* संकल्प शक्ती, लाइफस्टाइल गुरू आणि संस्थापक, गुडवेज फिटने

२०२१ मधील सण-उत्सवांवेळी आपल्या नातेवाईकांसोबत बसून विविध प्रकारच्या पक्वान्नांचा आस्वाद घेणे तितकेसे सोपे राहिलेले नाही. कोविड -१९ ने लोकांना चांगलेच घाबरवले आहे. अशावेळी तुमच्यातील रोगप्रतिकारक क्षमता मजबूत असणे गरजेचे आहे. चला जाणून घेऊया, सण-उत्सवांदरम्यान कोणत्या प्रकारच्या मिठाईद्वारे तुम्ही तुमच्यातील इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता वाढवू शकता :

सुंठ : मिठाई बनविताना सुंठीचा वापर करा. ही एक प्रकारची औषधी असून यात रोगनिवारक गुणधर्म असतात. यात अँटीऑक्सिडंट्स, अँटीइम्प्लिमेंट्री जसे की, बीटा कॅरोटीन, कॅप्सेसीन इत्यादी भरपूर प्रमाणात असते. ती मधुमेह, अर्धशिशी, हृदय रोग, गुढघेदुखी, संधिवात यावर परिणामकारक असून चयापचय प्रक्रियेचे कार्य व्यवस्थित सुरू राहण्यासाठी लाभदायी आहे. सुंठ गरम असते.

खजूर : खजुराचा वापर तुम्ही साखरेला पर्याय म्हणून करू शकता. साखरेत ‘ओ’ नावाचे न्यूट्रिशन म्हणजे पोषक तत्त्व असते, ज्यामुळे लठ्ठपणासह अनेक आजारांना निमंत्रण मिळते. याउलट खजुरात शरीराला बळकट करण्यासाठी आवश्यक कार्बोहायड्रेड, मिनरल्स, फायबर्स आणि जीवनसत्त्वांनी परिपूर्ण अशी पोषक तत्त्वे असतात. खजूर रोगप्रतिकारक क्षमता वाढविते आणि कर्करोगाच्या पेशींविरोधात लढण्याची ताकद मिळवून देते.

तीळ : हे कॅल्शियम वाढवितात. महिलांना  कॅल्शियमची खूपच जास्त गरज असते. तीळ हाडे मजबूत करतात. यकृतही निरोगी ठेवतात. वजन नियंत्रणात ठेवून त्वचेला आरोग्यदायी आणि स्नायू बळकट करतात. मधुमेह नियंत्रणात ठेवून रोगप्रतिकारक क्षमता वाढवितात. यात झिंक, आयर्न, बी, ई जीवनसत्त्वासह मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते.

नारळ : हे पीसीओडी, पीरिएड्सच्या दिवसांत प्रचंड वेदना होणे, लघवीची समस्या, छातीत जळजळ, मुरूम, पुटकुळया, त्वचेवर व्रण उमटणे, अंडाशयातील गाठी यासारख्या अनेक समस्या बरे करणारे फळ आहे. नारळ थंड असून पित्तदोष कमी करतो.

तूप : याचा जेवणात समावेश करणे खूपच फायदेशीर आहे. ते शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करून आजारांपासून रक्षण करते. तुपातील ई जीवनसत्त्व त्वचा तसेच केसांसाठी खूपच उपयुक्त आहे. संधिवात, वात दूर करणे तसेच वजन कमी करण्यासाठीही तुपाचे सेवन खूपच गरजेचे आहे. रिफाइंड तेल खराब कोलेस्ट्रॉल तर तूप चांगले कोलेस्ट्रॉल वाढविते. याच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तूप स्मरणशक्ती वाढवून शरीरही मजबूत बनविते.

अक्रोड : हे मेंदूतील गोंधळ कमी करून एकाग्रता वाढविते. चयापचय प्रक्रिया सुधारून वजन कमी करण्यास मदत करते. यातील ओमेगा ३ मुळे ते शरीरासाठी अँटीऑक्सिडंटचे काम करते.

गूळ : याचा गोडवा नैसर्गिक आहे आणि साखरेच्या तुलनेत पदार्थाला गोडवा मिळवून देण्यासाठी गूळ खूपच चांगले आणि पोषक आहे. यात कॅल्शिअम, फायबर, आयर्नसह ब जीवनसत्त्व असते. गुळाच्या सेवनामुळे अॅनिमियाची समस्या दूर होते. अपचन होत असल्यासही ते उपयोगी ठरते. तुम्ही किसमिस किंवा मधाचाही वापर करू शकता.

ज्येष्ठमध : हे गॅस, पित्त, डोकेदुखी, तणाव, रोगप्रतिकारक क्षमता कमी असणे, वेदना, संधिवात, मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्तीची समस्या तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यासाठी वापरले जाते. स्वयंपाकात याचा वापर म्हणजे एक प्रकारे शरीराला निरोगी ठेवण्यासाठी मदत करण्यासारखेच आहे.

या सर्वांचाच तुम्ही दैनंदिन आहारात समावेश करू शकता, जसे की :

* पाणी किंवा दुधासोबत तिळाचे सेवन केल्यास कॅल्शियम कमी होण्याची समस्या कधीच निर्माण होत नाही. विशेष करून महिलांनी याचे सेवन अवश्य करायला हवे.

* जेवणापूर्वी खजूर खाल्ल्यास आपण कमी जेवतो, शिवाय अन्न लवकर पचते. गोड म्हणून चॉकलेट, कँडी, केक खाण्याऐवजी खजूर खाणे आरोग्यासाठी चांगले असते. यामुळे वजनही नियंत्रणात राहते.

* जेवल्यानंतर गूळ खाल्ल्यामुळे पचन चांगले होते. ते गरम पाण्यासोबत खाल्ल्यामुळे पोटविकार दूर होऊन वजनही कमी होते.

* तुपाच्या सेवनामुळे वजन कधीच वाढत नाही. मात्र बऱ्याच महिला याकडे दुर्लक्ष करतात आणि संधिवाताच्या शिकार होतात.  डाळ, भाज्या, भात, पुलाव, पोळी, मिठाई आदींवर १-२ चमचे तूप घालून त्याचे नियमित सेवन करावे. खाण्यासाठी गायीचे तूप उत्तम असते.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...