-प्रीति जैन

हिवाळ्याचा ऋतू सुरू होताच त्वचा कोरडी व निर्जीव दिसू लागते. या ऋतूमध्ये त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते.

काही विशेष गोष्टींवर लक्ष देऊन या दिवसांतही सुंदर त्वचा मिळवता येऊ   शकते :

मॉइश्चरायझिं

दैनंदिन स्किन केअरसाठी दिवसा आणि रात्री झोपण्यापूर्वी मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. मॉइश्चरायझरची निवड करतेवेळी हे जरूर पहा की त्यात ऑइलचं प्रमाण व्यवस्थित आहे की नाही. जर रात्री झोपण्याआधी तेलाने त्वचेला  मॉइश्चरायझ करत असाल तर बदाम, ऑलिव्ह, नारळ किंवा एवाकॉडो तेलाचाच वापर करा.

सनस्क्रीनची गरज

हिवाळ्यात सनस्क्रीनची गरज नसते हे अगदी खरे नाही. वास्तविक हिवाळ्यात आपली त्वचा उन्हाच्या जास्त संपर्कात येते. त्यामुले घरातून बाहेर निघण्यापूर्वी अर्धा तास आधी सनस्क्रीन जरूर लावावे. उन्हात जास्त वेळ थांबलात तर २-३ तासांनंतर पुन्हा लावावे.

स्किन एक्सफोलिएशन

हिवाळ्यात त्वचेला एक्सफोलिएट म्हणजेच त्वचेवरून मृत पेशी किंवा त्वचा काढून टाकण्यासाठी स्क्रबिंगची गरज नसते हे पूर्ण खरं नाही. त्वचेचा मुलायमपणा व टवटवी टिकवून ठेवण्यासाठी स्किन एक्सफोलिएशनची गरज असते. ज्यामुळे मृत पेशी निघण्याबरोबरच रक्ताभिसरण होण्यासही मदत होते. एक्सफोलिएशनसाठी सौम्य व सी मिनरलयुक्त स्क्रबचा वापर करणं अधिक फायदेशीर असते.

बॉडी रॅप

हिवाळ्यात बॉडी स्पामध्ये बॉडी रॅप ट्रीटमेंट घेतल्याने शरीरात उत्साह, स्फूर्ती येते. या ट्रीटमेंटमध्ये शरीरावर तऱ्हेतऱ्हेचे लेप लावले जातात. ज्यामुळे मृत पेशी काढण्याबरोबरच त्वचेचा पोतही सुंदर बनवतात. या रॅप्समध्ये मड, सीमड इ मुख्य आहेत.

रिफ्रेशिंग फेशिअल वाइप्स

चेहरा सतत स्वच्छ करण्यासाठी फेसवॉशचा वापर करण्याऐवजी फेशिअल वाइप्सचा वापर करावा, कारण फेशिअल वाइप्स त्वचा शुष्क न करता तुमच्या त्वचेला तजेलदार, स्वच्छ व चमकदार बनवू शकतात.

ग्लोइंग मेकअप

हिवाळ्यात गार वातावरणामुळे त्वचेचं सौंदर्य हरवते व त्यामुळे मेकअप केल्यानंतरही चेहऱ्यावर उठावदारपणा येत नाही. म्हणून नैसर्गिक चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आधी चेहऱ्याला  मॉइश्चरायझर करावे. मग स्कीनटोनच्या १ शेड डीपर मॅट पावडरचा वापर कपाळ, नाक व गालांवर करावा. निर्जीव त्वचा सतेज दिसावी म्हणून फाईन हायलायटरचा वापर करावा. मग ग्लॅमर ग्लोने फायनल टच द्यावा. ग्लॅमर ग्लो पावडरने तुमची त्वचा तजेलदार व सौम्य दिसेलय

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...