कथा * लता सोनावणे

सकाळचे नऊ वाजले होते. नंदिनीनं नवऱ्याला अन् सोनी, राहुल या मुलांना हाक मारली, ‘‘ब्रेकफास्ट तयार आहे. लवकर या.’’

टेबलवर ब्रेकफास्ट मांडून नंदिनीनं त्यांचे डबे भरायला घेतले. दुपारच्या जेवणाचे डबे बरोबर घेऊनच तिघं सकाळी घराबाहेर पडायची. ती सरळ सायंकाळी परत यायची. बिपिन नाश्ता करता करता पेपर डोळ्याखालून घालत होते. सोनी अन् राहुल आपापल्या मोबाइलमध्ये गर्क होते. या तिघांचं आटोपून ती निघून गेल्यावरच नंदिनी स्वत: ब्रेकफास्ट घेते.

मुलांना मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसलेलं बघितलं अन् नंदिनीचा पारा चढला, ‘‘जरा हसतबोलत नाश्ता करता येत नाही का? सगळा वेळ घराबाहेर असता, थोडा वेळ तरी तो मोबाइल बाजूला ठेवा ना?’’

बिपिनला तिचा उंच स्वर खटकला. कपाळाला आठ्या घालून म्हणाले, ‘‘का सकाळी सकाळी आरडा ओरडा करतेस? करत असतील काही त्यांच्या कामाचं.’’

नंदिनी पुन्हा करवादली, ‘‘आता तुम्ही तिघंही एकदम सांयकाळी याल. जरा मोबाइल बाजूला ठेवून चवीनं हसत बोलत खायला काय हरकत आहे?’’

बिपिन हसून म्हणाले, ‘‘खरं तर आम्ही शांतपणे खातोय अन् आरडाओरडा तू करते आहेस.’’

मुलांना बापाचं हे वाक्य फारच आवडलं, ‘‘बाबा, काय छान बोललात.’’ मुलांनी एकदम म्हटलं.

नंदिनीनं तिघांचे डबे अन् पाण्याच्या बाटल्या टेबलावर ठेवल्या अन् ती उदास मनानं तिथून बाजूला झाली. आता सायंकाळपर्यंत ती घरात एकटीच होती. सकाळच्या जो थोडा वेळ हे लोक घरात असतात, त्यात नंदिनीशी थोडं बोलावं, तिची विचारपूस करावी असं यांना का वाटत नाही? सायंकाळी थकून येतील, मग टीव्हीसमोर पाय पसरून बसतील. फार तर फोन, लॅपटॉप...जेवतील की झोपले. आपसातला संवादच संपलाय. मुलं लहान असताना घरात कसं चैतन्य असे. पण ती मोठी झाली, मोबाइल, आयफोन वगैरे आले अन् घर अगदी भकास झालं. घरातल्या बाईलाही इतर सदस्यांनी तिच्याशी बोलावं, काही शाब्दिक देवाण घेवाण करावी असं वाटतं हे यांना का कळू नये?

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...