कथा * कुमुद भटनागर

‘‘गाडीचा स्पार्क प्लग तर धड लावता येईना अन् म्हणे यांना इंजिनियर व्हायचंय...’’ साहिलला लेकावर डाफरताना बघून रहिलला हसायला आलं.

‘‘यात हसण्यासारखं काय आहे?’’ आता साहिल अजून वैतागला.

‘‘काही नाही. सहजच एक जुनी आठवण आली. या वर्षी दिल्लीच्या ख्यातनाम स्वाइन सर्जन डॉ. गुलाम रसूलला पद्मविभूषण मिळालंय ना, तो लहानपणी आमच्या शेजारी रहायचा. एकदा त्यांचा स्वयंपाकी आला नव्हता. त्याच्या आईनं त्याला मासळी कापून दे म्हणून म्हटलं. त्याला काही ते जमणारं नव्हतं, थरथरत्या हातात मासळी घेऊन तो माझ्या घरी आला अन् ही कापून स्वच्छ करून दे म्हणून मला गळ घालू लागला. गयावया करत होता...आज इतका यशस्वी सर्जन झालाय.’’

‘‘एकदम इतका फरक कसा काय पडला?’’

‘‘कुणास ठाऊक...नंतर माझ्या अब्बूची तिथून बदली झाल्यामुळे आमचा त्या कुटुंबाशी संबंधंच उरला नाही. नंतर परत लखनौला आल्यावर भेट झाली, तेव्हा कळलं तो पी.एम.टी. ची तयारी करतोय. त्याचं इंग्रजी कायम कच्चं होतं. त्यामुळे आमची भेट होताच त्यानं माझी मदत मागितली.’’

‘‘अन् तू ती केलीस?’’

‘‘हो ना, लहानपणापासून मी त्याला मदत करतेय. इंग्रजीत मदत मिळाल्यावर त्याला पी.एम.टीमध्ये चांगले मार्क मिळाले अन् लखनौ मेडिकल कॉलेजात प्रवेशही मिळाला. तरीही इंग्रजीची त्याला धास्ती वाटायची. म्हणून रोज माझा अभ्यास सांभाळून मी त्याला इंग्रजी अन् इंग्रजीतून संभाषण करायला शिकवायचे.’’

तेवढ्यात फोनची घंटी वाजली अन् हे संभाषण तिथंच संपलं. आज त्याच संभाषणाचा धागा पकडून साहिल रहिलाला म्हणत होता की तिनं त्याच्या बॉसच्या कुटुंबाबरोबर दिल्लीला जावं अन् डॉ. रसूलच्या ओळखीच्या बळावर ताबडतोब अपॉइंटमेंट घेऊन बॉसचं ऑपरेशन करवून घ्यावं.

साहिलचे बॉस म्हणजे जनरल मॅनेजर राजेंद्र यांना फॅक्टरीत अपघात झाला होता. त्यांच्या मणक्यांना गंभीर इजा झाली होती. डॉक्टरांनी लवकरात लवकर तज्ज्ञ सर्जनकडून ऑपरेशन व्हायला हवं असं सांगितलं होतं. थोडाही उशीर घातक ठरला असता. जन्मभराचं पंगुत्त्व आलं असतं.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...