* पूनम मेहता

तुम्ही तुमच्या नातेसंबंधांबाबत नेहमीच चिंतित असता का? जर याचे उत्तर हो असेल तर तुम्हाला यावर गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे. तुमच्या चिंतेचे कारण तुमचा अॅटिट्यूड किंवा दोघांची केमेस्ट्री असू शकते. अशावेळी काही गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही तुमचे वैवाहिक जीवन सुरळीतपणे व्यक्तित करू शकता :

1. संवाद : आपल्या भावना, विचार, समस्या एकमेकांना सांगा. तसेच आपल्या वर्तमान आणि भविष्याबद्दल बोला. समोरच्याला आपल्या योजनांबद्दल सांगा. बोलण्यासह ऐकणे हे तेवढेच गरजेचे आहे. मौन हा देखील एकप्रकारचा संवाद आहे. आपले हावभाव, स्पर्श यांतून आपल्या साथीदाराप्रति प्रेम आणि आदर दिसून येतो.

2. सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचा अट्टाहास नको : जर तुम्ही तुमच्या साथिदाराकडून अवास्तव अपेक्षा ठेवत आहात तर तुमचे निराश होणे सहाजिक आहे. पार्टनरकडून तेवढयाच अपेक्षा ठेवा, जेवढया तो पूर्ण करू शकतो. बाकी अपेक्षा दुसऱ्याप्रकारे पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करा. पार्टनरला स्पेस द्या. त्याच्या चांगल्या-वाईट गुणांना स्वीकारा.

3. विवादापासून लांब राहू नका : निरोगी नात्यासाठी विवाद हे चांगलेही ठरतात. गोष्टींना टाळत राहील्याने राईचा पर्वत होतो. मनातील गोंधळ वाढवू नका, बोलून टाका. तुमचा साथीदार तुमच्याशी वाद घालत असेल तर तुम्ही शांत राहू नका आणि वाईट प्रकारे प्रतिक्रियाही देऊ नका. लक्षपूर्वक ऐका आणि व्यवस्थित समजून घ्या. मारहाण किंवा अपशब्दांचा प्रयोग तर अजिबातच करू नका.

4. चूकीच्या व्यवहाराला आव्हान द्या : कधीच साथिदाराच्या चूकीच्या व्यवहाराने दु:खी होऊन आपला स्वाभिमान गमावू नका. अनेकदा आपण साथिदाराच्या व्यवहाराने एवढे हैराण होतो की आपली वेदना व्यक्त न करता स्वत:लाच अपराधी समजू लागतो. साथीदार शारीरिक मानसिक रुपाने दुखापत देतो. तरीही तुम्ही त्याला नाही म्हणत नाहीत. हे चूकीचे आहे. चूकीचा व्यवहार स्वीकारू नका. यामुळे नात्यात अशी काही फूट पडते जी कधीच भरून निघत नाही.

5. एकमेकांना वेळ द्या : एकमेकांसमवेत वेळ घालवणे आणि क्लालिटी टाईम शेअर केल्याने प्रेम वाढते. साथीदारासह ट्रिप प्लॅन करा, घरातही मोकळे क्षण एकत्र घालवा. यावेळी फक्त चांगले क्षण आठवा, रागाचे विषय काढू नका. मग पाहा जेव्हा कधी तुम्ही हे क्षण आठवाल तेव्हा तुम्हाला छान वाटेल.

6. विश्वास ठेवा आणि मान द्या : तुम्ही तुमच्या साथीदाराची खूप मस्करी करता का? तुम्ही साथिदारावर सतत संशय घेता का? जर असे असेल तर नाते संबंधात सहजता असणार नाही. एकमेकांवर विश्वास ठेवणे आणि एकमेकांचा आदर करणे सर्वात महत्त्वाचे असते. विश्वास आणि आदर कोणत्याही नात्याचा आधार असतो. म्हणूनच यास मजबूत ठेवले पाहिजे.

7. टेकन फॉर ग्रांटेड घेऊ नका : लग्न झाल्यानंतरही टेकन फॉर ग्रांटेड घेऊ नये. साथिदाराच्या आवडी-निवडींवर खरे उतरण्याचा प्रयत्न करा. जसे रोपटयाला व्यवस्थित पाणी देऊन वाढविल्यानंतरच त्याचे भक्कम वृक्ष तयार होतात, योग्य देखभालीने त्याची चांगली वाढ होते. तसेच वैवाहिक जीवनाला दोन लोक मिळूनच सफल बनवू शकतात.

8. हे टिम वर्क आहे : पति-पत्नी तेव्हाच आनंदी जीवन जगू शकतात, जेव्हा दोघे टीमप्रमाणे काम करतील. दोघांनी समजून एकमेकांविरोधात जिंकण्यापेक्षा दोघांनी एकत्रितपणे जिंकणे जरुरी आहे. सुखी वैवाहिक जीवन हा दोघांच्याही मेहनतीचा परिणाम असतो.

9. एकमेकांची काळजी घेणे : जीवनात प्रत्येक गोष्टीच्या वरती एकमेकांना ठेवले तर मनात सुरक्षेची भावना निर्माण होईल. ही भावना नात्याला मजबूत बनवेल. प्रत्येक पति-पत्नीला एकमेकांकडून भरपूर प्रेम आणि आदर हवा असतो.

10. लक्षपूर्वक मित्र निवडा : तुमचे मित्र तुमचे जीवन बनवू किंवा बिघडवू शकतात. मित्रांचा प्रभाव तुमच्या व्यक्तित्वावर आणि व्यवहारावर अधिक असतो. म्हणूनच असे मित्र निवडा, जे तुमच्यासाठी चांगले असतील.

11. बोलण्यावर संयम : वैवाहिक जीवनात अनेकदा तुमचे बोलणे तुमच्या विवाहाला नष्ट करून टाकतात. आपल्या शब्दांचा प्रयोग कटाक्षाने करा. चांगले शब्द वापरा, समजवा, कौतुक करा, यामुळे तुमचे वैवाहिक जीवन चांगल्या पद्धतीने व्यतीत होईल.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...