प्रश्न. मी माझ्या ४ वर्षांच्या वैवाहिक आयुष्याची घडी नीट बसवू शकले नाही. माझ्या अडेलतट्टू स्वभावामुळे गोष्टी या थराला गेल्या की माझा घटस्फोट झाला. पतीपासून वेगळे झाल्यावर मला ही जाणीव झाली की मी आयुष्यात काय गमावले आहे. मला माझ्या चुकांचा आणि वागण्याचा खूप पश्चात्ताप होतोय. मी अनेकदा माझ्या पतीची माफी मागितली आहे. त्यांना म्हटले की मी दोषी आहे व माझ्या वागण्याची मला लाज वाटते. त्यांनी मला माफ करावे. पण ते म्हणतात की त्यांना माझ्याशी काहीही देणंघेणं नाही. त्यांना माझ्याशी बोलायचंही नाहीए. मी काय करू?
उत्तर. व्यक्तिगत परामर्श मराठी व्यक्तिगत सुलझन ऑनलाइन व्यक्तिगत सुलझन लाइफस्टाइल आर्टिकल नए ज़माने की महिलाओं. विवाहित आयुष्यात तडजोड करण्याऐवजी तुम्ही संबंध तोडण्याचा निर्णय घेतलात. घटस्फोट हा अडचणींवरील उपाय नाही. घटस्फोट घेतल्यानंतर तुम्हाला पश्चात्ताप होत आहे. पण आता त्याने काहीच साध्य होणार नाहीए. एवढा मोठा निर्णय घेण्याआधी तुम्ही शांत डोक्याने विचार करायला पाहिजे होता. त्यामुळे तुम्हाला आता अपराधी वाटले नसते. पण आता जेव्हा तुम्ही घटस्फोट घेतलाच आहे तेव्हा पतीसमोर जाऊन क्षमा मागितल्याने किंवा रडण्याने काहीच होणार नाही.
प्रश्न. मी २० वर्षांची तरूणी आहे. मागच्याच वर्षी माझ्या वडिलांचं निधन झालं आहे. आता माझ्या आईला लवकरात लवकर माझे लग्न लावून द्यायचं आहे. तिचं म्हणणं आहे की मुलीचं लग्न शक्य तितक्या लवकर व्हावं. तिने दुबई स्थित एका मुलाशी माझ्या लग्नाबद्दल बोलणी केली आहे. हे माहीत असूनही की माझं एका मुलावर प्रेम आहे. मुलगा चांगला कमावता आहे आणि लग्नाच्या बाबतीतही तो पूर्णपणे गंभीर आहे. पण तो दुसऱ्या जातीचा आहे म्हणून घरातले या स्थळाला नाही म्हणत आहेत. असं काय करू की त्यांनी माझ्यावर लग्नासाठी जबरदस्ती करू नये.
उत्तर. फक्त मुलगा वेगळ्या जातीचा असल्यामुळे जर कुटुंबीय तुमच्या व तुमच्या प्रियकराच्या लग्नाला आक्षेप घेत असतील तर हे चुकीचं आहे. जर मुलामध्ये काही दोष नाही व तुम्ही त्याच्यासोबत आनंदी राहणार असाल तर तुम्ही तुमच्या कुटुंबीयांना समजावण्याचा प्रयत्न करा. आंतरजातीय विवाह तर सर्रास होतात हल्ली व समाजही त्यांना विरोध करत नाही.
प्रश्न. मी २६ वर्षांची विवाहित स्त्री आहे व ३ वर्षांच्या मुलाची आईपण आहे. लग्नाआधी मी नोकरी करत होते. पण लग्नानंतर वेगळ्या शहरात राहावे लागले, म्हणून नोकरी सोडावी लागली. आता मला असे वाटते की मी पुन्हा नोकरी करावी. माझ्या पतीला याबाबतीत सांगितलं. त्यांनी नकार दिला. कारण इथे आम्ही एकटे राहतो. त्यामुळे घरात कोणी अशी मोठी व्यक्ती नाहीए जी मूल सांभाळू शकेल व मुलाला पाळणाघरात ठेवण्याच्या ते पूर्ण विरोधात आहेत. याशिवाय त्यांचे असेही म्हणणे आहे की जर आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम असू तर मला नोकरी करायची गरजच काय? मी कसं समजावू की आर्थिक बाबीसाठी नाही तर मला इच्छा आहे म्हणून नोकरी करायची आहे. जर आता २-४ वर्षं मी अशीच वाया घालवली तर माझे करिअर संपूनच जाईल. मी काय करू सांगा?
उत्तर. लग्नानंतर कौटुंबिक कारणामुळे मुलांच्या संगोपनासाठी बहुतांशी महिला नोकरी सोडतात आणि याचा त्यांना काहीच खेद नसतो. कारण गृहिणी असणं व मुलांचे संगोपन करणं हीच खरंतर पूर्णवेळ नोकरी आहे. दोन्हींचा एकत्र ताळमेळ बसवणं व खासकरून तेव्हा जेव्हा मुलांना सांभाळण्यासाठी घरात कोणी व्यक्ती नसेल तेव्हा तर हे खूपच अवघड असतं. पाळणाघरात मुलांना सोडण्याचा विषय असेल तर हल्ली एकतर चांगली पाळणाघरं मिळत नाहीत आणि मिळाली तरी तिथे मुलांची तितकीशी काळजी घेतली जात नाही, जितकी त्यांची आई घेते. जर तुम्हाला कुठलीही आर्थिक अडचण नसेल तर तुम्ही नोकरीचा हट्ट करायला नको. घरात अतिरिक्त वेळात तुम्ही एखादी आवड जोपासा किंवा शिकवण्या वगैरे करू शकता.
प्रश्न. माझ्या कुटुंबातील एका समस्येने मी त्रस्त आहे. माझ्या बहिणीच्या लग्नाला ६ महिने झाले असून तेव्हापासून माझे मेव्हणे बेरोजगार आहेत. त्यांना एक नोकरी मिळाली होती, पण दोनच महिन्यांत त्यांनी ती नोकरी सोडली कारण त्यांना त्यांच्या बॉसचे वागणे पटत नव्हते. त्यांचे म्हणणे असे की जिथं रूचेल तिथेच ते नोकरी करतील. स्वभाव खूपच हट्टी आहे व आम्ही मुलीकडचे असल्याकारणाने जावयाला काही सल्ला देणेही योग्य नसल्याने कृपया उपाय सुचवा. जेणेकरून कुटुंबासाठी नोकरी करावीच लागेल हे त्यांना पटेल. माझी विनंती आहे की माझं उत्तर एसएमएसने द्यावे. मी मासिक विकत घेऊ शकत नाही.
उत्तर. मुलीचं लग्न ठरवताना मुलाच्या लग्नाबद्दल तुम्ही काही चौकशी केली नसणार अन्यथा बेरोजगार मुलाशी लग्न लावले नसते. त्यावेळी स्थिती जी काही असेल पण आता तुम्ही मुलीकडचे असलात तरी नम्रतेने त्यांना समजावून सांगा. आता त्यांची जबाबदारी वाढली आहे व त्यामुळे एकजागी नोकरी करावी. त्यांच्या पालकांनाही त्यांना समजावायला सांगावे. सर्व मनासारखे मिळणार नाही. चांगली नोकरी मिळेपर्यंत नोकरी सोडू नये. मेहनत घेऊन स्वत:ला सिद्ध करावं. तुम्हाला एसएमएसने उत्तर पाठवणं शक्य नाही कारण मासिकातूनच उत्तरे दिली जातात.