* पारुल भटनागर
एशियन पेंट्सची एक जाहिरात तर तुम्हा सर्वांनाच आठवतचं असेल, ज्यामध्ये सुनील बाबू आयुष्यात पुढे जात राहतात, प्रत्येक गोष्टीत बदल घडतो, परंतु एक एक गोष्ट ते बदलत नाहीत, ते म्हणजे त्यांचं घर, जे कायमचं नवीन दिसत राहतं.
जर तुम्हीदेखील तुमच्या घराला पेंट करण्याबद्दल विचार करत असाल तर थोडी हुशारी तुम्हीदेखील दाखवा म्हणजे तुमचं घर कायमच नवीन दिसेल आणि लोकं तुमचं कौतुक करताना थकणार नाहीत. तर चला जाणून घेऊया घराला पेंट म्हणजेच रंगकाम करतेवेळी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि रंगांची निवड कशी करावी :
कंटेंस व इंटिरियर लक्षात घ्या
जेव्हादेखील तुम्ही तुमचं घर पेंट करण्याबद्दल विचार कराल तेव्हा सर्वप्रथम हे पहा की तुमच्या घरात घरांमध्ये कंटेंस कशाप्रकारे लागला आहे, कारण नेहमीच पेंट हा घराचे पडदे, इंटिरियर इत्यादींना लक्षात घेऊन करायला हवं. कारण यामुळेच घराचा लुक उठून दिसतो.
संपूर्ण घरात एकसारखाच पेंट करायला हवा असंदेखील गरजेचं नाहीए. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळया खोल्यांमध्ये मॅच करणारा पेंट लावू शकता. जो सुंदर दिसण्याबरोबरच अलीकडे ट्रेंडमध्येदेखील आहे. यासाठी तुम्ही एखाद्या एक्सपर्टसचा सल्ला नक्कीच घ्या म्हणजे तुमच्या घराला योग्य प्रकारे न्यूमेकओवर मिळण्यास मदत मिळू शकेल.
मुलांना लक्षात घेऊनच पेंट करा
जेव्हादेखील घरात रंगकाम कराल तेव्हा मुलांचा नक्कीच विचार करा. असं यासाठी की जर तुमच्या घरात लहान मुलं असतील आणि तुम्ही भिंतींवर नॉर्मल पेंट लावायचं ठरवत असाल तर तुमचा पेंट लवकर खराब होण्याबरोबरच, मुलांनी भिंतींवर काही लिहिल्यास वा चित्र काढल्यास ते वाईट दिसण्याबरोबरच घराचं सौंदर्यदेखील कमी करतं.
याऐवजी तुम्ही भिंतींवर ऑइल पेंट, वॉटरप्रूफ पेंट करू शकता. यावर लागल्यास त्वरित वॉश केल्यास ते निघून जातं. सोबतच तुम्ही घराला सुंदर दिसण्यासाठी एक चांगला व महागडा पेंट करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही मुलांच्या रूममध्ये त्यांची थीम लक्षात घ्या कारण त्यांच्या खोलीमध्ये आवडत्या थीमचा वॉल पेंट जसं की कार्टून कॅरेक्टर्स वगैरे असल्यामुळे मुलं त्याकडे त्वरित आकर्षित होतात आणि तिथे बसून ते मनाप्रमाणे कोणत्याही गोष्टी करण्यासाठी तयार होतात.
विविध प्रकारचे पेंट्स
जर तुम्ही तुमच्या घराला फ्रेश लुक द्यायचं ठरवत असाल तर त्यासाठी तुम्हाला योग्य पेंट, कलर व त्याचं फिनिश लक्षात घेणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्ही तुमच्या घराला सुंदर बनवू शकाल. परंतु यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कोणकोणते पेंट मार्केटमध्ये उपलब्ध आहेत हे लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही प्रत्येक प्रकारच्या पेंटबद्दल जाणून घेऊन तुम्हाला तुमच्या घरासाठी पेंटची निवड करणं सहज शक्य होईल.
तर जाणून घेऊया उत्तम पेंट्सबद्दल
* ऐनामल पेंट ऑइल बेस्ट पेंट असतो, जो दीर्घकाळ टिकून राहण्याबरोबरच भिंतींना ग्लॉसी फिनिश दिल्यामुळे घराला रॉयल लुक देण्याचंदेखील काम करतो. हाफ पेंट ज्या जागी अधिक मॉइश्चर व ह्युमिडिटी असते त्या जागी अधिक सूट करतो. परंतु हा पेंट लावल्यावर, काही काळानंतर क्रॅक्स पडायला सुरुवात होते.
* डिस्टेंपर पेंट पॉकेट फ्रेंडली असण्याबरोबरच भिंतींवर प्रायमरशिवाय देखील डायरेक्ट अप्लाय करू शकता. परंतु हे वॉटरप्रुफ नसतात. ओलसर झाल्यावर डिस्टेंपर निघून जातो.
* टेक्सचर पेंट भिंतींवर खूपच युनिक टच देण्याचं काम करतो. हे वॉटरफ्रुफ असण्याबरोबरच भिंतींवर विशेष टेक्निक्सचा आधार घेऊन भिंतींना खास इफेक्ट देण्याचं काम करतो. परंतु हा पेंट खूपच महाग असण्याबरोबरच हे फक्त एक्सपर्ट पेंटर्सच करू शकतात.
* मेटॅलिक पेंट वॉटर बेस्ट असण्याबरोबरच भिंतींना मेटॅलिक फिनिश दिल्यामुळे घराला लुक देण्याचं काम करतात. हा पेंट अधिक महाग असल्यामुळे हा शानदार इफेक्ट देण्याबरोबरच छोटया छोटया भागांमध्येदेखील लावला जातो.
* अॅक्रेलिक पेंट वॉटरप्रुफ असल्यामुळे अनेक लोकांचा आवडीचा आहे कारण हा दीर्घकाळ टिकणारा आहे. हा मॅट सेटिन, सिल्क प्रत्येक प्रकारच्या फिनिशमध्ये उपलब्ध आहे. हा भिंतींवर तडेदेखील पडू देत नाही. फक्त पेंट करण्यापूर्वी भिंतींवर प्रायमर कोड करणं गरजेचं आहे.
कलर्सची निवड लक्षात घ्या
* लिविंग रूम घराचा असा भाग आहे, जिथे आपण कुटुंबासोबत बसून सर्वाधिक काळ व्यतीत करतो. अगदी बाहेरून आलेल्या लोकांना हाच भाग आकर्षित करतो. अशावेळी या खास जागेसाठी न्यूट्रल शेडची निवड करू शकता.
* जर तुम्हाला डायनिंग रूमसाठी कॉफी लुक द्यायचा असेल तर तुम्ही रेड शेड्सची निवड करा कारण रेड कलर लाइवलीनेसला प्रमोट करण्याबरोबरच भूक वाढविण्याचेदेखील काम करतो. यामुळेच स्पॅनिश रेस्टॉरंटमध्ये लाल रंगाचे फॅन असतात. तर पिवळा रंग आनंदाच प्रतीक असण्याबरोबरच ते तिथे तुम्हाला अधिक कम्फर्ट मिळून चांगलं खाण्याबद्दल तुम्ही विचार करता. ग्रीन म्हणजेच हिरवं डायनिंग रूम निसर्गाच्या जवळ आणण्याबरोबरच तुम्हाला उत्तम खाण्यासाठीदेखील प्रमोट करण्याचं काम करतो.
* मुलांच्या रूममध्ये नेहमीच सोफ्ट टोन्सवाले पेंट अधिक करायला हवेत कारण हे त्यांना शांत व कुल ठेवण्याचं काम करतात.
* बेडरूम घराची अशी जागा आहे, जिथे आपण स्वत:ला रिलॅक्स करण्यासाठी जातो. अशावेळी जेव्हादेखील बेडरूमसाठी पेंट कलर्सची निवड कराल तेव्हा ते सॉफ्ट कलर्स म्हणजेच लाईट कलर्स ऑफ टोन्स असावेत, जे तुम्हाला रिलॅक्स फिल करण्याचं काम करतील.
* जेव्हा किचन म्हणजेच स्वयंपाकघर कलर कराल तेव्हा त्यामध्ये पांढरा, राखाडी, लाल, पिवळा, हिरवासारख्या शेड्सची निवड करा. कारण हे रंग अधिक शाईन करण्याबरोबरच आकर्षित करण्याचंदेखील काम करतात.
* बाथरूममध्ये पांढरा रंग देणं बेस्ट आहे कारण हा नेहमीच फ्रेश व क्लीन फिल देण्याचं काम करतो. सोबतच तुम्ही सोफ्ट राखाडी, लाईट ब्ल्यू, पिस्ता, लाईट ग्रीनसारख्या शेड्सदेखील ट्राय करू शकता. हे रंगदेखील खूपच कूल फील देण्याचं काम करतात.
ट्रॅडिशनल पेंट्सचादेखील ट्रेंड
जर तुम्ही तुमच्या घराला ट्रॅडिशनल लुक देण्याचं ठरवत असाल तर अलीकडे ट्रेंडमध्ये चालू असणाऱ्या मधुबनी पेंट्सने भिंती सजवू शकता. सर्वप्रथम मधुबनी पेंटिंग रांगोळीच्या रुपात लोकांना माहित होती. परंतु आता ही आधुनिक रूपात कपडे, भिंती तसंच कागदावर उतरली आहे. या कलेला फक्त भारतातच नाही तर परदेशातदेखील खास पसंत केलं जातंय.