कथा * मीरा शिंदे

माझे पती आशिष, त्यांचा मित्र गगन अन् त्याची पत्नी गायत्री. आम्हा चौघांत असलेलं सामंजस्य, परस्परांवर असलेला विश्वास अन् आदर अन् एकमेकांवरची माया हे इतकं अद्भूत होतं की सर्वांना आमचा हेवा वाटायचा. आम्हाला दोन मुलं होती. एक मुलगा, एक मुलगी. गगन, गायत्रीला मात्र मूलबाळ नव्हतं.

बऱ्याच प्रयत्नांनी गायत्रीला दिवस गेले. आम्ही सर्वच आनंदात होतो. पण तिला झालेलं मूल जन्मत: अनेक विकृती घेऊन आलं होतं. अन् जन्मानंतर काही वेळातच ते मूल मरण पावलं. गायत्री हॉस्पिटलमध्ये आयसीयूत होती. आशिष ऑफिसच्या दौऱ्यावर होते. पूर्णपणे कोसळलेल्या गगनला मी सांभाळत होते अन् आमच्याही नकळत ती घटना घडून गेली. निसर्गाने आपलं काम बजावलं अन् संकर्षणचा जन्म झाला. मला दिवस गेल्याचं लक्षात येताच मी आशिषना म्हटलं, ‘‘आपल्या अनवधनामुळे जन्माला येणारं हे बाळ आपण गायत्री, गगनला देऊया का आपली दोन मुलं आहेतच!’’ आशिषना माझ्या कल्पनेचं कौतुक वाटलं. आई असून मी मैत्रीसाठी त्याग करते आहे असं त्यांना वाटलं. तर आपलं मूल मी गायत्रीला देते आहे यामुळे तीही भारावून गेली. खरं काय ते मी अन् गगन जाणत होतो...तेवढी एक घटना सोडली तर आमच्यात त्यानंतरही अगदी पूर्वीप्रमाणे निखळ निर्मळ मैत्रीचं नातं होतं

कधी तरी माझ्या मनात अपराधीपणाची भावना दाटून यायची. नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला दूर लोटल्याची भावना अन् आशीषसारख्या सज्जन पतीपासून घडलेली घटना लपवण्याची भावना. पण यातच सर्वांचं भलं होतं. गगन गायत्री संकर्षण मिळाल्यामुळे खूप समाधानी अन् आनंदात होते. सगळं कसं छान चाललेंल अन् एक अपघात घडला.

संकर्षण दहा वर्षांचा होता. गगन गायत्री अन् संकर्षण केरळच्या प्रवासाला जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला. गायत्री जागेवरच मरण पावली. गगनला खूप जखमा अन् फ्रॅक्चर्स होती. गंभीर परिस्थितीत होता तो अन् चमत्कारिकरित्या संकर्षण बचावला होता. त्याला एक ओरखडाही उमटला नव्हता.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सब्सक्राइब करें

डिजिटल + 24 प्रिंट मैगजीन

(1 साल)
USD79
 
सब्सक्राइब करें
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...