– मोनिका अग्रवाल
तुम्ही तंदुरुस्त राहू इच्छित असाल, तर काही टीप्सचा तुम्ही अवलंब केला पाहिजे. तुमचं वजन कमी करण्यासाठी तुम्ही व्यायाम करता आणि डाएटही कंट्रोल करता. सुरूवात तर एकदम उत्साहाने करता, पण काही वेळाने हा उत्साह धरू लागतो आणि तुम्ही फास्टफूड खायला सुरूवात करता. मग हळु हळु पुर्वपदावर येता, असं तुम्हीच नाही तर प्रत्येक स्त्री करते.
फिट राहण्यासाठी ध्येय ठरवा
तुम्हाला सर्वात आधी ध्येय ठरवावं लागेल की कशाप्रकारे तुम्हाला फिटनेस हवा आहे. यासाठी तुम्ही मोठे नाही तर लहान ध्येय ठेवा. फिटनेस दिवा शिल्पा शेट्टीनुसार फिट राहण्यासाठी स्मार्ट ध्येय निश्चित करा. स्मार्ट ध्येय म्हणजे असा व्यायाम करा की जो सहजतेने करता येईल आणि परिणामही लवकर समोर येईल. सुरूवातीच्या दिवसात थोडं अंतरच पळा जे १५-२० मिनिटातच पूर्ण केलं जाऊ शकेल.
ठरवून जेवण तयार करा
कामाची घाई गडबड असो अन्य आणखीन काही महत्वाचा कार्यक्रम असो वेळेवर खाल्लंच पाहिजे. खाण्याची वेळ टाळू नये वा हलगर्जीपणा करू नये. योजना आखून पूर्ण आठवडयासाठी पोषण तत्वांनी परिपूर्ण असं जेवण बनवा. थोडा वेळ काढून पोषक तत्वांनी युक्त जेवण गरम करून खात जा. घरातून बाहेर जाताना आपलं जेवण आणि पाणी सोबत घेऊन जा.
चांगला जोडीदार निवडा
फिट राहण्यासाठी एका चांगल्या साथीदाराची निवड करा. त्यामुळे तुमच्यात उत्साह संचारेल. दोघं एकमेकांना प्रेरित कराल आणि रोजच्या दिनक्रमात उशीर होणार नाही. शक्य असेल तर एखाद्या व्यायाम शिकविणाऱ्या इंस्ट्रक्टरचा सल्ला घ्या.
मनावर नियंत्रण ठेवा
समजा बर्गर, पिझ्झा, चाट तुमची आवड आहे आणि तुम्ही ते बघून स्वत:वर नियंत्रण ठेवू शकत नाही, तर आपला मार्ग बदला. खाण्याची इच्छा झाली, राहावलं नसेल तरी या भावनांवर नियंत्रण ठेवणं आपल्याच हाती आहे.
व्यायामाचा आनंद घ्या
फक्त कॅलरी कमी करायची आहे, हा विचार करून व्यायाम करू नका. तुम्हाला जे काम करायला आवडतं जसं की घराची सफाई, बागकाम, नृत्य यासारखी कामं मन लावून करा. आनंद घेत बॅडमिंटन, रश्शीउडया, टेनिस खेळणे वगैरे फिटनेस मेण्टेन करायचे सोपे प्रकार आहेत.
स्वत:ला बदला
जर दररोजच्या आयुष्याला कंटाळला असाल तर काहीतरी नवीन करा, ज्याने तुम्हाला आनंद मिळेल. जेव्हा फार कंटाळा येईल, तेव्हा काहीतरी नवीन करा, मग भले ते स्वयंपाक करणं असेल किंवा डांसिंग असेल किंवा इतर काही हलकफुलकं जे तुम्ही ऐन्जॉय कराल.
व्यस्त राहा स्वस्थ रहा
बारीक व्हायचं आहे, हा विचार करुन स्वत:ला त्रास करून घेऊ नका. काहीच न खाणं किंवा शिळं अन्न खाणं योग्य नाही. मनावर नियत्रंण ठेवून हलकंफुलकं आणि पौष्टीक खा. भरपूर पाणी प्या. उपाशी पोटी राहू नका आणि नियमित व्यायाम करा. विश्वास ठेवा तुम्हाला पाहुन आरसाही लाजेल.