* सोमा घोष

मराठी चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केलेली अभिनेत्री उर्मिला कोठारे मुंबईची आहे. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती, ज्यात प्रथम त्यांना साथ दिली त्यांची आई नीलिमा कानेटकर आणि आता पती आदिनाथ कोठारे यांनी. पती आणि सासरकडचे फिल्म इंडस्ट्रीशी जोडलेले आहेत. पती आदिनाथ चित्रपटांचे निर्माता दिग्दर्शक आहेत. उर्मिला एक कथक डान्सर आहे. मराठी चित्रपट ‘दुनियादारी’ आणि ‘शुभमंगल सावधान’ त्यांच्या गाजलेल्या फिल्म आहेत, ज्यात त्यांच्या कामाचे खूप कौतुक झाले आहे. आता त्या विवाहित आहेत आणि एक मुलगी जिजा कोठारेची आईदेखील आहेत. त्या आपल्या कामात आणि कुटुंबात कसा ताळमेळ बसवतात, चला जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांच्याच तोंडून…

तुला अभिनयाची प्रेरणा कुठून मिळाली?

माझ्या कुटुंबात कुणीही अभिनय क्षेत्रात नाही. मी लहानपणापासूनच कथ्थक डान्सर होते आणि त्या दरम्यान हावभाव करणे चांगले वाटायचे. माझ्या गुरु स्वर्गीय आशाताई जोगळेकर आहेत. तिथूनच मला लक्षात आले की मला अभिनयाची आवड आहे. त्या दरम्यान मला एका जाहिरातीच्या ऑडिशनसाठी विचारले गेले आणि मी त्यासाठी आपला पोर्टफोलिओ बनवला. त्यानंतर मी एक मराठी मालिका ‘तुझ्या विना’साठी ऑडिशन दिले आणि ती माझी पहिली सिरियल होती, ज्यात मी वर्षा उसगावकर यांच्या मुलीची भूमिका केली होती. ती सर्वांना फार आवडली आणि पुढे काम मिळू लागले.

तुला कुटुंबाचे किती सहकार्य मिळाले?

माझ्या आईवडिलांचा खूप पाठिंबा होता. आईमुळे मी अभिनय क्षेत्रात येऊ शकले, कारण तिने माझ्या पोर्टफोलिओचा एक फोटो महाराष्ट्र टाइम्सच्या मॉडेल वॉचेस कॉलमसाठी पाठवला होता. त्यात माझ्या फोटोसोबत ईमेल एड्रेसदेखील होता. त्यामुळे पुष्कळ लोकांच्या ऑफर मिळाल्या आणि मी काम सुरू करू शकले. त्यावेळी मी ग्रॅज्युएशन करीत होते. शूटिंग शिक्षण संपल्यानंतर सुरू झाले.

डान्सर असण्याचा अॅक्टींगसाठी तुला काही फायदा झाला का?

मी क्लासिकल डान्सर आहे. त्यात अभिनयाचे प्रशिक्षण मिळते. नृत्यात मूक अभिनय असतो, पण भाव पुष्कळ असतो. अशाप्रकारे मी नकळतच अभिनयाचे ट्रेनिंग डान्सच्या माध्यमातून घेतले होते. त्यामुळे मला कोणतीही भूमिका समजण्यास सोपे गेले.

अभिनयात येण्यामुळे नृत्य मागे पडले याचा तुला पश्चाताप आहे का?

माझे नृत्य सुटू नये यासाठी मी मुंबईच्या कांदिवलीत डान्स इन्स्टिट्यूट गेल्या पाच वर्षांपासून सुरू केले आहे. त्यात मी डान्स शिकवते आणि परफॉर्मन्सदेखील करते सोबतच दुसऱ्या बाजूला एक्टिंगदेखील करते.

तुम्ही तुमच्या पतीना कसे भेटलात?

मी प्रथम मराठी फिल्म ‘शुभ मंगल सावधान’ ही केली होती. यात माझी प्रमुख भूमिका होती. याचे दिग्दर्शक महेश कोठारे, ते आता माझे सासरे आहेत. त्यांच्यासाठी अभिनय करीत होते. त्यांचा मुलगा आदिनाथ कोठारे आपल्या वडिलांसोबत सहाय्यक दिग्दर्शक होते. तिथेच आमची ओळख झाली. याशिवाय माझे या फिल्मसाठी ऑडिशन घेतले गेले नव्हते. मी जेव्हा दिग्दर्शक आदिनाथ कोठारेना भेटायला आपल्या शो रीलसोबत गेले, तेव्हा त्यांनी ते पाहिले आणि आपल्या वडिलांकडे मला या भूमिकेसाठी फ्रीज करण्यास म्हटले. अशाप्रकारे त्यांच्याशी भेट झाली. त्यानंतर सात वर्षांनी माझे लग्न आदिनाथशी झाले. माझी मुलगी जिजा कोठारे आता तीन वर्षांची आहे.

तू कुटुंबासोबत कामाचा ताळमेळ कसा बसवते?

मी एकत्र कुटुंबात राहते, त्यामुळे काम करणे खूप सोपे जाते. मुलीची जबाबदारी कुटुंबातील सर्वांनी घेतलेली आहे. त्यामुळे माझ्या मुलीला घरी सोडल्यानेदेखील मला काही काळजी राहत नाही, कारण कुटुंबातील कोणी ना कोणी सदस्य तिच्यासोबत नेहमी असतो. याशिवाय योग्य सवयीदेखील मुले जॉइंट फॅमिलीमध्ये चांगल्या पद्धतीने शिकतात. मलादेखील सासू-सासरे कोणत्याही कामापासून रोखत नाहीत. उलट त्यांना अभिमान वाटतो.

तू तुझ्या या प्रवासाकडे कशी बघते? एखाद्या गोष्टीची खंत आहे का?

अजून तरी संतुष्ट नाहीए आणि आणखी चांगल्या पटकथा, दिग्दर्शक आणि लोकांसोबत काम करण्याची इच्छा आहे. कोणताच कलाकार कधीही संतुष्ट होऊ शकत नाही. मी स्त्रीप्रधान चित्रपटांमध्ये काम करू इच्छिते.

तुला हिंदी चित्रपटांमध्ये येण्याची इच्छा आहे का?

मी हिंदी चित्रपट केले नाहीत. हिंदी जाहिरातींमध्ये काम केले आहे. याशिवाय दोन हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. चांगली पटकथा आणि बॅनर असेल तर मी हिंदी चित्रपट अवश्य करेन.

तू किती फॅशनेबल आणि फूडी आहेस?

मी फॅशनेबल आहे. मला ठाऊक आहे की मला कोणत्या प्रकारचे ड्रेस शोभतात. मी ट्रेंड एक्सपेरिमेंट करत नाही. जे माझ्यावर चांगले दिसेल तेच घालते. मी एनाविला, अनामिका खन्ना इत्यादींचे पोशाख फॉलो करते. मी खूप फूडी आहे. सर्व प्रकारचे खाणे मला आवडते. मी जेवण चांगले बनवते आणि खातेदेखील. मला सीफूड खूप आवडते. तंदुरी क्रेब माझी फेवरेट डिश आहे.

तुला रिकाम्या वेळात काय करायला आवडते?

माझी मुलगी लहान आहे आणि वेळदेखील मिळतो, अशावेळी मी रियाज आणि वर्कआउटसाठी वेळ काढते.

कोव्हिड-१९ च्या काळात काम करणे कितपत कठीण आहे?

काम सुरू झाले आहे. शूटिंग नॉर्मली होत आहे, परंतु काळजी प्रत्येक ठिकाणी घेतली जात आहे. मी आता कित्येक जाहिरातींमध्ये काम केले आहे. पुढे एका मराठी चित्रपटाच्या शूटिंगसाठी जाणार आहे.

तुम्ही फिटनेस फ्रिक आहात. काय मेसेज देऊ इच्छिता?

फिट असणे खूप गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या खाण्या-पिण्यावर आणि वर्क आऊटवर नेहमी लक्ष द्यायला हवे, जेणेकरून ते निरोगी राहतील. स्त्रियांनी विशेष करून स्वत:ची काळजी घेण्याची गरज आहे त्या स्वत:वर खूप कमी लक्ष देतात.

नव्या वर्षाचे स्वागत तू कसे करू इच्छिते?

माझी इच्छा आहे की सर्व काही नॉर्मल व्हावे. माझ्या मुलीची शाळा सुरू व्हावी, कारण मी तिच्याकडून ऑनलाईन शिक्षण करून घेऊ इच्छित नाही. सगळयांचे आयुष्य नॉर्मल सुरू व्हावे, ज्यामुळे सगळे काही पूर्वीसारखे होईल.

आवडता रंग – पांढरा

आवडता पोशाख – इंडियन – साडी

आवडते पुस्तक – सिक्रेट

पर्यटन स्थळ – भारतात हिमालय,

परदेशात आफ्रिका

आवडता परफ्युम – एली साबचा क्लासिक

नकारात्मकता दूर करण्याचे उपाय – सकारात्मक विचार

जीवनाची आदर्श तत्वे – प्रामाणिकपणा

सामाजिक काम – स्त्रियांना सशक्त करण्याच्या दिशेने.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...