* पारुल भटनागर

अनेकदा गर्भ न टिकण्यामागे गर्भातल्या बाळामध्ये अनुवांशिक समस्या असते, जी वेळीच लक्षात आल्यास गर्भपाताची समस्या बऱ्याच अंशी टाळता येते.

‘जीन्स २ मी’मधील वैज्ञानिक घडामोडींच्या वरिष्ठ व्यवस्थापक डॉ. सायमा नाझ सांगतात की, वारंवार गर्भपात होण्याची बहुतेक प्रकरणे अनुवांशिक समस्यांमुळे निर्माण होतात.

वारंवार होणारा गर्भपात रोखण्यासाठी अनुवांशिक चाचणी हे अतिशय उपयुक्त माध्यम आहे. अशावेळी रुग्णाच्या गुणसूत्रांची तपासणी करणे आवश्यक असते. गर्भपाताची अशी प्रकरणे समजून घेण्यासाठी, गर्भाचे नमुने गोळा केले जातात आणि त्यानंतर डायग्नोस्टिक लॅबमध्ये तपासले जातात.

गुणसूत्र चाचणी

गुणसूत्रांची संख्या आणि संरचनेवर अवलंबून असलेल्या विकृती तुमच्यामध्ये आहेत किंवा नाहीत, हे गुणसूत्र चाचणीद्वारे समजू शकते. ट्रायसोमी हे सामान्यत: गर्भपाताचे सर्वात सामान्य गुणसूत्र-संबंधित कारण आहे. गर्भपाताच्या इतर कारणांमध्ये ट्रिपलॉइडी, मोनोसोमी, टेट्राप्लॉइडी किंवा ट्रान्सलोकेशन यासारख्या संरचनात्मक दोषांचा समावेश असतो.

वारंवार होणाऱ्या गर्भपाताचे कारण निश्चित करण्यासाठी गुणसूत्र चाचणी ही मुख्यत: अतिरिक्त गुणसूत्र किंवा निघून गेलेली गुणसूत्र किंवा गुणसूत्रांच्या उपस्थितीद्वारे दर्शविली जाते. हे ओळखण्यासाठी जनुकीय विश्लेषण केले जाते. मायक्रोटेक्नॉलॉजी हे जनुकीय चाचणीच्या क्षेत्रातील सर्वात प्रगत जैवतंत्रज्ञान आहे, जे एकाच वेळी हजारो डीएनए नमुन्यांचे विश्लेषण करू शकते.

या तंत्रामध्ये, गर्भाचे नमुने थेट डीएनए काढण्यासाठी वापरले जाऊ शकतात. यामध्ये जिवंत पेशींची गरज नसते. उच्च रिझल्यूशन क्रोमोसोम विश्लेषणाद्वारे क्रोमोसोममधील छोट्यात छोटा दोषही शोधता येतो, जो पारंपरिक पद्धतीने गुणसूत्रांचे विश्लेषण करताना सुटला जाऊ शकतो. क्रोमोसोमल मायक्रोटेक्नॉलॉजी हे पारंपारिक कॅरिओटाइपिंगच्या तुलनेत गुणसूत्रांचे विश्लेषण करण्यासाठीचे एक शक्तिशाली साधन आहे.

अनुवांशिक चाचणी

गर्भपाताची कारणे शोधण्यासाठी तुम्ही जनुकीय चाचणीची मदत घेऊ शकता. अनेक निदान प्रयोगशाळा उर्त्स्फूत किंवा नैसर्गिक गर्भधारणेसाठी अशा जनुकीय चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून देतात. अशीच एक कंपनी आहे ‘जीन्स २ मी’, जी बाळाच्या जन्माचे नियोजन करणाऱ्या पालकांना आई आणि सुरक्षित गर्भधारणा चाचण्यांचे संपूर्ण किट देते. ‘जीन्स २ मी’ च्या सीईओ रितू गुप्ता सांगतात की, पहिल्या तिमाहीत गर्भपाताची अनेक प्रारंभिक प्रकरणे ही गर्भामध्ये आढळलेल्या अनुवांशिक दोषांमुळे असतात. मानवामध्ये साधारणपणे ४६ गुणसूत्र असतात, ज्यामध्ये सामान्य विकासासाठी जीन्स असतात, परंतु गर्भातील अतिरिक्त किंवा निघून गेलेल्या गुणसूत्रामुळे असे गर्भपात गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात होतात.

स्वत:ला ठेवा सुरक्षित

बाळाला जन्म देण्याची योजना आखताना, जर तुमच्या अनुवांशिक चाचणीत असे दिसून आले की, गर्भपाताची समस्या अनुवांशिक कारणामुळे येत आहे, तर तुमच्या मनात याविषयी अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात.

क्रोमोसोमल मायक्रो-चाचणी दर्शविते की, गर्भपाताच्या कारणांमागे एक असामान्यता होती, त्यामुळे अशी दाट शक्यता आहे की, ती फक्त एका वेळचीच समस्या असू शकते. याचा अर्थ असा नाही की, भविष्यात तुम्हाला होणाऱ्या बाळात अनुवांशिक दोष असण्याची शक्यता जास्त असेल, पण गर्भपातामुळे होणारा त्रास होऊ नये म्हणून जोडप्यांनी नेहमी अनुवांशिक चाचण्या करून घेतल्या पाहिजेत.

गुणसूत्रातील विकृतींमुळे वारंवार गर्भपात होत असलेली जोडपी गर्भधारणेच्या इतर पद्धती वापरून पाहू शकतात. यामध्ये प्री-इम्प्लांटेशन जनुकीय निदानासह इन विट्रो फर्टिलायझेशनचा समावेश होतो. याद्वारे पालक आपल्या मुलांना होणाऱ्या अनुवांशिक आजारांपासून वाचवू शकतात आणि पालक होण्याचा आनंदही घेऊ शकतात.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...