* प्रज्ञा पांडेय मनु

है तुझे भी इजाजत कर ले तू भी मुहब्बत….’ हे गाणं सुरू होतं आणि मी विचार करू लागली की प्रेम करण्यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागते का? प्रेमाबद्दल तर असं म्हटलं जातं की ही ती आग आहे जी न लावता लागते आणि न विझवता विझते. तर जर ही आग कोणाच्या मनामध्ये कोणाबाबत लागली असेल तर त्या स्त्री वा पुरुषाने काय करावं.

आता काय फरक पडतो की तो विवाहित आहे का अविवाहित. जर वैवाहिक आयुष्य खूपच कंटाळवाणं आहे. बस आयुष्य असंच चाललं आहे. जबाबदारीचं ओझं मनात नसतानादेखील वाहण्याला आयुष्य म्हटलं जात नाही.

तुमच्या जोडीदारासोबत वैचारिक मतभेद आहेत वा मन जुळत नाहीये आणि तुम्ही मुलं आणि कुटुंबीयांसाठी समाजात एकत्र आहात. मनात कोणतीही आशा वा तरंग नाहीये, तर अशावेळी तुम्हाला कोणी चांगलं वाटत असेल, ज्याच्याकडे तुम्ही तुमचं मन व्यक्त करता वा तो दोन प्रेमाचे शब्द बोलतो आणि मग त्या शब्दांची जादुने तुम्हाला दिवसभर मोहविते, तुम्ही गुणगुणत राहता, आरसा पाहून स्वत:ला सजवता तर यामध्ये काय वाईट आहे? माझ्या मते तर काहीच चुकीचं नाहीये.

स्वत:चं समाधान गरजेचं

तुम्ही तुमच्या तनामनाचे समाधान करू शकता आणि इश्क मोहब्बत तर प्रत्येक काळात झालं होतं, होत आहे आणि पुढेदेखील होणार. हे खरं आहे की वैवाहिक आयुष्यात एखादा परपुरुषाशी प्रेम होता कामा नये परंतु जर वय वैवाहिक आयुष्यात आपापसात प्रेम नसेल आणि जर बाहेर कोणाशी प्रेम जमलं तर त्यामध्ये काहीच चुकीचं नाहीये.

हा निसर्गाचा नियम आहे की जी जमीन उजाड असते निसर्ग त्याला त्याच्या हिशोबाने रान, गवताने भरतो म्हणजेच वैवाहिक लोकांचं प्रेमरूपी मन रिकामी कुंडी रहायला नको, परंतु जर रिकामी वा ते उजाडलेलं असेल तर निसर्ग त्यामध्ये त्याच्या हिशोबाने एखादी वनस्पती उगवतं. हा नियम शाश्वत आहे.

कुठे आहे बुद्धिमत्ता

तर नैतिकतेबद्दल बोलणाऱ्यांनो स्वत:ला मारणं कुठची हुशारी आहे आणि हे तर आपण पौराणिक कथांमध्ये देखील वाचतो. देवतादेखील प्रेम करतात मग आपण तर माणसं आहोत. जर कोणाला खरं प्रेम मिळत असेल तर ते नाकारणं कोणता समजूतदारपणा नाहीये. जर तुम्ही कोणत्या कारणांनी जोडीदारा सोबत आनंदी नसाल, तर कोणालाच तुम्ही आनंद देऊ शकत नाही. जर तुम्ही तुमचं तन्मन एखाद्याकडे व्यक्त करत असाल तर त्यामध्ये काही चुकीचं काम नाहीये. थोडं विचित्र वाटू शकतं लोकांना कारण आपल्या देशामध्ये आजदेखील काही मुद्द्यांवरती लोकं मोकळेपणाने बोलत नाहीत.

आयुष्य पुन्हा मिळणार नाही

असं अजिबात होता कामा नये की उद्या ती व्यक्ती तुम्हाला ब्लॅकमेल करेल आणि तुम्ही समाजाला तोंड दाखवण्यालायक राहणार नाही आणि विनोदाचं पात्र बनाल, ते वेगळंच. परंतु जर खरं प्रेम तुम्हाला मिळत असेल, जे काही कारणाने तुमच्या दाम्पत्य जीवनात नाहीये, तर तुम्ही ते प्रेमाने स्वीकारायला हवं कारण आयुष्य काही पुन्हा मिळणार नाही.

आयुष्य जगण्यासाठीच बनलेलं आहे आणि जगण्यासाठी जोडीदार हवा आणि हे गरजेच नाहीये की जीवनसाथी तुमचा खरा साथी असावा. आदर्श व्यवस्था तर हीच आहे की जीवनसाथीकडून भरपूर प्रेम, सहकार्य आणि सहयोग मिळालं, परंतु जर हे काही कारणांमुळे मिळत नसेल तर तुम्हाला पूर्ण हक्क आहे ते प्रेम मिळवण्याचा.

लक्षात ठेवा

जीवन जीना सहज न जाने
बहुत बडी फनकारी है
खुद को भी खुश रखना
खुद की ही जिम्मेदारी है

म्हणजेच सर्वांना आनंदी ठेवणं पुरेसं नाहीये स्वत:ला देखील खुश ठेवायला हवं.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...