* सोमा घोष
नवजात शिशुला पहिल्यांदा आंघोळ घालणं पालकांसाठी तसं कठीणच काम असतं. यामध्ये नवीनच बनलेली आई अनेकदा आपली आई, सासू वा एखाद्या मोठ्यांची मदत घेते, परंतु अनेकदा एकटं राहत असल्यास स्वत:ला सर्व काही करावं लागतं. खरंतर डॉक्टरांच्या सल्ल्यासोबत नवजात शिशुला आंघोळ घालण्याची समस्या येत नाही. सोबतच आई-वडिलांचं मुलासोबतच बॉण्डिंगदेखील चांगलं होतं. म्हणूनच डॉक्टरदेखील पालकांना हे शिकण्याचा सल्ला देतात.
याबाबत एक डॉक्टर सांगतात की नवजात शिशुच्या त्वचेतील ओलसरपणा त्वरित निघून जातो, ज्यामुळे कोरडेपणा आणि जळजळ निर्माण होण्याची भीती असते. खरंतर नवीन बाळाची त्वचा मोठ्यांच्या तुलनेत तीन पट अधिक पातळ असल्यामुळे त्वचा दुप्पट वेगाने ओलसरपणा हरवून बसते. बाळाचा पीएचदेखील वाढतो, ज्यामुळे त्यामध्ये कोरडेपणा, जळजळ, चट्टे, सूज होण्याची शक्यता वाढत असते.
‘इंडियन अकॅडमी ऑफ पीडीएट्रिक्स’ (आइएपी)ने नवजात शिशु आणि इतर लहान मुलांसाठी गुणवत्ता पूर्ण त्वचेची देखभाल सुनिश्चित करण्यासाठी मानकी कृत सूचना लागू केल्या आहेत, ज्या खालील प्रमाणे आहेत :
* नवजात शिशुला पहिली आंघोळ जन्माच्या ६ ते २४ तासानंतर घालायला हवी.
* पूर्वी इस्पितळात जन्म होताच त्वरित नवजात बाळाला आंघोळ घालणं एक सामान्य बाब होती, परंतु आता ‘इंडियन अकॅडमी ऑफ पीडीएट्रिक्स’ने सल्ला दिला आहे की जन्मानंतर एकदा जेव्हा बाळ स्थिर होतं, तेव्हा ते साधारणपणे जन्माच्या ६ ते २४ तासाच्यामध्ये असायला हवं, तेव्हाच त्याला आंघोळ घालू शकता. आंघोळ घातल्यानंतर प्रॉडक्ट कोणते असावे त्याची देखील माहिती असणं गरजेचं आहे.
* शिशुसाठी बेबी सेफ क्लीन्जरची निवड करा, जे लार्ज मिसेल्सवालं असावं ते जे बाळाच्या त्वचेमध्ये जाणार नाही.
* अलीकडे बाजारात शिशूंसाठी अनेक उत्पादन आहेत. योग्य उत्पादनाची निवड आई वडिलांसाठी खूपच कठीण होऊन बसतं. अशावेळी अशी उत्पादनं निवडा जी डॉक्टरांकडून टेस्टेड, रिकमंडेड असावीत आणि शिशूंच्या त्वचेसाठी सुरक्षित असावीत. हे उत्पादन शिशुला क्लीन करण्या व्यतिरिक्त त्वचेसाठीदेखील जेंटल असणं गरजेचं आहे.





