* शंकाचे निरसन ब्युटी एक्सपर्ट, इशिका तनेजा, यांच्याकडून
माझ्या डोक्यावर खूप कमी केस आहेत. ते पातळ, मऊ आणि तेलकट आहेत. स्विमिंग केल्यानंतर केस निर्जीव आणि कोरडे होतात. त्यांना निरोगी राखण्यासाठी मी काय करू? कृपया हेसुद्धा सांगा की हेअरस्टाइल करताना केसांमध्ये बाउन्स आणण्यासाठी काय केलं पाहिजे?
स्विमिंग पूलमध्ये पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी क्लोरीनचा वापर केला जातो. यामुळे केस निर्जीव आणि कोरडे बनतात. जेव्हा तुम्ही शॉम्पूने केस धुवाल तेव्हा केसाच्या टोकांना कंडीशनर नक्की लावा. केस लहानपणापासूनच पातळ असतील तर काही उपाय करणं कठीण आहे.
हवं तर काही घरगुती करू शकता. दह्यामध्ये मेथी पावडर, आवळा आणि शिकेकाई भिजवून घ्या. या मिश्रणामध्ये जेवढं पाणी आहे तेवढं तेल घालून उकळून घ्या. जेव्हा हे लिक्विड अर्ध होईल, तेव्हा ते गाळून त्याने केसांना मालिश करा. यांसह प्रथिनयुक्त आहार घ्या. याशिवाय हेअरस्टाइल करण्याआधी केसांना जेल मूज लावा. त्यानंतर सगळे केस पुढे घेऊन फ्लॅट फणीने केस विंचरा. मग केस मागे घेऊन झाडा. असं केल्याने केसांमध्ये बाउन्स येईल. स्काल्पपासून वर बोटे फिरवल्यानेही केस बाउन्सी होतात.
मी २४ वर्षांची आहे. माझ्या हाताच्या आणि मानेच्या काही भागात टॅनिंग झालं आहे. काही अँटी टॅनिंग क्रिम्स वापरून पाहिल्या. पण काहीच फरक पडला नाही. कृपया सांगा मी काय करू?
तुम्ही २० दिवसांतून एकदा ब्लिच करून घेऊ शकता. यामुळे टॅनिंग निघून जाईल आणि त्वचासुद्धा सॉफ्ट होईल. घरगुती उपाय म्हणून ओट्समध्ये पाइनअॅप्पल ज्यूस आणि स्ट्रॉबेरी पल्प मिसळून हात आणि मानेवर स्क्रब करा. पाइनअॅप्पल ज्यूसमुळे रंग उजळेल आणि स्ट्रॉबेरीमुळे त्वचा चमकेल.
माझं वय १९ वर्षं आहे. माझी त्वचा खूप तेलकट आहे. कडक ऊन असल्यावर चेहरा मेकअपनंतर एक-दोन तासांतच काळा पडू लागतो आणि चिकट होतो. कृपया काहीतरी घरगुती उपाय सांगावा?
तुम्ही मेकअपच्या फक्त वॉटरप्रुफ प्रोडक्ट्सचाच वापर करा. यामुळे मेकअप उतरणार नाही आणि चेहरा फ्रेश दिसेल. याशिवाय पर्समध्ये टू वे केक किंवा लूज पावडर टचअपसाठी ठेवू शकता. एक चमचा मुलतानी मातीमध्ये नारळ पाणी घालून ती पेस्ट चेहऱ्यावर लावा. या पॅकमुळे पोर्स बंद होतील आणि घामही येणार नाही.
माझं वय २० वर्षं आहे. माझे केस दाट आहेत, पण खूप कोरडे आणि द्विमुखी आहेत. मी हेअर स्पा आणि हेअर कटही वरचेवर करते. पण काहीच फरक पडत नाही. कृपया काहीतरी घरगुती उपचार सांगा?
केस जास्त स्ट्राँग केमिकलयुक्त शॉम्पूने धुतल्यामुळे आणि योग्य पोषण न मिळाल्याने केस द्विमुखी आणि कोरडे होतात. यासाठी तुम्ही आठवड्यातून दोनदा आवळा किंवा भृंगराज तेलाने मालिश करा. प्रत्येकवेळी केस धुतल्यावर कंडीशनर लावा आणि केसांना माइल्ड हर्बल शॉम्पूनेच धुवा. द्विमुखी केस एखाद्या ब्यूटीपार्लमध्ये जाऊन कापून घ्या. द्विमुखी आणि कोरड्या केसांचं कारण कुपोषणही असते. त्यामुळे योग्य प्रमाणात प्रथिनयुक्त आहार घ्या.
मी २४ वर्षांची आहे. माझी नखं पिवळी दिसतात. मला नेहमी त्यावर नेलपेंट लावून ठेवावी लागते, सुरूवातीला नखे थोडीफार पिवळी दिसत होती. आता जास्त पिवळी दिसत आहेत आणि कुरुप वाटत आहेत. त्यांचा खरा रंग कसा परत आणता येईल?
शरीरात कॅल्शिअम आणि फॉस्फरसच्या कमतरतेमुळे नखं पिवळी पडू शकतात. तुमच्या आहारात दूध कमी असेल तर त्याचं प्रमाण वाढवा. शक्य असेल तर रोज एक अंडं खा. जर तुम्ही कॅल्शिअमयुक्त आहार योग्य प्रमाणात घेत असाल तर ‘ड’ जीवनसत्त्वयुक्त आहाराचेही योग्य सेवन करा. शरीरात कॅल्शिअम नीट मिसळण्यासाठी ‘ड’ जीवनसत्त्व आवश्यक आहे. नखांचा पिवळेपणा वाढत असेल तर नेलपेंट चांगल्या दर्जाची वापरा. निकृष्ट दर्जाच्या नेलपेंटचा रंग नखांवर उरतो आणि नखं पिवळी दिसू लागतात. याशिवाय नेलपेंट लावण्याआधी नखांवर बेस कोट लावा.
माझं वय २५ वर्षं आहे. माझी त्वचा खूप कोरडी आहे. मेकअप करूनही काही फरक पडत नाही. कृपया सांगा मी काय करू?
मेकअपने कोरड्या त्वचेवर काहीही परिणाम होत नाही. मेकअप करण्याआधी तुम्ही तुमची त्वचा स्वच्छ धुवून तिला काही मिनिटे मॉश्चरायज करा. याशिवाय ३-४ बदाम रात्रभर दूधात भिजवून ठेवा. सकाळी ते किसून त्यात केओलिन पावडर आणि मध मिसळून पेस्ट तयार करा. चेहऱ्यावर लावून स्क्रब करा, यामुळे त्वचा नरिश आणि मॉश्चराइज होईल.