रुचिता जुनेजा कपूर

साहित्य

* ५०० ग्रॅम मुळा
* १५० ग्रॅम उकडलेले बटाटे
* १ छोटा कांदा
* अर्धा छोटा चमचा गरम मसाला
* अर्धा छोटा चमचा लाल तिखट
* चिमूटभर ओवा
* २-३ मोठे चमचे पीठ.

ग्रेव्हीसाठी साहित्य

* २-३ लसूण पाकळ्या
* १ छोटा आल्याचा तुकडा
* २ कांदे

* ५० ग्रॅम टोमॅटो प्यूरी
* २ अक्रोड
* ४ काजू
* १ छोटा चमचा वेलची पूड
* १ मोठा चमचा धणे पूड

* अर्धा छोटा चमचा जिरे पूड
* २ मोठे चमचे तेल

* ५० ग्रॅम मलई
* २ तमालपत्र
* मीठ चवीनुसार.

कृती

मुळा आणि कांदा एकत्र किसून घ्या. त्यात बटाटा, पीठ, मीठ, अर्धा गरम मसाला, अर्ध लाल तिखट आणि ओवा घालून व्यवस्थित मिसळून घ्या. मग या मिश्रणाचे कोफ्ते बनवून तळून घ्या. अक्रोड आणि काजू २-३ मिनिटं पाण्यात भिजत घाला. त्यानंतर आलं-लसूण, कांदा, काजू आणि अक्रोडची पेस्ट बनवून घ्या. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कांदा पेस्ट गुलाबी रंगावर परतून घ्या. मग यात टोमॅटो प्यूरी, धणे पूड, वेलची पूड, जिरे पूड, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ घालून परतून घ्या. यात थोडे पाणी घालून ग्रेव्हीला उकळी येऊ द्या. ग्रेव्ही तयार झाल्यानंतर त्यात कोफ्ते घालून सर्व्ह करावे.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...