* प्रतिनिधी
शरीराच्या इतर त्वचेच्या तुलनेत डोक्याच्या त्वचेवर सर्वात जास्त ऑइल ग्लँड्स असतात, तरीदेखील ड्राय स्काल्फची समस्या सर्वसामान्य आहे. याचे मुख्य कारण आहे बदललेलं ऋतुमान. अनेकदा उन्हाळ्यात स्काल्फवर सन बर्नदेखील होतं ज्यामुळे समर सीझनमध्येदेखील ड्राय स्काल्फची समस्या निर्माण होते. परंतु विंटरमध्ये ही जास्त होते. ड्राय स्काल्फ असेल तर डँड्रफ येईलंच असं गरजेचं नाही. दोन्ही लक्षणांमध्ये काही समानता नक्कीच आहे. परंतु दोघांमधील समस्या दूर करण्यासाठी थोडी वेगळी पद्धत आहे.
चला जाणून घेऊया या दोन्ही समस्यांपासून सुटका होण्यासाठी काय कराल :
* जर अचानक तुमचे केस आणि स्काल्फ ड्राय होऊ लागलं तर तुम्ही स्वत:ला व्यवस्थित हायड्रेट करू शकत नाही वा मग तुम्ही असं एखादं केमिकलवालं उत्पादन डोक्यांवर व केसांसाठी वापरता जे तुमच्या त्वचेला सूट नाही करणार.
* ड्राय स्काल्फची समस्या जास्त वाढली आहे आणि यीस्टदेखील जमा होऊ लागलं असेल तर डर्मेटोलॉजिस्टला भेटा. जर ऋतू बदलल्यामुळे ड्राय स्काल्फची समस्या निर्माण झाली असेल तर वेळोवेळी चांगल्या पार्लरमधून हेअर स्पा घेऊ शकता वा मग एक्सपोलिएट करू शकता.
* एलोवेरा जेल अलीकडे बाजारात सहजपणे उपलब्ध आहे, याचा सरळ वापर करू शकता.
* केस धुण्याच्या १-२ तास अगोदर जोजोबा वा मग नारळाच्या तेलाने मालिश करा.
* असे स्काल्फ मास्क ज्यामध्ये एलोवेरा व माइंड एक्सपोलिएन्टचा वापर आठवड्यातून दोनदा करू शकता.
* स्काल्फ आणि केसांना प्रोटेक्शन देण्यासाठी स्काल्फ नॅचरल ऑइल प्रोड्यूस करतं परंतु जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त हेड वॉश केलं तर ड्रायनेसची समस्या वाढेल.
* जास्त केमिकल सल्फेट्स वा फ्रेगरेन्स शाम्पू स्काल्फचं नुकसान करतं. यापासून दूर राहा.
* चांगल्या कंपनीच्या हायड्रेटींग हेअर सिरमचा वापर ड्राय स्काल्प आणि डँड्रफ दोन्ही समस्या कमी करेल.
टिप्स
* ऑइल बेस्ड शाम्पू निवडू शकता. कोणत्याही साईड इफेक्टच्या डँड्रफची समस्या कमी करू शकतो.
* अलीकडे बाजारात पायरीथीऑन इन्ग्रेडियंटवाला शाम्पू उपलब्ध आहे. डँड्रफची समस्या जास्त असेल तर ते ट्राय करू शकता.
* डँड्रफची समस्या असेल तर हेअर स्ट्रेटनर आणि ब्लो ड्रायरचा वापर अजिबात करू नका. हीटिंग टूल्स स्काल्फला अधिक ड्राय करू शकतात, ज्यामुळे इचिंग वाढेल.
* स्काल्फला हेल्दी बनवायचं असेल तर तुमच्या डायटमध्ये काबुली चणे, आलं, सफरचंद, केळं आणि सनफ्लॉवर सीड्सचा समतोल वापर करायला सुरुवात करा.
* पांढरा पास्ता, शुगर कँडी, पोटॅटो चिप्स, कुकीज, मफीन्स, फ्लेवर्ड योगर्ट आणि जास्त गोड डिशेस हाय कार्बज असतात, त्या डँड्रफच्या समस्येला अधिक वाढवतात.
* डेली हेअर ऑइलिंगने डँड्रफ निघून जातो हे एक मिथ आहे. असं केल्यामुळे डँड्रफ स्काल्फला चिकटतं.





