* पूनम अहमद
एक व्यक्ती आपल्या आयुष्यात ५,७७८ वेळा सेक्स करते, असं म्हटलं जातं. तसंही प्रत्येक व्यक्तीची खाजगी बाब आहे, तिची आवडनिवड आहे की ती किती वेळा सेक्स करते. परंतु सेक्सची उणीव तुमच्या शरीरावरती काय प्रभाव टाकते, चला, जाणून घेऊया :
एक्सपर्टचा सल्ला : तुमचं सेक्स ड्राइव्हसाठी म्हणू शकता की हे ‘युज इट अँड लूज इट’ची केस होते. ‘‘जी लोकं सेक्सपासून दूर राहतात ती खूप सुस्त राहतात आणि हळूहळू त्यांची सेक्सची इच्छा कमी होत जाते. माझे क्लाएंट्स स्वत: सांगतात की ‘आऊट ऑफ साईट, आऊट ऑफ माईंड’ची गोष्ट या केसमध्ये योग्य बसते,’’ हे म्हणणं आहे सैरी कूपरचं जे सेक्स थेरेपिस्ट आहेत.
जास्त अंतर योग्य नाही : जेव्हा काही प्रौढ स्त्रिया दीर्घ काळानंतर सेक्स करतात, तेव्हा त्यांना ल्यूब्रीकेशनची समस्या येते. वैजाईनल वॉल्स लूज होतात, एस्ट्रोजन हार्मोन कमी होतं. डॉक्टर लॉरेन सांगतात, ‘‘२० वा ३० वर्षाच्या युवती सेक्स करत नसल्या तरीदेखील त्यांचे एस्ट्रोजन हार्मोन पर्याप्त असतं, त्यांचे टिशूज हेल्दी राहतात. परंतु ६० वर्षे वयाच्या स्त्रियांसोबत असं होत नाही.’’
नियमित करा सेक्स : सैरी म्हणते की, ‘‘ज्या स्त्रिया मेनोपोजच्या जवळ असतात आणि सेक्सपासून दूर राहतात तेव्हा त्यांचं वय वाढतं तसं वैजाइनल वॉल्स लूज होतात आणि त्या जेव्हादेखील सेक्स करतात तेव्हा, त्यांना खूप पेन होतं. मेनोपोजच्यावेळी वेजनाइल हेल्थकडे लक्ष देण्यासाठी नॉर्थ अमेरिकन मेनोपोज सोसायटी नियमित सेक्सचा सल्ला देते.’’
शरीरावर होतो परिणाम : ही गोष्ट विचित्र वाटू शकते, कदाचित विश्वास ही बसणार नाही परंतु पिरियडच्यावेळी सेक्सने मेन्स्ट्रुअल क्रांटम कमी होतात. डॉक्टर स्ट्रेचरचं म्हणणं आहे की, ‘‘पिरियडच्यावेळी सेक्सवेळी एंडोर्फीन्स वाढतात, ज्यामध्ये मासिक पाळीच्यावेळी होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळतो. युटरस एक मास पेशी आहे आणि ऑरगॅझमच्यावेळी रक्तप्रवाह वेगाने होतो ज्यामुळे पिरियडच्यावेळी होणारा क्रांटम कमी होतो.’’
औषध आहे सेक्स : सेक्स तुम्हाला कोणत्याही संक्रमणापासून वाचवतं. जर्नल अमेरिकन फॅमिली फिजिशियनच्या नुसार सेक्श्युअल इंटरकोर्समध्ये कमी येऊ देऊ नका. हे यूटीआय आणि एसटीडीपासून दूर ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारतं.
पुरुषांमध्ये कमजोरी : ‘युज इट आणि लूज इट’च्या फॉर्म्युलानुसार एका अभ्यासातून सिद्ध झालं आहे की सेक्सच्या कमीमुळे पुरुषांमध्ये शिघ्र स्खलनाची शक्यता वाढते. प्रौढ पुरुषांमध्ये ही गोष्ट अधिक पाहायला मिळते.
तणाव करतो दूर : जर तुमच्या आयुष्यात सेक्सची कमी असेल तर तुम्ही तणावात राहू शकता. नियमित सेक्सने तणाव कमी होतो. याच्या कमतरतेमुळे ब्लड प्रेशरदेखील हाय होऊ शकतं. सोबतच इतर विविध प्रकारचे त्रास होऊ शकतात. या गोष्टीवरती लक्ष देत राहा की तुमच्या जीवनातील धावपळ, व्यस्ततेच्या दरम्यान सेक्स हरवलं तर नाही आहे ना. आयुष्यचं हे एक महत्त्वाचं अंग आहे.
शारीरिक आणि मानसिक फिटनेसमध्ये सेक्सचं महत्त्वाचे योगदान आहे. याला कमी समजू नका. सेक्स एक योग्य व्यायामाप्रमाणे तुमच्यासाठी लाभदायक आहे. कारण या दरम्यान तुमच्या सर्व मासपेशी ताणतात आणि मोकळया होतात. प्रेमाच्या या क्षणाच्या दरम्यान तुम्ही तुमच्या साथीदारासाठी प्रेम आणि महत्त्वपूर्ण होण्याची अनुभूती तुमची आत्मप्रतिष्ठादेखील वाढवते.