* प्रतिनिधी

मटार टिक्की

काय लागेल

*  १ कप उकडलेले मटार

*  ४ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे मॅश करून

*  २ मोठे चमचे मैदा

*  १ मोठा चमचा कांदा बारीक चिरलेला

*  १ छोटा चमचा आलं बारीक चिरलेलं

*  १ छोटा चमचा हिरवी मिरची बारीक चिरलेली

*  १ छोटा चमचा आमचूर पावडर

*  चिमूटभर हिंग

*  अर्धा छोटा चमचा जिरं

*  १ मोठा चमचा धने पावडर

*  अर्धा छोटा चमचा गरम मसाला

*  अर्धा छोटा चमचा लाल तिखट

*  तेल तळण्यासाठी

*  मीठ चवीपुरतं.

कसं कराल

एका बाऊलमध्ये मॅश केलेले बटाटे आणि मैदा टाकून व्यवस्थित एकत्रित करून डो बनवा. आता कढईत एक चमचा तेल टाकून गरम करा. यामध्ये हिंग, जिरं, आलं, कांदा आणि हिरवी मिरची टाकून परतवा. उकडलेले मटार आणि सर्व मसाले एकत्रित करून परतवा. बटाटा आणि मैद्याच्या मिश्रणात अर्धा छोटा चमचा मीठ टाकून पुन्हा एकदा मळून ठेवा. याचे लिंबाच्या आकाराचे छोटे मोठे गोळे बनवा. एका गोळ्याला हातावर ठेवून पसरवा. यावर एक मोठा चमचा मटारचं मिश्रण ठेवून बंद करा आणि त्याला टिक्कीचा आकार द्या. अशा प्रकारे सर्व टिक्या बनवून घ्या. तव्यावर तेल टाकून गरम होताच टिक्की मध्यम आचेवर सोनेरी होईपर्यंत परतवा. मटर टिक्की तयार आहे. हे हिरवी चटणी, सुंठ आणि दहीसोबत सर्व्ह करा.

टेस्टी कॅप्सिकम लॉलीपॉप

काय लागेल

*  १ कप बारीक रवा

*  २ मोठे चमचे आरारोट

*  पाव हिरवी शिमला मिरची

*  पाव पिवळी शिमला मिरची

*  अर्धा कप बटाटे उकडून मॅश केलेले

*  पाव लाल शिमला मिरची

*  २ हिरव्या मिरच्या

*  अर्धा कांदा

*  पाव काकडी

*  २ मोठे चमचे कोथिंबीर

*  १ पेर आलं

*  १ छोटा चमचा रेड चिली फ्लेक्स

*  १ छोटा चमचा चाट मसाला

*  पाव कप हिरवी चटणी

*  तळण्यासाठी तेल तसंच काही आईस्क्रीम स्टिक्स

*  मीठ चवीनुसार.

कसं कराल

सर्व भाज्या बारीक चिरून घ्या. हिरवी चटणी, तेल तसंच आईस्क्रीम स्टिक सोडून सर्व साहित्य एका बाऊलमध्ये टाकून व्यवस्थित मळून घ्या. गरज असल्यास थोडं पाणी घेऊ शकता. १० मिनिटानंतर तयार मिश्रणाचे लिंबाच्या आकाराचे बॉल्स बनवा. त्यांना हातावर दाबा आणि यामध्ये आईस्क्रीम स्टिक्स लावून लॉलीपॉप बनवा. पॅनमध्ये तेल गरम करा. तयार लॉलीपॉप्स मध्यम आचेवर सोनेरी होईपर्यंत फ्राय करून हिरव्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

मसाला राईस डोनट

काय लागेल

*  २ कप भात

*  २ मोठे चमचे कॉर्नफ्लोअर

*  २ उकडलेले बटाटे

*  १ मोठा चमचा कांदा बारीक चिरलेला

*  २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या

*  १ छोटा चमचा आल्याचे काप

*  पाव छोटा चमचा आमचूर पावडर

*  पाव छोटा चमचा लाल तिखट

*  अर्धा छोटा चमचा चाट मसाला

*  पाव चमचा गरम मसाला

*  थोडेसे छोले उकडलेले आणि तेल तळण्यासाठी

*  मीठ चवीनुसार.

कसं कराल

दोन्ही बटाट्याची साल काढून घ्या. एकाला मॅश करा आणि दुसऱ्याचे छोटे तुकडे करा. भात मॅश करून मॅश केलेल्या बटाट्यासोबत एकत्रित करा. तेल, आल्याचे काप व उकडलेले छोले सोडून सर्व साहित्य यामध्ये व्यवस्थित एकत्रित करून डो बनवून घ्या. या डो ला तेल लागलेल्या सिलिकॉनच्या डोनट्स मोल्समध्ये भरून डोनट बनवा. कढईमध्ये तेल गरम करा. सर्व डोनट तेलामध्ये टाकून मध्यम आचेवर सोनेरी होईपर्यंत तळा. मसाला राईस डोनट बटाट्याचे तुकडे, उकडलेले छोले व टोमॅटो केचपसोबत सर्व्ह करा.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...