* दीपेश कारीवाला

स्त्रीचे जीवन अनेक चढ-उतारांमधून जात असते. जीवनात वेगवेगळ्या भूमिका साकारत असताना तिच्या शरीरात अनेक बदल होतात, त्यामुळे वेळोवेळी आरोग्य आणि निरोगीपणाशी संबंधित प्रश्न तिच्यासमोर उभे राहातात. अशावेळी प्रश्न पडतो की, या प्रश्नांची उत्तरं शोधायची कुठे? इंटरनेटच्या जंगलातील कोणत्या माहितीवर विश्वास ठेवला जाऊ शकतो आणि कोणत्या माहितीवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही? स्त्रियांना या कोंडीतून बाहेर काढण्यासाठी आम्ही तरुणींच्या आरोग्य आणि निरोगीपणाशी संबंधित १० महत्त्वाच्या वेबसाइट्स संकलित केल्या आहेत. तुमच्या आरोग्याशी संबंधित विविध विषयांवर   तुम्हाला चोखंदळ माहिती कुठून मिळेल ते पाहू या :

हेल्दी वूमन

अमेरिका आधारित ही वेबसाइट स्त्रियांच्या आरोग्य आणि निरोगीपणाच्या क्षेत्रातील दुरावा भरून काढते. येथे तुम्हाला पालकत्व, लिंग, नातेसंबंध, सुदृढ आरोग्य आणि गर्भधारणेशी संबंधित विविध लेख सापडतील. वेळोवेळी, विविध तज्ज्ञांच्या सेवादेखील येथे उपलब्ध केल्या जातात, ज्यांना तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता.

सेक्स विथ एमिली

सेक्स हा एक असा विषय आहे ज्याबद्दल तुमच्या मनात सर्वात जास्त प्रश्न असतात आणि अनेक स्त्रिया त्याबद्दल बोलण्यास कचरतात. इंटरनेटचे जगही या विषयावरील अपूर्ण आणि चुकीच्या माहितीने भरलेले आहे. सेक्स विथ एमिली या साइटवर सेक्स आणि रिलेशनशिप तज्ज्ञ डॉ. एमिली मॅरिस या सर्व विषयांवर मोकळेपणाने बोलतात. येथे तुम्ही विविध विषयांवरील लेख वाचू शकता, पॉडकास्ट ऐकू शकता आणि एमिलीला तुमचे प्रश्न विचारू शकता.

टोन इट अप

जेव्हा वर्कआउटचा विचार केला जातो तेव्हा स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमकुवत मानले जाते. या वेबसाइटमध्ये, करीना आणि कतरिना तुम्हाला फिटनेस आणि विविध व्यायामांबद्दल सांगतात, तसेच कठोर वर्कआउट्स आणि बॉडी बिल्डिंगच्या क्षेत्रातील स्त्रियांना प्रेरणा देतात. स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला या वेबसाइटवर भरपूर साहित्य मिळेल.

वेलनेस मामा

आई झाल्यानंतर स्त्रीच्या आयुष्यात खूप बदल होतात. ६ मुलांची आई असलेली कॅटी वेलिस या ब्लॉगद्वारे तुम्हाला मुलांसोबत जीवन जुळवून घेण्यास मदत करते. येथे तुम्हाला आरोग्यदायी पाककृती, मुलांच्या आवडीचे पौष्टिक पदार्थ तयार करणे आणि मुलांचे उत्तम संगोपन यासंबंधी सर्व माहिती मिळेल.

फ्लो लिव्हिंग

मासिक पाळी हा एक असा विषय आहे ज्यावर स्त्रिया अनेकदा बोलण्यास कचरतात. ही वेबसाइट तुम्हाला पाळीबद्दल माहिती देते, त्यातील मिथके तोडते आणि या काळात उद्भवणाऱ्या विविध मानसिक तसेच शारीरिक समस्यांशी संबंधित तुमच्या प्रश्नांची उत्तरं देते.

लिव्ह, लव्ह, लाफ फाउंडेशन

नैराश्य ही स्त्रीच्या जीवनातील चढ-उतारांची एक अतिशय सामान्य स्थिती आहे. बऱ्याचदा आपल्याला त्याची लक्षणं देखील माहीत नसतात. नैराश्यातून सावरलेली प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या सामाजिक संस्थेद्वारे चालवली जाणारी ही साइट तुम्हाला मानसिक आरोग्याविषयी महत्त्वाची माहिती देते. नैराश्याशी संबंधित लेख तुम्ही येथे वाचू शकता आणि तुमच्या मनावर आणि हृदयावर काही ओझे असेल तर तुम्ही मनमोकळेपणाने साइटवर उपलब्ध असलेल्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

ऑटोस्ट्रेडल

ही साइट एलजीबीटी समुदायासाठी समर्पित आहे, प्रामुख्याने ती लेस्बियन लैंगिक प्रवृत्ती असलेल्या स्त्रियांना प्रेरणा आणि समर्थन देते. त्यांची लैंगिक निवड ही त्यांची वैयक्तिक बाब आहे आणि त्या आधारावर त्यांच्यावर टीका करण्याचा समाजाला अधिकार नाही, याची जाणीव करून देणारे तसेच या संदर्भातील भरपूर साहित्य या साइटवर उपलब्ध आहे.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...