* शोभा कटारे

आनंदी वैवाहिक जीवनासाठी काही छोटया छोटया गोष्टी करणं गरजेचं आहे. तर चला जाणून घेऊया या छोटया छोटया गोष्टी ज्या नात्याला सुंदर आणि आनंदी बनवतात :

एकमेकांच्या भावनांना महत्त्व देणं

एका वैवाहिक नात्याचा मजबूत पाया अशा गोष्टीवरती टिकलेला असतो की तुम्ही एकमेकांच्या भावनांना किती आदर, सन्मान आणि महत्त्व देता. असं तर नाही ना की तुम्ही एकमेकांच्या भावना समजून न घेता तुमची गोष्ट एकमेकांवरती जबरदस्तीने थोपवता? जर असं असेल तर ही सवय बदला आणि एकमेकांच्या भावनांना महत्त्व द्यायला सुरुवात करा, तेव्हाच तुमच्या नात्याचा पाया मजबूत होईल.

कामात मदत करणं

अलीकडे अनेक कपल वर्किंग असतात. जर तुम्ही अशावेळी फक्त तुमच्या कामाचाच विचार कराल तर गोष्ट बिघडूदेखील शकते. म्हणून एकमेकांच्या कामांना समान महत्व द्या. जर एखाद्या दिवशी तुमच्या जोडीदाराला लवकर जायचं असेल तर तुम्ही त्याच्या कामात थोडी मदत करा म्हणजे त्याचं काम लवकर आटपेल.

एकमेकांसोबत क्वॉलिटी वेळ घालवा

वर्किंग कपल्सजवळ नेहमीच वेळेची कमी असते. कधी कधी त्यांच्या ऑफिसच्या वेळादेखील वेगवेगळया असतात म्हणून त्यांनी एकमेकांसोबत एक चांगला म्हणजेच क्वॉलिटी वेळ घालविण्याची संधी सोडता कामा नये. यासाठी सुट्टीच्या दिवशी सकाळी जिम, मॉर्निंग वॉकला तुम्ही निरोगी राहू शकता आणि एकमेकांसोबत कोणत्याही विषयावर बोलू शकता तसंच एकमेकांचा सल्ला घेऊ शकता वा मग किचनमध्ये एकमेकांसोबत जेवण बनवू शकता तसेच कुठेतरी बाहेर फिरण्याचा प्रोग्राम बनवून काही आठवणीतले क्षण एकमेकांसोबत घालवून तुमच्या नात्यांमध्ये गोडवा आणू शकता.

पैशाचे योग्य प्रबंधन

लग्नानंतर कपल्सने एकमेकांसाठी पैशाचं प्रबंधन करणं गरजेचं असतं कारण पैसा वाईट कमी वाईट वेळेत कामी येतो आणि गरज असल्यावर कोणत्याही प्रकारचा तणाव होत नाही. यासाठी एकमेकांच्या सल्ल्याने योग्य जागी पैशाची गुंतवणूक करा.

मी टाईमची घ्या काळजी

एकमेकांच्या मी टाईमची काळजी घ्या. अनेकदा कपल्सनादेखील दररोजच्या धावपळीनंतर काही काळ स्वत:साठी काढायचा असतो. म्हणजे त्यांना त्यांची आवड व हॉबीनुसार काही कामं जसं की पुस्तक वाचण्याची आवड, बागकामाची आवड वा काही वेगळं जे मी टाईममध्ये पूर्ण करू शकतील. यासाठी कपल्सने एकमेकांना मी टाईम नक्की द्यावा.

नात्यांच्या मजबुतीसाठी

* केलेल्या मदतीसाठी आभार व्यक्त करा.

* एकमेकांवर विश्वास ठेवा.

* एकमेकांची काळजी घ्या.

* एकमेकांना महत्त्व देणं गरजेचं आहे.

* एकमेकांना वेळोवेळी वा खास प्रसंगी गिफ्ट द्यायला विसरू नका.

* एकमेकांवरती आरोप करू नका.

* एकमेकांचा मत्सर करू नका.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...