*  सौरव कश्यप, मेकअप आर्टिस्ट, नवी दिल्ली

योग्य मेकअपसाठी त्वचेच्या रंगानुसार योग्य रंगाच्या कॉस्मेटिकची निवड करा. हे कॉस्मेट्क्सि कशाप्रकारे वापरावेत जेणेकरून तुमचे सौंदर्य अधिक खुलून येईल हे जाणून घेण्यासाठी या काही खास टीप्स :

मेकअप करण्याच्या स्टेप्स

प्रायमर, कंसीलर, फाउंडेशन, कंटूरिंग, हायलायटिंग, पापण्यांना कर्ल करणे, आयशॅडो, मस्कारा, आयब्रोज, गाल, ओठ.

वॉटरप्रूफ मेकअप

गरमीच्या दिवसांत अशाप्रकारे मेकअप केला पाहिजे की घाम आणि काहिलीमुळे तो खराब होता कामा नये. या मोसमात वॉटरप्रूफ मेकअप करणेच योग्य असते. तो केवळ तुमच्या चेहऱ्यावर अधिक काळ टिकूच राहणार नाही तर यामुळे तुम्ही फ्रेश आणि प्रेजेंटेबलही दिसाल.

कसा कराल वॉटरप्रूफ मेकअप

वॉटरप्रूफ मेकअप हा रुक्ष त्वचेवर अधिक काळ टिकून राहतो, कारण अशी त्वचा तेल शोषून घेते. मात्र तेलकट त्वचेवर तुम्ही कितीही मेकअप करा, तो ३-४ तासांपेक्षा जास्त काळ राहत नाही. उन्हाळ्यात रुक्ष त्वचेवर वॉटरप्रूफ मेकअप केल्यास काहीच प्रॉब्लेम होत नाही, पण जर त्वचा तेलकट असेल तर मेकअप करताना या काही खास गोष्टींकडे लक्ष देणे जरुरी असते :

* जर तुमची त्वचा तेलकट असेल तर मेकअप करण्याआधी त्वचेवर हीट आणि स्वेटिंग कमी करण्यासाठी बर्फ लावून घ्या.

* फाउंडेशनचा वापर कमीतकमी करा. यामुळे स्वेटिंग कमी होईल आणि मेकअपही जास्त काळ टिकून राहील.

* गरमीत फाउंडेशनऐवजी पॅन केक लावा.

* लिपस्टिक आणि आयशॅडोसाठी न्यूड शेड्सचा वापर करा. यामुळे मेकअप अधिक काळ टिकून राहील.

पार्टीसाठी मेकअप टीप्स

पार्टीसाठी फक्त ड्रेसच नाहीतर मेकअपकडेही लक्ष द्यावे लागते. पार्टीत जाताना घाईघाईत कसातरी मेकअप उरकू नका. एक मेकअप प्रॉडक्ट सुकल्यावरच दुसरे लावले पाहिजे. मेकअप करताना सर्वप्रथम प्रायमर लावला जातो. यामुळे चेहऱ्यावरचे डाग लपवले जातात. चेहऱ्यावर काही खळगे वगैरे असल्यास ते भरले जातात. मेकअपमध्ये शाइन आणि त्वचेवर ग्लो येतो.

प्रायमरनंतर कंसीलर लावावा. यामुळे चेहऱ्यातील सर्व उणीवा झाकता येतात. मेकअपला एक वेगळाच खुमार आणण्याकरता चेहऱ्यावर प्रिक्सी डस्ट स्प्रिंकल करा. भुवया आणि गालांवर अधिक स्प्रिंकल करा. मेकअप पूर्ण झाल्यावरही वेळोवेळी त्याचे टचअप करत राहा.

ऑफिससाठी मेकअप टिप्स

काही महिलांना ऑफिसमध्ये मेकअप करून जाणे पसंत नसते तर काहीजणी जरा जास्तच मेकअप करून येतात. खरंतर ऑफिसमध्ये हलकासा मेकअप करून गेल्यामुळे एकतर तुम्ही आकर्षक तर दिसालच, पण ट्रेंडीही वाटाल. सादर आहेत काही टीप्स :

* औपचारिक वातावरणात नेहमी लाइट मेकअप करावा.

* जास्त भडक लिपस्टिक लावू नका.

* आयशॅडो लावू नका, काजळ किंवा आयलाइनर लावा.

* ग्लिटर्स किंवा स्पार्कल्सचा वापर करू नका.

* चेहऱ्यावरचे डाग लपवण्यासाठी कंसीलरचा वापर करा.

लेटेस्ट ट्रेंड आहे हाय डेफिनेशन मेकअप

आजकाल हाय डेफिनेशन कॅमेऱ्यांची चलती आहे. ज्याच्या नजरेतून चेहऱ्यावरच्या छोटया छोटया डिटेल्स जसं की सूक्ष्म रेषा, सुरकुत्या, डाग इ. लपवणे शक्य नसते. त्यामुळे हाय डेफिनेशन मेकअप म्हणजेच एचडी मेकअप करणे पसंत करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.

केवळ सेलिब्रिटीजच नाही तर सर्वसाधारण महिलाही हा मेकअप करणे पसंत करू लागल्या आहेत. मार्केटमध्ये सर्व नामंकित ब्रँड्सचे एचडी मेकअप उपलब्ध आहेत. ज्यात माइका, सिलिकॉन, क्रिस्टल्स किंवा क्वार्ट्झ यापैकी काहीतरी असतेच. हे कण त्वचेच्या सोबत वरच्या स्तरावर जमतात आणि लाइटला  अतिशय सूक्ष्म किरणांच्या स्वरूपात पसरवतात. काही एचडी मेकअपमध्ये मॅटिफाईंग एजंट्स असतात, जे तेलकट त्वचेतील चमक रोखतात आणि त्वचेच्या ग्लेयरपासून रक्षण करतात. जर तुमची त्वचा स्वच्छ असेल तर लिक्विड फाउंडेशनचा वापर करा आणि जर स्किन खराब असेल तर मॅटचा वापर करा. कारण हा थोडा जाड स्तर तयार करतो.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...