती असण्याची शक्यताही, सामान्य गर्भधारणेद्वारे जन्म घेणाऱ्या मुलांच्या तुलनेत केवळ १-२ टक्के वाढलेली असते. सामान्यत: गर्भधारणेमध्ये ही शक्यता १५ मुलांमध्ये १ अशी असते आणि आयव्हीएफमध्ये ती प्रत्येक १२ मुलांमध्ये १ अशी असते.

असिस्टिड रीप्रॉडक्टिव्ह टेक्निक्समध्ये रोज नवीन तंत्र विकसित होत आहेत. हे केवळ त्याच लोकांचीच मदत करत नाहीत, जे काही कारणामुळे संतानहिन आहेत, शिवाय आनुवंशिकरीत्या निरोगी बाळाला जन्म देण्यासही मदत करत आहे.

अशी अनेक दाम्पत्य आहेत, जी सामान्य आहेत व वांझ नाहीत. परंतु ती अशा जीन्सची संवाहक आहेत, जे एखाद्या आनुवंशिक रोगाचे कारण आहे. उदा. थॅलेसीमिया, हनटिंग्टन डिसीज, डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम इ. या प्रक्रियेमुळे अशा लोकांनाही निरोगी मूल मिळविण्यास मदत होत आहे. भ्रूण विकसित केल्यानंतर त्याची प्रयोगशाळेत तपासणी होते. केवळ तेच भ्रूण महिलेच्या गर्भामध्ये इम्प्लान्ट केले जाते, ज्यामध्ये जेनेटिकल काहीही समस्या नसते.

पूर्वी आयव्हीएफचे यश २०-४० टक्केच असे. परंतु संशोधनातून ही गोष्ट समोर आली आहे की सर्वश्रेष्ठ भ्रूणांना निवडण्याचे जे आधुनिक तंत्र आहे, ते याच्या यशाचा दर ७८ टक्के वाढवते.

प्रश्न : मी निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. माझ्या लग्नाला १० वर्षे झाली आहेत. संतानप्राप्तीसाठी सर्व प्रयत्न केले. आता आम्हाला आयव्हीएफची मदत घ्यायची इच्छा आहे. पण असे ऐकलेय की हा एक धोकादायक आणि खूप खर्चिक उपचार प्रकार आहे?

उत्तर : नाही, हा धोकादायक नाहीए, तर हा एक सुरक्षित उपचार आहे. केवळ १-२ टक्के महिलाच गंभीर ओव्हेरियन हायपर स्टीम्युलेशन सिंड्रोमच्या कारणामुळे आजारी पडतात. आयव्हीएफ तंत्राची सफलता जवळपास ४० टक्के असते. हे यश केवळ उपचार तंत्रावर नव्हे, तर महिलांचे वय, वांझपणाची कारणे, बायोलॉजिकल आणि हार्मोनल कारणांवरही अवलंबून असते.

हा महागडा उपचार आहे. परंतु गेल्या वर्षांमध्ये यावर होणाऱ्या एकूण खर्चात जास्त वाढ झालेली नाही.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...