कथा * कुमुद भोरास्कर

आज प्रथमच अनुभाला जाणवलं की नेहमी मैत्रिणीमध्ये किंवा बहिणीप्रमाणे वागणाऱ्या तिच्या आईचं अन् अनिशा काकूचं वागणं काही तरी वेगळं वाटतंय. अनिशा काकू जरा टेन्शनमध्ये दिसत होती.

आईनं वारंवार तिला विचारलं, तेव्हा तिनं जरा बिचकतच सांगितलं, ‘‘माझा चुलतभाऊ सलील इथं टे्निंगसाठी येतो आहे. तशी त्याची राहण्याची व्यवस्था त्यांच्या कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्ये केलेली आहे, पण सुट्टीच्या दिवशी सणावाराला तो इथं येईल.’’

‘‘तर मग इतकी काळजीत का आहेस तू? नाही आला तर आपण त्याला गाडी पाठवून बोलावून घेऊ.’’ शीतलनं, अनुभाच्या आईने उत्साहात म्हटलं.

‘‘काळजीचीच बाब आहे शीतल वहिनी. माझ्या आईनं मला फोनवर समजावून सांगितलं आहे, तुझ्या घरात तुझ्या तरूण पुतण्या आहेत, त्यांच्या मैत्रीणी घरी येतील जातील. अशावेळी सलीलसारख्या तरूण मुलाचं तुझ्या घरी येणं बरोबर नाही...’’

‘‘पण मग त्याला ‘येऊ नको’ हे सांगणं बरोबर आहे का?’’

‘‘तेच तर मला समजत नाहीए...म्हणूनच मी काळजीत आहे. मी असं करते, सलीलला आल्या आल्याच सांगेन की निक्की अन् गोलूचा जसा तू मामा आहेस, तसाच अनुभा अजयाचाही मामा आहेस...म्हणजे अगदी प्रथमपासून तो या नात्यानं या तरूण मुलींकडे बघेल...’’ अनिशानं म्हटलं.

‘‘सांगून बघ. पण हल्लीची तरूण मुलं असं काही मानत नाहीत,’’ आता शीतलच्याही सुरात काळजी होती.

‘‘असं करूयात का? सलील येईल तेव्हा मी त्याला माझ्या खोलीतच घेऊन जाईन. म्हणजे घरात इतरत्र त्याचा वावर नकोच!’’ अनिशानं तोडगा काढला.

‘‘बघ बाई, तुला जसं योग्य वाटेल तसं कर, एवढंच बघ की सलीलचा अपमान होऊ नये अन् त्याला आपलं वागणं गैर वाटू नये...शिवाय काही वावगंही घडू नये.’’ शीतल अजूनही काळजीतच होती.

अनुभानं हे सर्व ऐकलं अन् ठरवलं की ती स्वत:च सलीलपासून दूर राहील. सलील आला की ती सरळ आपल्या खोलीत जाऊन बसेल म्हणजे काकूला अन् आईला उगीचच टेन्शन नको.

अमितकाकाच प्रथम सलीलला घरी घेऊन आला होता. सगळ्यांशी त्याची ओळख करून दिली. मग अनुभाशी ओळख करून देताना त्यानं म्हटलं, ‘‘अनु, हा तुझाही मामाच आहे हं. पण तुम्ही जवळपास एकाच वयाचे आहात, तेव्हा तुमच्यात मैत्री व्हायला हरकत नाही.’’

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...