* फातिमा खातून

अमर आणि रिनाचे नुकतेच लग्न झाले होते. लग्नाला फक्त ६ महिने उलटून गेले होते. सर्व सुरळीत सुरू होते. दोघेही लग्न आणि एकमेकांची सोबत यामुळे खूप आनंदी होते. मात्र, अचानक एक समस्या निर्माण झाली. ती कोणाला सांगता येत नव्हती की, कोणाचा सल्ला घेता येत नव्हता. अचानक आयुष्य बदलल्यासारखे वाटू लागले आणि वैवाहिक जीवनाचा सुरुवातीचा उत्साह थंडावला.

अमरचा विवाहित मित्र समीरला याबद्दल समजले. त्याने हातवारे करून अमरला विचारण्याचा प्रयत्न केला, पण अमरने काहीच उत्तर न दिल्याने एके दिवशी तो पत्नीसह अमरच्या घरी गेला. दोघांनीही अमर आणि रिनाला त्यांच्या समस्यांबद्दल मोकळेपणाने विचारले. त्यानंतर त्या दोघांनीही त्यांच्या समस्या उघडपणे सांगितल्या.

त्या ऐकून समीर आणि त्याची पत्नी हसली. त्यांनी सांगितले की, ते देखील या टप्प्यातून गेले आहेत. त्यांनी त्यावर कोणता उपाय शोधला, हे देखील त्यांनी सांगितले.

त्यांच्या सल्ल्यानुसार, अमर आणि रिनाने आपल्या समस्या सोडवल्या आणि काही दिवस गमावलेला सर्व आनंद त्यांच्या आयुष्यात पुन्हा आला. हे फक्त त्यांच्या मित्राच्या मैत्रीने आणि मदतीमुळे शक्य झाले.

एक पवित्र बंधन

लग्न हे २ जिवांमधील एक सुंदर आणि पवित्र बंधन आहे, जे एकमेकांवर मनापासून प्रेम करतात आणि आयुष्य एकत्र घालवू इच्छितात. परंतु, लग्न हे एक आव्हानात्मक आणि गुंतागुंतीचे नातं आहे, ज्यासाठी दोन्ही जोडीदारांकडून अविरत प्रेम आणि वचनबद्धता आवश्यक असते. जोडप्यांना आनंदी आणि निरोगी वैवाहिक जीवन टिकवून ठेवण्यास उपयुक्त ठरणाऱ्या घटकांपैकी एक म्हणजे मित्रांची मजबूत सोबत, जी प्रोत्साहन, सल्ला आणि मदत मिळवून देऊ शकते.

असे मित्र बना, जे वैवाहिक जीवनाचा रथ पुढे नेतील आणि तो पुढे नेत राहाण्यासाठी मदत करतील.

वैवाहिक जीवनात सोबत उभे राहाण्याचा प्रश्न येतो तेव्हा सर्व मित्र तयार होत नाहीत. काही मित्र वैवाहिक नातेसंबंधासाठी विषारी, नकारात्मक किंवा अगदी कुचकामी ठरू शकतात, तर काही एकनिष्ठ, सकारात्मक आणि मदत करणारे ठरू शकतात. वैवाहिक जीवन धोक्यात आणणारे किंवा धोक्यात घालणारे मित्र टाळा किंवा त्यांना मर्यादेत ठेवा.

गोपनीयतेचा आदर

विवाहित जोडप्यासाठी एका चांगल्या मित्राचे काही गुण असे असू शकतात : जे तुमचे लग्न आणि लग्नाचा आनंद साजरा करतात. ते वैवाहिक समस्या किंवा निर्णयांमध्ये हस्तक्षेप किंवा त्यावर चर्चा करत बसत नाहीत तर नि:पक्षपातीपणे सल्ला देतात.

ज्यांना तुमच्या वैवाहिक सुखाचा किंवा आनंदाचा हेवा वाटत नाही किंवा ते त्यावर टीका करत नाहीत.

असे मित्र ज्यांना तुमच्या वैवाहिक जीवनातील आव्हानं आणि अडचणींबद्दल सहानुभूती असते. जे तुमच्यातील वैवाहिक संघर्ष किंवा वादांचे प्रामाणिकपणे मूल्यांकन करतात. तुम्हाला दोष देत नाहीत किंवा निराश होऊ देत नाहीत.

व्यक्तिगत मैत्रीत समतोल साधणे

आजच्या युगात, व्यक्तिगत मैत्री वैवाहिक जीवनाबाहेरील आपली ओळख आणि आवड जपण्यासाठी महत्त्वाची ठरते. वैवाहिक संबंध आणि त्यातील समाधान वाढवण्यासाठी एखाद्या विवाहित जोडप्याशी मैत्री असणे देखील फायदेशीर ठरते. ही दोन विवाहित जोडप्यांमधील अशी मैत्री असते जी समान मूल्य, लक्ष्य यावर आधारीत असून एकमेकांच्या भावना समजून घेते. अशी मैत्री एकत्र येण्याची, शिकण्याची आणि एकत्र पुढे जाण्याची संधी देऊ शकते.

परंतु, जर एका जोडीदाराचे दुसऱ्यापेक्षा जास्त किंवा कमी मित्र असतील किंवा एखाद्या जोडीदाराच्या मित्रांचे दुसऱ्या जोडीदाराच्या मित्रांशी पटत नसेल तर. मात्र अशा मैत्रीत समतोल साधणे कठीण होऊ शकते. अशा मैत्रीत निखळ समतोल साधण्यासाठी काही टिपा :

* तुमच्या व्यक्तिगत आणि विवाहित जोडप्याच्या मैत्रीबद्दलच्या, तुमच्या अपेक्षा आणि प्राधान्यांबद्दल तुमच्या जोडीदाराशी संवाद साधा. यासंदर्भातील तुमची चर्चा प्रामाणिक, आदरयुक्त आणि लवचिक असावी.

* व्यक्तिगत आणि विवाहित जोडपे, अशा दोन्ही मैत्रीसाठी वेळ ठरवा. तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी आणि तुमच्या संसारासाठी तसेच तुमचे मित्र आणि स्वत:साठी पुरेसा वेळ देत आहात, याची खात्री करा.

* नवीन जोडपे मित्र शोधा, जे तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराप्रमाणे समान मूल्यं, ध्येय आणि तशी कृती करणारे असेल. अशा प्रकारचे गट किंवा क्लबमध्ये सहभागी व्हा किंवा तुमच्या विद्यमान मित्रांना त्यांना ओळखत असलेल्या इतर जोडप्यांशी तुमची ओळख करून देण्यास सांगा.

सल्ला आणि मार्गदर्शन घ्या

कधीकधी जोडप्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनात आव्हाने किंवा समस्यांना सामोरे जावे लागते, ज्या ते स्वत: सोडवू शकत नाहीत. अशा परिस्थितीत, विश्वासू मित्रांकडून सल्ला आणि मार्गदर्शन घेणे उपयुक्त तसेच आश्वासक ठरू शकते. विश्वासू मित्र हे असे मित्र असतात ज्यांच्या मनात वैवाहिक जीवनासाठीचे सर्वोत्तम हित असते, ज्यांना वैवाहिक समस्या हाताळण्याचा अनुभव आणि ज्ञान असते आणि जे वस्तुनिष्ठ तसेच नि:पक्षपाती दृष्टिकोन ठेवून सल्ला देऊ शकतात.

परंतु, विश्वसनीय मित्रांकडून सल्ला आणि मार्गदर्शन घेताना ते सावधगिरीने आणि विवेकबुद्धीने घेतले पाहिजे, कारण सर्व मित्र अचूक आणि उपयुक्त सल्ला देण्यास सक्षम नसतात. विश्वसनीय मित्रांकडून सल्ला आणि मार्गदर्शन मिळविण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वं असू शकतात :

* तुमचा कोणावर विश्वास आहे ते काळजीपूर्वक ठरवा. अशा मित्रांना टाळा ज्यांचे गुप्त हेतू, छुपे अजेंडा किंवा वैयक्तिक पूर्वग्रह असू शकतात. त्यांनी कोणत्याही बाबतीत दिलेला सल्ला तुमच्या नात्यावर परिणाम करू शकतो. तुमच्या लग्नाबद्दल अफवा पसरवणारे, गप्पा मारत बसणारे किंवा तुमची गुपितं सर्वत्र पसरवणारे मित्र टाळा.

* तुम्हाला तुमच्या मित्रांकडून काय हवे आहे ते आधीच ठरवा. त्यांनी ऐकावे, सहानुभूती दाखवावी, सल्ला द्यावा किंवा हस्तक्षेप करावा अशी तुमची इच्छा आहे का? त्यांनी तुमचे संभाषण खासगी ठेवावे किंवा त्याबद्दल इतरांना सांगावे, असे तुम्हाला वाटते का? त्यांनी याचा पाठपुरावा करावा की ते सोडून द्यावे असे तुम्हाला वाटते का? आपल्या अपेक्षा आणि मर्यादा स्पष्टपणे सांगा.

* वेगवेगळ्या कल्पना आणि दृष्टिकोनांसाठी मनमोकळेपणाने वागा. मित्रांचा सल्ला नाकारू नका. तुम्हाला तो आवडला नसला तरीही तो नाकारू नका किंवा वाद घालू नका.

विवाहित मित्रांची भूमिका

विवाहित मित्र असणेदेखील वैवाहिक नाते मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते, कारण ते वैवाहिक नातेसंबंधासाठी सकारात्मक आदर्श, प्रेरणा आणि प्रोत्साहन देऊ शकतात. विवाहित मित्र वैवाहिक नातेसंबंधांसाठी सल्ला, अनुभव आणि तुलना करण्यासाठीचा स्त्रोत म्हणून देखील काम करू शकतात, कारण ते अनुभव, प्रशंसा आणि सुयोग्य टीका करू शकतात ज्यामुळे जोडप्यांना त्यांचे वैवाहिक जीवन सुधारण्यास आणि पुढे घेऊन जाण्यास मदत होऊ शकते.

काही असे मार्ग ज्याद्वारे विवाहित मित्र वैवाहिक नातेसंबंध मजबूत करू शकतात :

* ते निरोगी आणि यशस्वी वैवाहिक वर्तन आणि पद्धती जसे की संवाद साधणे, वादाचे निराकरण, आत्मीयता आणि सहकार्य दर्शवू शकतात. जोडपे त्यांच्या विवाहित मित्रांच्या उदाहरणांवरून शिकू शकतात आणि ती शिकवण त्यांच्या स्वत:च्या संसारात आचरणात आणू शकतात.

* ते त्यांच्या लग्नाची गोष्ट, अनुभव आणि धडे, चांगले आणि वाईट दोन्ही एकमेकांना सांगू शकतात. जोडप्यांना त्यांच्या विवाहित मित्रांच्या शहाणपणाचा आणि ज्ञानाचा फायदा होऊ शकतो आणि ते त्यांच्या वैवाहिक जीवनात समान चुका किंवा अडचणी टाळू शकतात.

* ते एकमेकांना प्रोत्साहन देऊ शकतात आणि त्यांच्या वैवाहिक ध्येयांचा आणि स्वप्नांचा पाठपुरावा करू शकतात जसे की सहलीला जाणे, पालकत्व स्वीकारणे किंवा व्यवसाय सुरू करणे. ते एकमेकांना आनंद देऊ शकतात आणि आपल्या लग्नात एकमेकांचे यश, सुखाचा आनंद साजरा करू शकतात.

* ते त्यांच्या लग्नातील नवीन आणि रोमांचक पैलू जसे की, त्यांचा छंद, आवड किंवा नवनवीन कल्पनांचा शोध घेऊन एकमेकांना आव्हान देऊ शकतात आणि प्रोत्साहित करू शकतात. जोडपे त्यांच्या विवाहित मित्रांसोबत नवीन गोष्टींचा अनुभव घेत आपल्या लग्नाला एक आनंद सोहळा बनवू शकतात. लग्नाला नेहमीच नवे आणि आनंददायी ठेवू शकतात.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...