* सोमा घोष
नवजात शिशुला पहिल्यांदा आंघोळ घालणं पालकांसाठी तसं कठीणच काम असतं. यामध्ये नवीनच बनलेली आई अनेकदा आपली आई, सासू वा एखाद्या मोठ्यांची मदत घेते, परंतु अनेकदा एकटं राहत असल्यास स्वत:ला सर्व काही करावं लागतं. खरंतर डॉक्टरांच्या सल्ल्यासोबत नवजात शिशुला आंघोळ घालण्याची समस्या येत नाही. सोबतच आई-वडिलांचं मुलासोबतच बॉण्डिंगदेखील चांगलं होतं. म्हणूनच डॉक्टरदेखील पालकांना हे शिकण्याचा सल्ला देतात.
याबाबत एक डॉक्टर सांगतात की नवजात शिशुच्या त्वचेतील ओलसरपणा त्वरित निघून जातो, ज्यामुळे कोरडेपणा आणि जळजळ निर्माण होण्याची भीती असते. खरंतर नवीन बाळाची त्वचा मोठ्यांच्या तुलनेत तीन पट अधिक पातळ असल्यामुळे त्वचा दुप्पट वेगाने ओलसरपणा हरवून बसते. बाळाचा पीएचदेखील वाढतो, ज्यामुळे त्यामध्ये कोरडेपणा, जळजळ, चट्टे, सूज होण्याची शक्यता वाढत असते.
‘इंडियन अकॅडमी ऑफ पीडीएट्रिक्स’ (आइएपी)ने नवजात शिशु आणि इतर लहान मुलांसाठी गुणवत्ता पूर्ण त्वचेची देखभाल सुनिश्चित करण्यासाठी मानकी कृत सूचना लागू केल्या आहेत, ज्या खालील प्रमाणे आहेत :
* नवजात शिशुला पहिली आंघोळ जन्माच्या ६ ते २४ तासानंतर घालायला हवी.
* पूर्वी इस्पितळात जन्म होताच त्वरित नवजात बाळाला आंघोळ घालणं एक सामान्य बाब होती, परंतु आता ‘इंडियन अकॅडमी ऑफ पीडीएट्रिक्स’ने सल्ला दिला आहे की जन्मानंतर एकदा जेव्हा बाळ स्थिर होतं, तेव्हा ते साधारणपणे जन्माच्या ६ ते २४ तासाच्यामध्ये असायला हवं, तेव्हाच त्याला आंघोळ घालू शकता. आंघोळ घातल्यानंतर प्रॉडक्ट कोणते असावे त्याची देखील माहिती असणं गरजेचं आहे.
* शिशुसाठी बेबी सेफ क्लीन्जरची निवड करा, जे लार्ज मिसेल्सवालं असावं ते जे बाळाच्या त्वचेमध्ये जाणार नाही.
* अलीकडे बाजारात शिशूंसाठी अनेक उत्पादन आहेत. योग्य उत्पादनाची निवड आई वडिलांसाठी खूपच कठीण होऊन बसतं. अशावेळी अशी उत्पादनं निवडा जी डॉक्टरांकडून टेस्टेड, रिकमंडेड असावीत आणि शिशूंच्या त्वचेसाठी सुरक्षित असावीत. हे उत्पादन शिशुला क्लीन करण्या व्यतिरिक्त त्वचेसाठीदेखील जेंटल असणं गरजेचं आहे.
* वयस्करांनी क्लिंजरच्या तुलनेत मुलांच्या क्लिंजरचे मॉलिक्युल्स मोठ्या आकारात असायला हवेत, जे नवजातासाठी सुरक्षित असतात आणि कोणत्याही प्रकारचे रॅशेज, डोळ्यात जळजळ वा स्किनमध्ये जळजळ होण्याचा धोका नसतो.
* क्लिंजरमध्ये ग्लिसरीन वा खोबरेल तेलासारखे नैसर्गिक तत्त्व असायला हवेत, जे शिशुच्या त्वचेला मॉइश्चराईज करतील आणि त्यामध्ये मायक्रोबायोमला बनवण्यात मदत करते. लक्षात घ्या क्लिंजर त्वचेवरती अॅसिड मेंटल अर्थात घामामध्ये सिबम मिश्रणने बनलेल्या घामाचा एक थर ,ज्याला अॅसिड मेंटल म्हटलं जातं. तर ते प्रभावित न करता नॅचरल मॉइश्चरायिझंग फॅक्टरला न हटवता अशा प्रकारे जेंटल लिक्विड क्लिंजर साधारणपणे त्वचेला सहजपणे स्वच्छ करतं.
* जन्मानंतर पहिल्या दिवशी शिशूला कमीत कमी आंघोळ घाला आणि आंघोळ घालताना पाण्याचे तापमान तपासा.
* आंघोळीच्या पूर्वी गर्भनाळेला कोमट पाण्याने स्वच्छ करून सुकवा आणि स्वच्छ ठेवा. जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्ल्यानुसार संक्रमण रोखण्यासाठी कॉड स्टंपवर काहीही लावू नका.
* शिशुला नेहमी गरम पाण्यानेच आंघोळ घाला. आंघोळीची वेळ ५ ते १० मिनिटापेक्षा अधिक असता कामा नये. थंडीमध्ये शिशूला आठवड्यातून फक्त २ ते ३ वेळा आंघोळ घाला.
* स्पंज आंघोळीच्या तुलनेमध्ये टब स्नान अधिक सुरक्षित आणि आरामदायक पर्याय आहे कारण यामुळे नवजात शिशुच्या शरीराला उब मिळते. बबल बाथ आणि बाथ एडिटीव्सचा वापर करू नका.
* पहिल्या दिवशी आंघोळीत केसांची देखभाल देखील महत्त्वाची असते. गर्भनाळ पडल्यावर बाळाचे केस धुवायला सुरुवात करा. साबणाने बाळाच्या डोळ्यांमध्ये जळजळ होणार नाही यासाठी केसांना हळूहळू हाताने स्वच्छ धुवा. केस आठवड्यातून दोन वेळेपेक्षा जास्त धुवू नका.





