* शोभा कटारे

अलीकडे आपण आपल्या आरोग्याबाबत खूपच जागरूक राहतो. यासाठी आपण चांगलं खाणपिणं, पोषण, फिटनेस, ऑरगॅनिक उत्पादनं आणि पर्यावरणाकुल प्रथांवर अधिक लक्ष देतो. परंतु आपण कधी अस्वस्थ म्हणजेच बिघडलेल्या नात्यांबद्दल विचार केला आहे का? बिघडलेले वा वाईट नातेसंबंधदेखील आपल्या आरोग्यासाठी फास्ट फूड आणि प्रदूषणाप्रमाणे हानिकारक असू शकतात. बिघडलेली नाती आपल्याला बेचैन, उदास, घाबरवून टाकण्याची अनुभूती देऊ शकतात, सोबतच मानसिकरित्या आजारी आणि कमकुवतदेखील बनवू शकतात. नाती आपल्या जन्मापासून मरणापर्यंत आपल्यामध्ये राहतात. नाती आपले आई-बाबा, कुंटुंबिय, सहकारी, मित्र इत्यादींपासून सुरू होतात. यापैकी प्रत्येक नातं आपल्याला मदत करू शकतं आणि आपल्याला समृद्ध आणि चांगली व्यक्ती बनू शकतं, सोबतच आपल्याला आनंद देऊ शकतात. अस्वस्थ नाती कधीच यापैकी कोणत्याही भावनांना पाठिंबा देऊ शकत नाहीत.

आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपण आपल्या भावनिक आणि मानसिक आरोग्याला अशा प्रकारे सुरक्षित ठेवावं ज्या प्रकारे आपण आपल्या शारीरिक आरोग्याला सुरक्षित ठेवतो.

खरंतर निरोगी आणि अस्वस्थ नातीं आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक आरसादेखील असतात. काही नाती तर आपल्याला जन्म घेताच मिळतात जसं की आईबाबा, भाऊबहीण, मावशी वा आत्या इत्यादी जे आपल्याला स्वीकारावे लागतात, परंतु काही नाती जसं की पतीपत्नी, मैत्री, शेजारी, ऑफिस सहकारी इत्यादीमध्ये जी नाती बनतात ती एक तर आपल्या मर्जीने वा आवडीने बनतात. हा, एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती की नाती बनवणं खूपच सोपं असलं तरी ती सांभाळणं वा साकारणं देखील एक कला आहे. हे कोणीही व्यक्तीसोबत घेऊन जन्म घेत नाही तर त्यावेळी काळाबरोबरच ती शिकली जातात.

कोणत्याही व्यक्तीचं यश फक्त त्याची आर्थिक परिस्थिती वा करिअरने ठरत नाही, तर हे देखील बघितलं जातं की त्याचे मित्र, नातेवाईकांशी संबंध कसे आहेत. जर नाती निरोगी असतील तर त्याला एक यशस्वी व्यक्ती मानलं जातं आणि जर तो बिघडलेल्या नात्यांसोबत राहत असेल तर त्याची मोजदाद एक अयशस्वी आणि वाईट माणसाच्या रूपात केली जाते. म्हणून निरोगी आणि बिघडलेली नाती आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक आरसा देखील असतो.

निरोगी नात्यांसाठी काही गोष्टी मदतनीस ठरतात :

चांगले श्रोता बना

दीर्घकाळपर्यंत नातं चांगलं ठेवण्यासाठी गरजेचं आहे की तुम्ही एक श्रोता व्हा म्हणजेच दुसऱ्यांच्या गोष्टी देखील ऐका, स्वत:चंच सुरू करू नका आणि नेहमी हे पाहिलं जातं की ज्या लोकांना फक्त स्वत:चेच सांगण्याची सवय असते त्यांच्यापासून लोक दूर राहतात, तर जी लोकं शांतपणे इतरांच्या गोष्टी ऐकतात त्यांच्यावर सगळेच प्रेम करतात आणि दीर्घकाळपर्यंत त्यांच्याशी जोडले जातात.

अपेक्षा कमीत कमी असाव्यात

नाती तेव्हाच घट्ट होतात जेव्हा अपेक्षा कमीत कमी असतील. अनेक नाती फक्त यासाठी तुटतात की आपण त्यांच्याकडून गरजेपेक्षा जास्त अपेक्षा ठेवू लागतो आणि सतत आपल्या तक्रारींचा पेटारा खोलून बसतो, तसंच हे देखील विसरून जातो की आपण त्यांना काय दिलंय? कसं वागलो आहोत? इत्यादी. निरोगी नात्यांमध्ये नेहमीच देण्याची सवय ठेवा. अपेक्षेची सवय जेवढी कमी असेल नाती तेवढीच जास्त सुंदर आणि दीर्घकाळपर्यंत राहतील.

नात्यांच्या चांगल्या बॉण्डींगसाठी वेळ काढा

आजच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये वा जीवनशैलीमध्ये नात्यांसाठी वेळ काढणं थोडं कठीण होत चाललंय. नातं कोणतंही असो चांगल्या बॉण्डिंगसाठी वेळ देणं गरजेचं आहे कारण एकमेकांना समजून घेणं सोपं जावं अन्यथा वाद आणि भांडणं होण्याची शक्यता असते कारण अनेकदा कोणत्याही नात्यांमध्ये हे ऐकलं जातं की पहा जेव्हा गरज लागली तेव्हा फोन केला वा आला. आता भेटायला वेळ मिळाला वा आता आठवण आली आमची वगैरे वगैरे. या सर्वांपासून वाचण्यासाठी आणि चांगल्या नात्यासाठी तुमच्या धावपळीच्या जीवनशैलीमधूनदेखील आवर्जून वेळ काढा.

यूज अँड थ्रो पासून दूर रहा

कोणत्याही निरोगी नात्यासाठी हे गरजेचे आहे की फक्त कामासाठीच नाही तर नेहमी प्रत्येकवेळी आपल्या प्रियजनांच्या संपर्कात रहा. जर तुम्ही तुमच्या मित्र नातेवाईकांची फक्त कामाच्यावेळी आठवण काढत असाल तर समजून जा की, तुमचं हे नातं जास्त काळपर्यंत टिकणार नाहीये. यामुळे लोकांना वाटू लागतं की तुम्ही स्वार्थी आहात आणि फक्त कामाच्या वेळीच इतरांची आठवण काढता. नाती युज अँड थ्रोच्या श्रेणीत येत नाही. म्हणून फक्त कामासाठी नाही तर नेहमी तुमच्या प्रियजनांच्या संपर्कात रहा. यासाठी खास सणउत्सव जसं की सणवार, नवीन वर्ष, बर्थडे एनिवर्सरी इत्यादीवेळी थोडा वेळ काढून शक्य असेल तर भेटा अन्यथा फोन आठवणीने करा आणि त्यांना शुभेच्छा द्या यामुळे नात्यांमध्ये नेहमी मधुरता राहते.

प्रशंसा करा

प्रशंसा सर्वांनाच आवडते म्हणून प्रशंसा करण्यात कोणत्याही प्रकारचा कंजूषपणा करू नका. हा त्यांच्यासाठी एक मानसिक खुराक असू शकतो. जेव्हा देखील तुमच्यासाठी कोणी काही चांगलं केलं, तुमचं वैयक्तिक, कौटुंबिक वा व्यावसायिक जीवनात यश मिळवलं तर त्यांची प्रशंसा आवर्जून करा. प्रत्येकाला स्पेशल फील होणं आवडतं, म्हणून कधी कधी ही संधी देत राहा. असं केल्याने नात्यांना तणावापासून दूर ठेवता येतं.

इगो दूर ठेवा

जर एखाद्या कारणामुळे नात्यांमध्ये कडवटपणा वा दुरावा आला, भांडण झालं असेल तर तुमच्या इगोला आड येऊ देऊ नका. नात्यांना पुन्हा बनवणं वा जोडणं, भांडण दूर करण्यामध्ये उशीर करू नका. अगोदरच तुम्ही या गोष्टींमध्ये पडू नका. पहिलं पाऊल उचलून तुमच्या समजूतदारपणाचा परिचय द्या आणि नात्यांना निरोगी बनवा.

तुलनेपासून दूर रहा

अनेकदा प्रत्येक नात्यांमध्ये हे पाहिलं जातं की प्रत्येक वेळी आपण तुलना करत राहतो. आपण मी का असं करू, आम्ही का असं करायचं, त्यांनी देखील असं केलं नाही तर मग आम्हीच का करायचं. त्यांनी आपल्याला नाही बोलवलं तर आपण का बोलवायचं वगैरेवगैरे काही असेच प्रश्न आपल्याला विनाकारण त्रास देत असतात म्हणून कोणत्याही नात्याला निरोगी ठेवण्यासाठी तुलना करू नका. तुम्ही तेच करा जे तुम्हाला करायचं आहे आणि समोरच्याला व्यवहार वा देण्याघेण्याची तुलना करू नका. तेव्हाच तुम्ही नात्यांना निरोगी ठेवू शकाल.

तंत्रज्ञानाची मदत घ्या

आजच्या डिजिटल युगात टेक्नॉलॉजी आपल्या दररोजच्या आयुष्याचा एक भाग बनली आहे. अगदी आपण आपल्या स्मार्ट फोनने सोशल मीडिया आणि व्हिडिओ कॉल करून आपल्या जवळच्यांशी जोडले जाण्यावरती खूप विश्वास ठेवू लागलोय. अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीने आपल्या जिवलगांसोबत जोडणं पूर्वीपेक्षा अधिक सहजसोपं झालंय, म्हणून जर खास प्रसंग जसं की बर्थ डे, अॅनिव्हर्सरी वा एखाद्या सणावारी तुमचे मित्र, कुटुंबियांशी कनेक्ट वा जोडले जाण्यासाठी टेक्नॉलॉजीची मदत घ्या.

ईर्षेच्या भावनेपासून दूर राहा

नातं कोणतंही असो जर तुम्ही इर्षेच्या भावनेपासून दूर राहिला तर नक्कीच ते नातं चांगलं राहील. तणावरहित आणि सुंदर होईल कारण अनेकदा पाहिलं जातं की जेव्हा देखील आपण एखाद्या परिचित, नातेवाईक वा एखादा मित्र अथवा भाऊबहिणीकडे काही चांगलं असलं, जसं की त्यांच्याकडे नवीन कार आली वा नवीन घर विकत घेतलं, चांगली नोकरी लागली वा त्यांचा मुलगा अभ्यासात चांगला असेल तर आपल्याला जळफळाट वा इर्षा होऊ लागते की यांच्याकडे सगळं का चांगलं झालंय, ज्यामुळे आपण विनाकारण बेचैन राहतो वा होत असतो. मग उगाचच आपण त्यांचं अभिनंदन करतो आणि खोटी प्रशंसा देखील करतो, परंतु खूपच दु:खी मनाने आणि ही भावना आपल्याला मानसिकरित्या आजारी देखील करू शकते.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...