* गरिमा पंकज
क्रॉप टॉप म्हणजे हाफ शर्ट, बॅली शर्ट वा कट ऑफ शर्ट. हा एक असा टॉप आहे जो कंबर आणि पोटाच्या आकर्षणाला सर्वांसमोर आणतो. तुम्ही असं म्हणू शकता की क्रॉप टॉप शरीराच्या मध्य भागावर लक्ष आकर्षित करण्यासाठी वापरले जातात. ज्या मुलींना आपला हा भाग हायलाईट करायचा असतो त्या बिनधास्त क्रॉप टॉप वापरू शकतात. १९८० च्या दशकापासून क्रॉप टॉप फॅशनच्या जगतात स्टाईलचं प्रतिक राहिलंय. गायिका मॅडोनाने तिच्या ‘लकी स्टार’ गाण्यात जाळीचा क्रॉप टॉप घातला होता.
वापरायला सुरुवात
हे वापरण्याची सुरुवात अशा महिलांनी केली होती ज्या बिनधास्त होत्या आणि त्यांना स्वत:चं स्वातंत्र्य दाखवायचं होतं. १९७० आणि ८० च्या दशकात पॉप कल्चरच्यावेळी क्रॉप टॉपची फॅशन होती. सुरुवातीच्या काळात पुरुष पोटाचे सिक्स पॅक दाखविण्यासाठी याचा वापर जिममध्ये करत असत. जिममध्ये काही मुलं शर्ट न वापरता वर्क आउट करत असत. त्यांना असं करण्यापासून रोखण्यासाठी शर्टचा खालचा भाग कापून थोडा छोटा केला जायचा. ज्याने नंतर फॅशनचं रूप घेतलं आणि महिलांनी याचा व्यापकरित्या वापर केला.
हिंदी सिने जगतातदेखील क्रॉप टॉपची फॅशन जुनी आहे. १९७३ साली रिलीज झालेल्या ‘बॉबी’ सिनेमात डिम्पल कपाडियानेदेखील काळापांढरा नॉट वाला क्रॉप टॉप घातला होता, जो त्यावेळी लोकांना खूपच आवडला होता. फॅशन पुन्हा काही बदलासोबत परत येत असते. असंच काहीसं क्रॉप टॉपसोबत झालं आहे. आज हा तरुणी आणि महिलांमध्ये खूपच लोकप्रिय ड्रेस आहे.
किती प्रकारचे असतात क्रॉप टॉप
रुपये २०० ते रुपये ८००च्या प्राईज रेंजमधील क्रॉप टॉप्स तुम्हाला सगळीकडे मिळू शकतात. तुमच्या शहरातील एका छोट्याशा दुकानापासून जगातील सर्वात मोठया फॅशन ब्रँडपर्यंत. हे विविध डिझाईन्सचे मिळतात. उदाहरणार्थ, स्लीवलेस क्रॉप टॉप, लॉन्ग स्लीव क्रॉप टॉप, बॅकलेस क्रॉप टॉप, बॅगी क्रॉप टॉप, ऑफ शोल्डर क्रॉप टॉप, विंटर क्रॉप टॉप व टर्टल क्रॉप टॉप इत्यादी. याव्यतिरिक्त हाफ क्रॉप टॉप ज्यामध्ये कंबरेचा बराचसा भाग दिसून येतो तर त्रिकोणी ट्रायन्गल क्रॉप टॉपमध्ये खालचा शेप त्रिकोणी असतो. काव्ल नेक क्रॉप टॉपच्या गळ्याच्या चारी बाजूंनी कपडा असतो. डीप नेक क्रॉप टॉप म्हणजेच खोलगट गळ्याचे क्रॉप टॉप आणि डेनिमने बनलेले क्रॉप टॉप देखील असतात.
क्रॉप टॉप एक असं मल्टीपर्पज आउटफिट आहे, जे अनेक वेगवेगळ्या पद्धतीने आणि अनेक आउटफिटससोबत सहजपणे कॅरी करता येऊ शकतं. यंग आणि कॉलेज गर्ल्समध्ये याची जरा जास्तच क्रेज आहे, कारण हे कम्फरटेबल असण्यासोबतच खूपच कुल आणि स्टायलिशदेखील दिसतात. एवढचं नाही तर याला कोणत्याही वयाच्या स्त्रिया जीन्स, स्कर्ट, शोर्टस, ट्राउजर्स वा प्लाजो वगैरे कशाहीसोबत मिक्स एंड मैच करून घालू शकता.
क्रॉप टॉपची खासियत ही आहे कि याला वेस्टर्न व्यतिरिक्त ट्राडिशनल आउटफिट्स जसं की साडी लहेंगा आणि दुसऱ्या एथनिक ड्रेसेससोबत देखील स्टाइल करता येऊ शकते. क्रॉपटॉपची लांबी जवळजवळ ब्लाउजच्या बरोबरीने असते, म्हणून याला साडी व लहेंगासोबत ब्लाउजप्रमाणे पेयर करून याला नवीन लुक देऊ शकतो. एवढचं नाही तर असे बरेचसे ड्रेसेस आहेत, ज्यांच्यासोबत क्रॉप टॉप पेयर करून स्टाईल दीवा बनू शकता.
क्रॉप टॉपला असं करा कैरी
तुम्ही तुमच्या लाँग स्कर्टला फ्लेयरड व ऑफ शोल्डर क्रॉप टॉपसोबत स्टाइल करू शकता आणि तुमच्या लुकला अधिक अट्रैक्टिव करू शकता. मिडी, डेनिम वा मॅक्सी स्कर्टसोबतदेखील क्रॉप टॉप मॉरडर्न आणि स्टायलिश दिसू शकतो. क्रॉप टॉप आणि जीन्सचा कोम्बो सर्वात जास्त कम्फरटेबल आणि ट्रेंडी आहे. हा कोणत्याही जीन्ससोबत छान दिसतो. मग ते हाय वेस्ट असो मॉम जीन्स असो, फ्लेयरड असो वा बूट कट.
अशा प्रकारे क्रॉप टॉपसोबत प्लाजोची स्टाईल करणं खूपच कुल आणि एलीगनट आहे. दररोज घालण्यासाठी सिम्पल क्रॉप टॉपसोबत रेग्युलर प्लेन वा प्रिंटेड प्लाजो ट्राय करा. एखादा स्पेशल इवेंट वा पार्टीसाठी शिफोन क्रॉप टॉपसोबत हेवी सिल्क प्लाजोची निवड केल्यास स्मार्ट बबली लुकसाठी शॉट्ससोबत क्रॉप टॉप वापरा. मॉलमध्ये फिरायचं असेल, बीचवर मस्ती करायची असेल वा मित्रांसोबत डिनर हे प्रत्येक प्रसंगासाठी परिपूर्ण आहे.
तुम्ही डेटवर जात असाल आणि एक स्टायलिश आणि प्रेझेनटेबल लुक हवा असेल तर जास्त विचार न करता पेन्सिल स्कर्ट आणि क्रॉप टॉप वापरा. तुम्ही धोती वा हॉरमपेंट्स सोबतदेखील क्रॉप टॉप वापरू शकता. अशा प्रकारे पप्लम स्कर्ट आणि क्रॉप टॉप स्टायलिश दिसण्याच्या सर्वात फॅशनेबल पद्धतीपैकी एक आहे. एवढचं नाही तर गुडघ्याच्या लांबीचा फ्लेयर्ड वा ए लाईन स्कर्टसोबत एक चांगल्या फिटिंगचा क्रॉप टॉप तुम्हाला युनिक लुक देऊ शकतो.
एथनिक ड्रेससोबत
एथनिक ड्रेसेससारखे लहेंगे वा साडीसोबत देखील क्रॉप टॉपला पेयर केल जाऊ शकतं. फंक्शन लहान असो वा मोठं अनेक स्त्रियांना लहेंगा घालायला आवडतो. सिम्पल लहेन्ग्याला अधिक स्टायलिश दिसण्यासाठी तुम्ही क्रॉप टॉप ट्राय करू शकता. तुम्ही लहेन्ग्यासोबत फ्लोरल वा ओफ शोल्डर क्रॉप टॉप कॅरी करू शकता. हा लुक तुमच सौंदर्य अधिक खुलवू शकतो. यावर तुम्ही डार्क रंगाची लिपस्टिक लावा.
वन शोल्डर क्रॉप टॉप तुम्हाला इंडो-वेस्टर्न लुक देतो. तुम्ही याला देखील लहेंग्यासोबत ट्राय करू शकता. अशा प्रकारे साडीच्या एथनिक लुकमध्येदेखील वेस्टर्न तडका टाकत स्मार्ट क्रॉप टॉपला ब्लाउजप्रमाणे घातल्यास तुमचं रूप खुलेल. साडीसोबत ऑफ शोल्डर आणि रफल्ड क्रॉप टॉप अलीकडे ट्रेंड मध्ये आहे.
जॅकेटसोबत
क्रॉप टॉप वापरायला आवडत असेल आणि वातावरणात थोडा थंडावा असेल तर याला पेयर करून एका स्टायलिश जॅकेटसोबत अशा प्रकारे तुम्ही क्रॉप टॉपदेखील वापरू शकाल आणि वातावरणात तुमची स्टाईलदेखील शोभून दिसेल. तुम्ही लेदर जकेट, डेनिम शर्ट वा एक लांब जॅकेटदेखील वापरू शकता आणि हा बनेल एक शानदार मोनोक्रोम ड्रेस.
क्रॉप टॉप आज मुलींचा सर्वात आवडता पेहराव आहे, परंतु आपली स्टाइल आणि बांध्यानुसार याची निवड करायला हवी. क्रॉप टॉपचा प्रमुख हेतू तुम्हाला सुंदर, सुडौल आणि आकर्षक कंबर आणि बेंबिला दाखवणं आहे. परंतु तुमच्या पोटावर जास्त चरबी असेल वा तुम्ही जास्त बारीक असाल तर तुम्ही अशा प्रकारे पेहराव घालून आकर्षक दिसण्या ऐवजी कुरूप दिसाल. कंबर तुमच्या शरीराच्या बांध्याशी शोभायला हवी म्हणजेच तुम्ही स्लीम ट्रीम असाल तरच हे तुमच्यावर शोभून दिसेल. तुम्हाला तुमच्या शारीरिक बांध्यानुसारच याची निवड करायला हवी.