– पूनम पांडे
दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे, हे मान्य, या सणाच्या चाहुलीनेच आपण आपल्या घरकुलाला सजविण्यात व्यस्त होता. परंतु या खास पर्वानिमित्त केवळ आपल्या घरकुलाला सजवणं व विविध खमंग, रुचकर पदार्थ बनवणं पुरेसं नाही. तर या सणाला आकर्षक दिसण्यासाठी आपली पर्सनॅलिटी उजळविणे आवश्यक आहे. या खास दीपोत्सवानिमित्त आपलं सौंदर्य आणखी खुलविण्यासाठी आम्ही फेस्टिव्ह मेकअप लुक्ससोबतच मेकअपच्या काही खास आणि नवीन प्रॉडक्ट्सची व्यवस्था केली आहे.
अर्थात, आपण एव्हाना दिवाळीच्या दिवशी लागणाऱ्या पेहरावाची खरेदी केलीच असेल. परंतु आकर्षक लुक्ससाठी केवळ कपडयांची खरेदी करणं पुरेसे नाही. आपल्याला आपला चेहराही मेकअपने हायलाइट करावा लागेल. आपण कितीही महागडे कपडे वापरा, पण आपल्या चेहऱ्यावर मेकअप नसेल, तर आपण सौंदर्य सम्राज्ञी दिसू शकणार नाही. उलट साधा पेहराव करून, जर मेकअप योग्यप्रकारे केलेला असेल तर काही मिनिटांतच आपले रूप खुलून दिसते. खरं तर मेकअप चेहऱ्याचं सौंदर्य खुलविण्याबरोबरच चेहऱ्याच्या उणिवा लपवतो. म्हणजेच मेकअप केल्यानंतर सुंदर दिसणार नाही, असे होणारच नाही.
अर्थात, या दिवाळीनिमित्त बॅलन्स्ड लुकसाठी मेकअप आर्टिस्ट क्रिस्टल फर्नांडिसने सांगितलेले हे डिफरन्ट फेस्टिव लुक्सही ट्राय करू शकता. पण एक गोष्ट लक्षात घ्या की केवळ फेस्टिव सिझनमध्येच नव्हे, इतर वेळीही मेकअप करताना या गोष्टींची काळजी घेणंही खूप आवश्यक आहे.
बॅलन्स लुकसाठी ट्राय करा हे ६ फेस्टिव लुक
1. ज्वेल्ड लुक : ज्वेल्ड लुकसाठी आय मेकअपपासून सुरुवात करा. सर्वप्रथम आय लीडवर शँपेन शेड किंवा आयशॅडो लावा. मग ज्वेल टोंड जेल किंवा लिक्विड आयलाइनर लावा. ब्लॅक मस्काऱ्याचा सिंगल कोट लावून आय मेकअप पूर्ण करा. लिप मेकअपसाठी फ्रेश टोंड लिपग्लॉस अप्लाय करा. आपण पिंक किंवा ब्राउन शेड्सचे ब्लशऑन करून चिकबोन्सला हायलाइट करा.
2. शिमर गर्ल लुक : शिमर गर्ल लुकसाठी सर्वप्रथम आयब्रोज बोन्सवर व्हाइट शिमर आयशॅडो लावा, जेणेकरून आयशॅडो आणि आयलाइनर खुलून दिसेल. ज्या शेड्सचा आयशॅडो लावत असाल, त्याची डार्क शेड आयलाइनरसाठी यूज करा. उदा. आयशॅडोसाठी सी ग्रीन शेड निवडत असाल, तर आयलाइनरसाठी डार्क ग्रीन निवडा. आता मस्काऱ्याचे दोन कोट लावून आय मेकअप पूर्ण करा. ओठांसाठी लिपग्लॉस आणि चिकबोन्ससाठी फ्रेश शेड ब्लशरची निवड करा.
3. बोल्ड लुक : जर आपण गोऱ्या असाल, तर पिंकीश रूबी किंवा रेड, सावळया किंवा गव्हाळ वर्णाच्या असाल, तर डार्क बरगंडी शेड्सची लिपस्टिक लावा. आय मेकअपसाठी पापण्यांवर स्नोव्हाइट शेडचा आयशॅडो अप्लाय करा आणि मग लाइट शेड्सचा आयलाइनर लावा व ब्लॅक मस्कारा लावून आय मेकअप कंप्लीट करा. आता चिकबोन्सला हायलाइट करण्यासाठी नॅचरल शेड्सचा ब्लशर लावा.
4. शाइनी सिल्व्हर लुक : डार्क शेडची लिपस्टिक लावून लिप मेकअपला हेव्ही लुक द्या. आता आय मेकअपसाठी सिल्व्हर आयशॅडो लावा आणि मग ग्रे कलरचं आयलायनर लावा. त्यानंतर सिल्व्हर मस्कारा लावून आय मेकअप कंप्लीट करा. चिकबोन्ससाठी लाइट शेड्सची निवड करा.
5. गोल्डन ग्लो लुक : पापण्यांवर गोल्डन शेड्सचा आयशॅडो लावा. आता डार्क चॉकलेट शेड्सचा आयलाइनर यूज करा. पिंक किंवा गोल्डन शेड्सची शीयर लिपस्टिक लावा आणि शेवटी नॅचरल ब्लशरने चिकबोन्सला हायलाइट करा. याबरोबरच गोल्डन ग्लोसाठी पंपकिन, कॉपर किंवा जिंजरब्रेड शेड्सचा वापरही चिक्स, लिप्स आणि आय मेकअपसाठी करू शकता.
6. चॉको लुक्स : आयशॅडोसाठी कॉपर शेडचा वापर करा. आता डोळयाच्या कोनांमध्ये डार्क ब्राउन कलरचा आयलाइनर लावा. वरच्या आणि खालच्या आयलीडवर ब्लॅक कलरचा पेन्सिल आयलायनर अप्लाय करा. आता ब्लॅक मस्काऱ्याचे दोन कोट लावून, आय मेकअप कंप्लीट करा. ओठांवर गोल्डन ब्राउन लिपग्लॉस लावा.
खास मेकअप प्रोडक्ट्स
आपला विचार असेल की रेग्युलर मेकअप शेड्सनी आपल्याला फेस्टिव लुक मिळू शकतो, तर आपण चुकीच्या आहात. फेस्टिव लुकसाठी आपल्याला आपल्या वॅनिटी बॉक्समध्ये काही खास मेकअप प्रॉडक्ट्सना जागा द्यावी लागेल. या, जाणून घेऊ हे मेकअप प्रॉडक्ट्स कोणकोणते आहेत? :
- मूस : बेस मेकअपसाठी आपण वॅनिटी बॉक्समध्ये कॉपॅक्ट आणि फाउंडेशनऐवजी मूस ठेवा. मेकअपची सुरुवात करण्यापूर्वी चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुवा. मग संपूर्ण चेहऱ्याला मूस लावून मेकअप बेस तयार करा. मूसची निवड आपला स्किनटोन लक्षात घेऊन करा.
- व्हाइट आयशॅडो : आय मेकअपला क्लीन बेस देण्यासाठी वॅनिटी बॉक्समध्ये व्हाइट आयशॅडो जरूर ठेवा. आय मेकअपची सुरुवात करण्यापूर्वी आयब्रोज बोनवर व्हाइट आयशॅडो लावा. त्यानंतर मनपसंत आयशॅडो, आयलाइनर यूज करा. असे केल्याने आयब्रोजही हायलाइट होतील.
- जेट ब्लॅक आयलाइनर : आय मेकअपला काही मिनिटांत ड्रॅमॅटिक लुक देण्यासाठी जेट ब्लॅक आयलाइनर जरूर खरेदी करा. हा लावल्यानंतर मस्कारा किंवा आयशॅडो लावायची गरज नाही. जेट ब्लॅक आयलाइनर आय मेकअपला स्मोकी इफेक्ट देण्यासाठी पुरेसा आहे.
- शिमर ब्लशर : फेस्टिव सिझनमध्ये आपल्या लुकला ग्लॅमी टच देण्यासाठी शिमर ब्लशरचा वापर करा. शिमर ब्लशऑन लावल्यानंतर आय मेकअप आणि लिप मेकअपसाठी जास्त मेहनत करावी लागणार नाही. याच्या वापराने चेहरा शाइन करेल.
- न्यूड लिप कलर : लिपस्टिकच्या डार्क शेड्स लिप्सला बोल्ड लुक देतात, हे मान्य असले, परंतु लिप मेकअपला हायलाइट करण्याचा हा फॉर्म्युला आता जुना झाला आहे. अलीकडच्या काळात लिपस्टिकच्या न्यूड शेड्सची डिमांड आहे. लिपस्टिकचे पिच, पिंक यासारख्या शेड्स हॉट लुक देऊ शकतात.
- ग्लिटर फॉर हेअर : लिप आणि आय मेकअपबरोबरच केसांवर ग्लिटरचा वापर करून आपण फेस्टिव लुक देऊ शकता. म्हणून आपण वॅनिटी बॉक्समध्ये ग्लिटर स्प्रेला खास स्थान देऊ शकता. सिल्व्हर आणि गोल्डनसोबतच वेगवेगळया कलर्सचे हेअर ग्लिटर्सही मिळतात. आपण त्यांचीही निवड करू शकता.
- बॅलरीना पिंक नेलपेंट : नेलपेंटच्या डार्क आणि निऑन शेड्सला बाय बाय करा आणि फेस्टिव लुकसाठी बॅलरीना पिंक नेलपेंट खरेदी करून आणा. हेव्ही मेकअपसोबत नखांना लावलेली ही लाइट शेड नेलपेंट आपले सौंदर्य आणखी खुलवेल.
हे खरं आहे की, मेकअप आपलं सौंदर्य वाढवतो, पण मेकअपच्या वेळी केलेली चूक आपलं सौंदर्य बिघडवू शकते. म्हणून मेकअप प्रॉडक्ट्सचा वापर विचारपूर्वक करा.