– समाधान ब्यूटी एक्सपर्ट, पूजा साहनी

  • रेच काळे डाग आहेत, ज्यामुळे मी खूपच चिंतित आहे. मी अनेक उपाय केले, पण काहीच फायदा झाला नाही. चेहऱ्यावरील डाग दूर करण्याचे उपाय सांगा?

चेहऱ्यावर डाग दीर्घकाळ उन्हात राहिल्याने, दिवसभर प्रदूषणाच्या संपर्कात येण्याने आणि कधी कधी हार्मोनल बदलामुळेही होतात आणि मग दिवसेंदिवस हे डाग गडद होत जातात. पण काही उपाय करून हे हलके केले जाऊ शकतात. तुम्ही टोमॅटोचा रस कापसाने आपल्या डागांवर आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यावर धुऊन काढा. त्याचबरोबर बटाट्याच्या सालींचा रस चेहऱ्याच्या डागांवर लावल्यानेदेखील डाग हलके होतात. याशिवाय तुम्ही दही आणि बेसन किंवा लिंबू आणि मधाचा लेपही चेहऱ्यावर लावू शकता. हा लेप चेहऱ्यावर चांगल्याप्रकारे लावून सुकू द्या, मग चेहरा धुवा. हे उपाय सतत केल्याने डागही हलके होतील आणि चेहराही उजळून निघेल.

  • माझ्या चिन आणि अपरलिपवर केस आहेत, जे मला काही दिवसांच्या अंतराने थ्रेडिंग किंवा वॅक्सिंगद्वारे काढून टाकावे लागतात. पण ते पुन्हा लगेचच वाढतात आणि माझा चेहरा खराब दिसू लागतो. असा एखादा घरगुती उपाय सांगा ज्याने चिन आणि अपरलिपचे केस कायमस्वरूपी दूर होतील?

सामान्यपणे चेहऱ्यावर अधिक लव येणं हे हार्मोनल असंतुलनामुळे होत असतं. हे नको असलेले केस तुम्ही ब्यूटी ट्रीटमेंट जसं की ब्लीचिंग, वॅक्सिंग, लेझर ट्रीटमेंट किंवा हेअर रिमूवल क्रीमद्वारे काढू शकता. यामध्ये लेझर ट्रीटमेंट हा स्थायी उपाय आहे तर इतर अस्थायी उपाय आहेत. तुम्ही घरगुती उपाय म्हणून हळदीचा घट्ट लेप बनवा आणि नको असलेल्या केसांना लावा मग सुकू द्या. सुकल्यावर चोळून चोळून हळद काढा आणि मग चेहरा धुवा. असं ४-५ आठवडे सतत करा. हळद नैसर्गिक ब्लीचचं काम करते आणि हळूहळू केसांची वाढ मुळापासून संपवण्यासाठी मदत करते. अशाच प्रकारे लिंबू आणि साखरेचा लेपही चेहऱ्यावरील नको असलेले केस दूर करण्यास मदत करतो.

  • मी २२ वर्षांची तरुणी असून माझ्या सावळट रंगामुळे खूप हैराण आहे. सावळट रंगामुळे मला माझ्या व्यक्तिमत्त्वामध्ये खूप मोठा अभाव असल्यासारखं वाटतं. असा एखादा घरगुती उपाय सांगा ज्याने त्वचेच्या रंगामध्ये सुधारणा होऊ शकेल?

कोणतीही व्यक्ती सावळट व गोरी असणं हे नैसर्गिक असण्याबरोबरच आनुवंशिकही असतं, जे पूर्णपणे बदलणं कठीण आहे. सावळेपणा हा कसला अभाव वा कमी नाहीए. तसंही अलीकडे डस्की ब्यूटीचं युग आहे. पण तरीदेखील तुम्हाला हवं तर तुम्ही काही घरगुती उपाय करून आपल्या रंगामध्ये सुधारणा करू शकता. तुम्ही टोनर म्हणून कच्च्या दुधाचा वापर करा. कापसाच्या बोळ्याने चेहऱ्यावर दूध लावा आणि हळुवारपणे मसाज करा. जेव्हा दूध त्वचेमध्ये पूर्णपणे मुरून सुकेल तेव्हा चेहरा धुऊन काढा. याने त्वचेचा पोत सुधारेल. याव्यतिरिक्त पपईचा गर चेहऱ्यावर लावल्यानेदखील त्वचा उजळते. याशिवाय तुम्ही उन्हात जाणं टाळा आणि घरातून बाहेर पडतेवेळी एसपीएफयुक्त सनस्क्रीन लावा.

  • मी कॉलेजात जाणारी विद्यार्थिनी आहे. माझं केस खूपच पातळ आहेत. केस स्वस्थ आणि लांबसडक बनवण्याचा एखादा घरगुती उपाय सांगा?

केसांना स्वस्थ आणि लांबसडक बनवण्यासाठी दररोज तेल लावा. मालीश करण्यासाठी तुम्ही खोबरेल किंवा ऑलिव्ह तेलाचा वापर करू शकता. केसांवर केमिकल ट्रीटमेंट फार कमी प्रमाणात करा. या ट्रीटमेंटमुळे केस अशक्त होतात. केस स्वस्थ ठेवण्यासाठी आवळा पावडर आणि लिंबाचा रस समप्रमाणात घेऊन पेस्ट बनवा आणि केसांवर लावा. पेस्ट सुकल्यावर कोमट पाण्याने ती धुऊन काढा. याव्यतिरिक्त तुम्ही बटाट्याचा रसदेखील केसांना लावू शकता. यानेदेखील केस स्वस्थ आणि मऊसूत बनतात. बटाट्याच्या रसामध्ये व्हिटामिन एबीसी असतात जे केसांना नरीशमेंट देतात.

  • मला वॅक्सिंग केल्यानंतर त्वचेला खाज उठण्याची समस्या आहे. मी जेव्हा जेव्हा माझ्या अंडरआर्म्सना वॅक्स करते तिथे पुरळ उठतं आणि खाज सुटते. मला सांगा, असं का होतं आणि यापासून बचावण्याचे काय उपाय आहेत?

अनेक वेळा आपण जो डिओडे्रंट वापरतो, तोदेखील आपल्या अंडरआर्म्समध्ये पुरळ उठण्याचं आणि खाज सुटण्याचं कारण ठरू शकतं. तसंच वॅक्सिंगमुळेही अनेक वेळा खाज सुटते. म्हणूनच तुम्ही कायम प्रोफेशनल सलूनमधूनच वॅक्सिंग करून घ्या. वॅक्सिंग करण्यापूर्वी प्रीवॅक्स लोशन जरूर लावा. जर त्वचा जास्तच संवेदनशील असेल तर सेन्सिटिव्ह स्किन ऑइलही तुम्ही अंडरआर्म्सला लावू शकता. याने तुमची समस्या लवकरच दूर होईल.

  • पार्टीसाठी तयार होताना ब्लशर जास्त प्रमाणात लागल्यास काय करावे?

ब्लशर जास्त लागल्यास गालांवर ब्रशच्या मदतीने लूज क्लीन पावडर ब्लश लावा. जर यानेदेखील फायदा झाला नाही तर थोडीशी ट्रान्सलूशन पावडर मिसळून गालांवर ब्रश फिरवा. ब्लशर आणि ट्रान्सलूशन पावडर मिसळल्याने एक म्यूट कलर तयार होईल आणि तुमची समस्याही दूर होईल.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...