* ज्योती मोघे
जर तुम्ही चटणी बनवत असाल तर तुम्हाला माहीत आहे का की चटणीची चव
डबल टेस्टी बनविण्यासाठी कोणत्या चटणीत काय टाकायला हवे? जर माहीत
नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो :
- जर तुम्ही कोथिंबिरीची चटणी बनविणार असाल तर त्यात दही किंवा लिंबाचा
रस आणि शेंगदाण्याचे दाणे किंवा काजूची पेस्ट नक्की टाका. यामुळे चटणी
जास्त चविष्ट होईल. - पुदिन्याची चटणी बनविणार असाल तर त्यात आमचूर पावडर किंवा गुळ
नक्की घाला. यामुळे चटणीची चव कितीतरी अधिक पटीने वाढेल. - टोमॅटोची चटणी बनविणार असाल तर त्यात लसूण पाकळया नक्की टाका.
यामुळे चव उत्तम येईल. - कांद्याची चटणी बनविणार असाल तर थोडी हिरव्या कांद्याची पात टाका.
चव वाढेल. - ओल्या नारळाची चटणी बनविताना त्यात भाजलेली चण्याची डाळ, शेंगदाणे
आणि कडिपत्ता वापरा. वेगळीच चव येईल. - सुकी चटणी बनविणार असाल तर किसलेले सुके खोबरे, शेंगदाण्याचे दाणे,
जिरे पावडर, लसूण, मीठ, अख्खी लाल मिरची नक्की वापरा. यामुळे खूप चांगली
चव येते. - दह्याची चटणी बनविणार असाल तर शेंगदाण्याचा कुट, काळी मिरी, मीठ
आणि चाट मसाला वापरा. अफलातून चव येईल.
सूप बनविण्यासाठी काही टीप्स - सूप घट्ट बनवायचे असेल तर त्यात काळी मिरी, काळे मीठ, हिंग वापरून
फ्रेश क्रीम आणि टोस्टचे तुकडे घाला. - कॉर्नफ्लोअरमध्ये पाणी घालून ते वापरू शकता.
- तांदळाची पिठी घाला. यामुळेही सूप घट्ट होते.
- बटाटा उकडून एकदम बारीक किसून टाका.
- मैदा भाजून टाकू शकता.
- गव्हाचे पीठ भाजून आणि त्यात पाणी मिसळून टाकू शकता.
- सूप तयार झाल्यावर त्यात क्रीम घालू शकता. यामुळेही घट्टसरपणा येईल.
- आरारूट पाण्यात घोळवून टाका. यामुळेही सूप घट्ट होईल.
- कोबीची बारीक पेस्ट करूनही टाकू शकता.
- खसखसची पेस्ट घालूनही सूप घट्ट करता येईल.
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...
गृहशोभा से और