* प्रतिनिधी

काही आजार असे असतात जे महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतात. ‘हायपरथायरॉईडीझम आणि हायपोथायरॉईडीझम’ हे थायरॉईडशी संबंधित २ आजार आहेत.

स्त्रियांना अनेक मानसिक, शारीरिक आणि हार्मोनल बदलांना सामोरे जावे लागते. स्त्री जीवनाच्या वेगवेगळया टप्प्यांमध्ये हार्मोनल बदल होतातच, पण जर हे बदल असामान्य असतील तर ते अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळेच महिलांना थायरॉईड होण्याची शक्यता जास्त असते.

प्रिस्टीन केअरच्या डॉ. शालू वर्मा यांनी महिलांमध्ये वाढत्या थायरॉईडच्या समस्या आणि त्यापासून वाचण्याचे उपाय याबद्दल माहिती दिली –

थायरॉईड काय आहे?

थायरॉईड ही मानेच्या खालच्या भागात आढळणारी फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी आहे. या ग्रंथीतून ट्रायओडोथायरोनिन (टी३) आणि थायरॉक्सिन (टी४) नावाचे २ मुख्य संप्रेरक स्रवते. दोन्ही संप्रेरके शरीरातील अनेक क्रिया नियंत्रित करण्यात विशेष भूमिका बजावतात.

पण, जेव्हा दोनपैकी कोणत्याही हार्मोन्सच्या उत्पादनाच्या प्रमाणात बदल होतो, तेव्हा शरीरात विविध समस्या निर्माण होतात. हायपोथायरॉईडीझम आणि हायपोथायरॉईडीझममधील फरक जेव्हा थायरॉईड संप्रेरकांचे उत्पादन आवश्यकतेपेक्षा जास्त होते तेव्हा त्या स्थितीला हायपरथायरॉईडीझम म्हणतात, तर थायरॉईड संप्रेरकांच्या कमी उत्पादनाच्या स्थितीला हायपोथायरॉईडीझम म्हणतात. दोन्ही परिस्थिती असामान्य आहेत आणि रुग्णाला उपचारांची आवश्यकता असते.

स्त्रिया होतात पुरुषांपेक्षा जास्त प्रभावित

हायपरथायरॉईडीझम आणि हायपोथायरॉईडीझम पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये १० पट अधिक सामान्य आहे. आकडेवारीनुसार, दर ८ पैकी जवळजवळ १ स्त्री थायरॉईडने त्रस्त असते.

याचे एक कारण असे की, थायरॉईडचे विकार बहुतेक वेळा स्वयंप्रतिकार प्रतिक्रियांमुळे उद्भवतात. जेव्हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वत:च्या पेशींवर हल्ला करू लागते तेव्हा हे घडते. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये स्वयंप्रतिकार स्थिती अधिक सामान्य असते.

मासिक पाळी दरम्यान हार्मोन्समध्ये होणारे चढउतार आणि थायरॉईड हार्मोन्समधील परस्पर क्रियेमुळे थायरॉईडचे विकारही स्त्रियांमध्ये दिसून येतात. थायरॉईडची समस्या कधीही उद्भवू शकते, परंतु रजोनिवृत्तीनंतर हार्मोन्सच्या पातळीत अचानक बदल झाल्यामुळे थायरॉईडचे विकार होणे खूप सामान्य आहे.

या व्यतिरिक्त, थायरॉईडायटिस (थायरॉईड ग्रंथीची जळजळ), आयोडीनची कमतरता आणि जास्त आयोडीन यामुळेही हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझम होऊ शकतो.

अशा प्रकारे होतो थायरॉईड विकारांवर परिणाम

स्त्री प्रजनन प्रणाली आणि थायरॉईड ग्रंथीचे कार्य यामध्ये चांगला समन्वय असणे अत्यंत आवश्यक असते. जर थायरॉईड कमी किंवा जास्त सक्रिय असेल तर यामुळे विविध हार्मोनल विकार होतात आणि याचा स्त्रीच्या पुनरुत्पादक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.

मासिक पाळी

थायरॉईड विकारांमुळे मासिक पाळी असामान्यपणे लवकर किंवा उशिरा येऊ शकते. याशिवाय, थायरॉईड संप्रेरकांच्या कमी किंवा जास्त उत्पादनामुळे मासिक पाळीच्या अनेक समस्या उद्भवू शकतात, जसे की अनियमित कालावधी, मासिक पाळीची अनुपस्थिती आणि खूप जास्त रक्तस्त्राव इ.

गरोदरपणात

जर एखादी स्त्री गर्भवती असेल आणि तिला थायरॉईडचा विकार असेल तर अनेक गुंतागुंत निर्माण होऊ शकतात. हायपरथायरॉईडीझम मॉर्निंग सिकनेसची शक्यता वाढवू शकतो, तर हायपोथायरॉईडीझममुळे अकाली प्रसूती, गर्भपात आणि इतर गंभीर गुंतागुंत होऊ शकते.

रजोनिवृत्ती

थायरॉईड विकारांमुळे अकाली रजोनिवृत्ती येऊ शकते. मात्र, योग्यवेळी उपचार घेऊन प्रीमेनोपॉज टाळता येऊ शकतो.

अशा प्रकारे करा रक्षण

थायरॉईड विकाराने ग्रस्त झाल्यानंतर, ते थांबवणे कठीण असते. म्हणूनच जर एखाद्या स्त्रीला लक्षणे दिसली तर तिने ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

हा रोग टाळण्यासाठी निरोगी स्त्री खालील उपाय करू शकते :

प्रक्रिया केलेले अन्न टाळा : प्रक्रिया केलेल्या अन्नामध्ये अनेक रसायने असतात, ज्यामुळे थायरॉईड संप्रेरकांच्या निर्मितीवर परिणाम होतो. म्हणून, थायरॉईड विकार टाळण्यासाठी, स्त्रीने कमीतकमी प्रक्रिया केलेले अन्न सेवन केले पाहिजे. जर एखाद्या स्त्रीला थायरॉईडचा विकार असेल तर तिने हे अन्न अजिबात सेवन करू नये.

सोया टाळा : जरी हा अतिशय आरोग्यदायी असला तरी तो थायरॉईडच्या संबंधात तो आरोग्यदायी नाही. सोयाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने थायरॉईड संप्रेरकांच्या निर्मितीवर परिणाम होतो.

धूम्रपान थांबवा : धुम्रपान करताना बाहेर पडणारे विष थायरॉईड ग्रंथीला अधिक संवेदनशील बनवू शकतात, ज्यामुळे थायरॉईडचे विकार होऊ शकतात. धुम्रपान हे थायरॉईड ग्रंथीच नव्हे तर आरोग्याशी संबंधित इतर समस्यांचे मूळ बनू शकते.

तणाव कमी करा

थायरॉईड रोगासह इतर अनेक आरोग्य विकारांमध्ये तणावाची मोठी भूमिका आहे. तणाव कमी करण्यासाठी स्त्रिया ध्यान, संगीत इत्यादींची मदत घेऊ शकतात.

नियमितपणे डॉक्टरांकडे जा

तुमच्या डॉक्टरांकडे नियमित जा. नियमित तपासणी केवळ तुमच्या आरोग्यासाठीच नाही तर थायरॉईडच्या आरोग्यासाठीही चांगली असते. थायरॉईडची सुरुवातीची लक्षणे दिसल्यास डॉक्टर काही औषधांच्या मदतीने हा आजार नियंत्रणात आणू शकतात.

थायरॉईड ग्रंथीमधून स्रवित होणारे हार्मोन्स शरीराच्या अनेक कार्यांमध्ये मदत करतात, जसे की, कॅलरीजच्या वापराचे प्रमाण नियंत्रित करणे, हृदयाची गती नियंत्रित करणे इ. पण जर या स्रावांचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त किंवा कमी असेल तर शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. हे स्त्रीच्या पुनरुत्पादक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम करू शकते.

याची लक्षणे दिसल्यावर, स्त्रीने विलंब न करता त्वरित निदानासाठी एंडोक्रिनोलॉजिस्टकडे जावे. वेळेवर उपचार करून, काही औषधे किंवा थेरपीच्या मदतीने ते नियंत्रित केले जाऊ शकते. काही गंभीर प्रकरणांमध्ये थायरॉइडेक्टॉमीही आवश्यक असू शकते. ही एक प्रकारची शस्त्रक्रिया आहे. जेव्हा थायरॉईड विकार औषधांनी बरा होऊ शकत नाही तेव्हा हे गरजेचे असते.

संतुलित आहार घेणे आणि दररोज किमान अर्धा तास व्यायाम करणे उत्तम ठरते. हे केवळ थायरॉईड रोगच सुधारत नाही तर तुमचे सामान्य जीवनही सुधारेल.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...