* पूनम अहमद
‘‘तू इतक्या रात्री कोणाशी बोलत होतास? तू माझा फोन का उचलला नाहीस? ती तुझ्याकडे पाहून का हसली? माझ्या पाठीमागे काहीतरी चालले आहे का?’’
जर तुम्हाला दररोज अशा प्रश्नांना सामोरे जावे लागत असेल तर तुम्ही ते बरोबर समजलात की तुमचा जोडीदार संशयी स्वभावाचा आहे.
जर तुम्ही या प्रश्नांना कंटाळले असाल आणि हे नातं निभावू शकत नसाल, पण तुमच्या प्रियकरावर किंवा मैत्रिणीवरही प्रेमही करत असाल आणि त्याला या संशयाच्या सवयीमुळे सोडूही इच्छित नसाल, तर अशा संशयी स्वभावाच्या जोडीदाराला सामोरे जाण्यासाठी या टीप्स विचारात घ्या :
* शंका घेणे कोणत्याही नात्यात सर्वात वाईट गोष्ट असू शकते. असुरक्षितता, खोटे बोलणे, फसवणूक, राग, दु:ख, विश्वासघात हे सर्व यातून येऊ शकतात. नात्याच्या सुरुवातीला एकमेकांना समजून घेण्यासाठी अधिक प्रयत्न केले जातात. एकमेकांकडे अधिक लक्ष दिले जाते. एकदा की तुमच्या दोघांमध्ये एक बंध निर्माण झाला की तुम्ही जीवनातील महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यायला सुरुवात करता. याचा अर्थ असा नाही की जोडीदारामध्ये रस कमी झाला आहे. याचा अर्थ असा की आता तो तुमच्या जीवनाचा एक भाग आहे आणि तुम्ही आता त्याच्याबरोबर इतर गोष्टींवर आणि कामांवर आपले लक्ष केंद्रित करू शकता.
* कधीकधी जोडीदार हा बदल सहजपणे स्वीकारू शकत नाही आणि तो विचित्र प्रश्न विचारू लागतो, ज्यामुळे तुमच्या निष्ठेवरच प्रश्न निर्माण होतात. त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐका, त्याच्या अंत:करणात तुमच्यासाठी काय भावना आहेत ते समजून घ्या, अनेकवेळा अजाणतेपणाने आपली इच्छा नसतानाही आपल्या काही सवयीमुळे त्याच्या मनात शंका येते, हे समजून घ्या.
* तुम्ही नात्याच्या सुरुवातीचे ३-४ महिने तुमच्या मैत्रिणीकडे पूर्ण लक्ष दिले आहे. ती भविष्यातसुद्धा तशीच आशा ठेवते, परंतु तेवढे पुन्हा शक्य होत नाही, पण त्यात तुमच्या मैत्रिणीचा इतका दोष नाही, सुरुवातीच्या दिवसात इतके अतिशयोक्तीपूर्ण काम करू नका की नंतर तुमच्याकडून तेवढे लक्ष देण्याची उणीव तिला भासेल.
* जोडीदारासोबत दर्जेदार वेळ अवश्य घालवला पाहिजे. याचा अर्थ असा नाही की एक मोठी महागडी डेट असावी, याचा अर्थ एकत्र बसणे, एकमेकांच्या आवडीचा कोणताही ऑनलाइन शो एकत्र पाहणे, घरी बसून एकमेकांच्या गोष्टी ऐकणे असाही होऊ शकतो.
* तिला तुमच्या गटात सामील करा आणि तिचे वर्तन पहा की ती प्रत्येकामध्ये मिसळते की अलिप्त राहते. तिला तुमच्या आयुष्याचा आणि तुमच्या सामाजिक वर्तुळाचा ती एक भाग असल्याची जाणीव करून द्या. तिला आपल्या मित्रांची ओळख करून द्या. तिला हे समजून घेण्याची संधी द्या की ते तुमचे मित्र आहेत आणि तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. ती तुमच्या मित्रांना जितके अधिक समजेल तितकी ती तुमच्यावर कमी शंका घेईल.