* अनुराधा गुप्ता

नात्यांना अधिक दृढ करण्यासाठी काही असे उपाय करा जे तुमच्या कौटुंबिक आणि सामाजिक नात्यांमध्ये गोडवा भरून ते अधिक सुखद करतील.

कौटुंबिक नाती

सर्वप्रथम आपण कौटुंबिक नात्यांबद्दल बोलूया जी आपल्याला वारसाने मिळतात आणि जी एखाद्या संपत्तीपेक्षा अधिक असतात. चला तर मग आम्ही तुम्हाला अशा काही 10 पद्धती सांगतो ज्यामुळे तुम्ही तुमची कौटुंबिक नाती अधिक दृढ करू शकाल :

1) प्रपंच सोडा : प्रपंच खूपच खमंग शब्द आहे. लोक याचा मिटक्या मारत वापर करत असतात. उदाहरणार्थ. सुनेच्या भावाने आंतरजातीय लग्न केलं. मग काय सुनेला लोकांना उत्तर देणं कठीण होऊन बसतं. सासूबाई तर त्यांच्या संस्काराची उदाहरणं देऊन देऊन सुनेच्या माहेरच्या लोकांना नावे ठेवण्यात गर्क झाल्या.

अहो, ही गोष्ट एवढा इश्यू बनविण्याची मूळात गरजेचं काय? आंतरजातीय लग्न कोणता गुन्हा तर नाहीए ना. हा, एक आहे तो म्हणजे तुमच्या समाजातील लोक ही गोष्ट पचवू शकत नाहीत. परंतु सून तर तुमच्याच घरची आहे. तिच्या सुखदु:खात सहभागी होणं तुमचं कर्तव्य आहे, जे तुम्ही प्रपंचाच्या नादात उडवत आहात. तुम्हाला काय वाटलं की प्रपंच केल्याने तुम्ही दुसऱ्यांच्या नजरेत मोठं बनता आणि समोरच्याला दुसऱ्यांच्या नजरेतून कमी करता. तसं नाहीए उलट यामुळे तुमचीच पत कमी होते. तुमच्याच कुटुंबाची खिल्ली उडते, ज्यामध्ये तुमचादेखील समावेश होतो.

म्हणूनच या रोगापासून स्वत:ला कसे मुक्त कराल आणि दुसऱ्यांना कोणता सल्ला द्याल हे नक्की ठरवा.

2) तुमचं कर्तव्य समजून घ्या : कर्तव्याचा अर्थ केवळ आईवडिलांची सेवा करणं एवढंच नाहीए, उलट तुमच्या मुलांबद्दलदेखील तुमची काही कर्तव्य असतात. अलीकडचे आईवडील आधुनिकतेच्या चादरीने लपेटलेले आहेत. मुलांना जन्म देणं आणि त्यांना सुखसुविधा देण्यातच ते आपली जबाबदारी मानतात. परंतु यापेक्षादेखील ते स्वत:;चा वैयक्तिक आयुष्याला अधिक महत्त्व देतात. अशावेळी एवढंच म्हणू शकतो की तुम्ही एक आदर्श आईबाबा नाही आहात. परंतु या वर्षात तुम्हीदेखील आदर्श होण्याचा किताब मिळवू शकता. मात्र, यासाठी तुम्हाला तुमची कर्तव्य अधिक योग्यतेने अमलात आणायला हवीत.

3) खोट्याचा आधार घेऊ नका : अनेकदा पाहाण्यात आलंय की आपल्या जबाबदारीपासून वाचण्यासाठी, स्वत:चा बडेजाव मिरवण्यासाठी वा आपली चूक लपविण्यासाठी लोक खोट्याचा आधार घेतात. एकत्रित कुटुंबपद्धतीत या गोष्टी अधिक पाहायला मिळतात. कारण एकमेकांमध्ये स्वत:ला अधिक योग्य सिद्ध करण्याच्या नादात लोकांकडून चुकादेखील होतात. परंतु हे नकारात्मक पद्धतीने घेण्याऐवजी सकारात्मक रीतीने घ्यायला हवं. जेव्हा तुम्ही अशी विचारसरणी ठेवाल तेव्हा खोटं बोलण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही. यावर्षी विचारात सकारात्मकता आणा. यामुळे कौटुंबिक नात्यांसोबत तुमचं व्यक्तिमत्त्वदेखील उजळून निघेल.

4) आर्थिक वितुष्टापासून दूर राहा : आधुनिकतेच्या काळात लोकांनी नात्यांनादेखील पैशाच्या तराजूतून तोलायला सुरुवात केलीय. नात्यांमध्ये अनेकदा एखाद्या समारंभाच्या नावाखाली पैसा उधळण्याची प्रथा आहे. लग्नासारख्या समारंभाचंच घ्या ना. इथे शगुन म्हणून पाकीट देण्याची आणि घेण्याची प्रथा आहे. या पाकिटांमध्ये पैसे ठेवून नातेवाइकांना दिले जातात. जो जेवढे पैसे देतो त्यालादेखील तेवढेच पैसे परत देऊन व्यवहार पूर्ण केला जातो. परंतु जी नाती पैशांच्या आधारावर बनतात वा बिघडतात त्यांचा काहीच फायदा नसतो. यावर्षी ठरवा की नात्यांमधील आर्थिक गोष्टीवरून निर्माण होणाऱ्या वितुष्टांपासून दूर राहायचं, तरच नात्यांना भावनांनी जुळवू शकाल.

5) अभिव्यक्तीस्वातंत्र्य : अभिव्यक्ती-स्वातंत्र्याचा उल्लेख आपल्या देशाच्या घटनेतदेखील केला गेलाय. परंतु कुटुंबाच्या घटनेत हा हक्क थोड्याच लोकांना दिलेला आहे, जो खूपच चुकीचा आहे. आपलं म्हणणं मांडण्याचा हक्क प्रत्येकाला द्यायला हवा. अनेकदा आपण समोरच्यांचं म्हणणंच ऐकून घेत नाही. वा त्याला दाबण्याचा प्रयत्न करतो. मुळातील साधेपणामुळे ती व्यक्ती दबलीदेखील जाते. परंतु यामुळे नुकसान तुमचंच होतं. कारण तो तुम्हाला योग्य सल्लादेखील देत असतो, परंतु तुम्ही त्याचं ऐकत नाही आणि स्वत:चंच म्हणणं खरं करत राहाता. अशामध्ये खरं आणि खोट्यातील अंतर तुम्ही कधीच समजू शकणार नाहीत. म्हणूनच यावर्षांपासून ठरवा की घरात स्त्री असो वा पुरुष, लहान असो वा मोठं प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं जाईल.

सामाजिक नाती : समतोल आणि सुखद आयुष्य जगण्यासाठी कौटुंबिक नात्यांबरोबरच सामाजिक नातीदेखील दृढ बनविणं गरजेचं आहे. चला तर मग आम्ही सांगतो तुम्हाला सामाजिक नाती योग्य बनविण्याच्या ५ पद्धती :

6) ईगोचा त्याग करा : ईगो खूपच लहान परंतु खूपच खतरनाक शब्द आहे. ईगो माणसांवर तेव्हा हावी होतो जेव्हा तो स्वत:च्यापुढे समोरच्याला तुच्छ समजतो, त्याला दु:ख देऊ पाहातो वा त्याचा आत्मविश्वास डळमळीत करू पाहातो. अनेकदा कार्यालयात काम करणाऱ्या साथीदारांमध्ये ईगोची भिंत उभारलेली असते. अशा परिस्थितीत अनेकदा ते अशी पावलं उचलतात ज्यामुळे ते त्यांची प्रतिमा मलिन करतात वा ते समोरच्यांचं बरंचसं नुकसान करण्यात यशस्वी होतात. परंतु ईगो तुम्हाला मोठेपणा देऊ शकतो का? कदाचित नाही. तो तुमच्याकडून नेहमी वाईट काम करवून घेतो. तुम्हाला वाईट माणसांच्या श्रेणीत आणतो. तर मग ज्यामुळे तुमचा फायदा होण्याऐवजी नुकसानच होतं, अशा ईगोचा काय उपयोग? यावर्षी ठरवूनच टाका की ईगोचं नामोनिशाण तुमच्या व्यक्तिमत्त्वावरून मिटवून टाकाल आणि दुसऱ्यांचं वाईट करण्याऐवजी तुमचं व्यक्तिमत्त्व उजळविण्यात वेळ खर्च कराल.

7) मदतनीस व्हा : माणूस एक सामाजिक प्राणी आहे आणि नेहमी समूहाने राहात आलाय. या समूहात अनेक लोक याचे जाणकार असतात, तर काही अनभिज्ञदेखील असतात. परंतु मदत एक अशी प्रक्रिया आहे जी मनुष्याला मनुष्यानेच जोडते. एखाद्याच्या त्रासात त्याला सोबत करणं वा त्याला कधीही मदत करणं हे एक माणूस या नात्याने आपलं कर्तव्य आहे.

8) पुण्य नाही कर्तव्य समजा : धार्मिक ग्रंथांमध्ये पुण्य कमावणं एक मोठं व्याख्यान आहे. अनेकदा लोक पुण्य कमावण्याची संधी म्हणून एखाद्याला मदत करतात. परंतु जिथे पुण्य कमावण्याची संधी दिसत नाही तिथे ते ढुंकूनही पाहात नाहीत. असं म्हणतात की भुकेलेल्या आणि तहानलेल्या माणसाला खायला घालण्याने पुण्य मिळतं. हे पुण्य कमावण्यासाठी लाखों रूपये खर्चून भंडाऱ्याचं आयोजन करतात. मात्र दुसरीकडे हिच लोक वाटेतील गरीब भुकेलेल्या मुलाला २ भाकऱ्या देण्याऐवजी हाकलून देतात. उलट एखाद्या भुकेलेल्याला खायला घालणं हे पुण्य नाही तर तुमचं कर्तव्य आहे. अशाप्रकारे धर्माच्या नावाखाली वा त्याचा आधार घेऊन एखाद्या खास दिवसाची वाट पाहून एखादं कार्य करण्याऐवजी गरजवंताला पाहाताच त्याला आधार द्या आणि हे तुमचं कर्तव्य समजा. तर यावर्षी प्रतिज्ञा करा की काम पुण्य नाही तर कर्तव्य समजून कराल.

9) खुल्या मनाने मोठा विचार करा : यावर्षी तुमच्या विचारसरणीचा विस्तार करा. असं केल्यावर तुम्हाला आढळेल की तुमच्यापेक्षा अधिक समाधानी आणि चिंतामुक्त मनुष्य दुसरा कोणीही नाहीए. अशी अनेक लोक तुम्हाला तुमच्या आजूबाजूला मिळतील जी स्वत:चा वेळ फक्त दुसऱ्यांबद्दल विचार करण्यासाठीच खर्च करतात. त्यांना प्रत्येक वेळी हेच वाटतं की त्यांच्या बाबतीत कोणीतरी चुकीचं करतंय वा बोलतंय. परंतु जरा विचार करा, या धावपळीच्या युगात कोणाकडेही दुसऱ्यासाठी विचार करायला तरी वेळ आहे का? तर नाही आहे. त्यामुळे तुम्हीदेखील तुमच्याबद्दल विचार करा आणि कोणाचंही नुकसान न करता आपल्या फायद्याचं काम करा.

10) सन्मान द्या आणि सन्मान मिळवा : अनेक लोक जेव्हा एकाद्या मोठ्या स्तरावर पोहोचतात तेव्हा ते नेहमी आपल्यापेक्षा छोट्या स्तरावरच्या लोकांकडे कुत्सितपणे पाहू लागतात. अनेकदा कार्यालयांत असं होतं की स्वत:ला सीनिअर म्हणवून घेण्याच्या नादात लोक आपल्यापेक्षा खालच्या पदावरच्यांचं शोषण आणि अपमान करायला सुरुवात करतात. परंतु तुम्ही ही म्हण ऐकलीच असेल की चिखलात दगड टाकल्यास त्याचे शिंतोंडे आपल्यावरदेखील उडतातच. अशाप्रकारे अपमान करण्याऱ्यांनादेखील अपमानच मिळतो. म्हणूनच यावर्षी ठरवून टाका की कोणतीही स्थिती व परिस्थितीमध्ये तुम्ही सर्वांशी सन्मानपूर्वकच वागा

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...