मिश्किली * नरेश कुमार

पहाटे कूस बदलून हात लांबवला तर उशी हातात आली. याचा अर्थ सौ. सकाळीच उठली होती. दिवसाची सुरूवात रोमँटित झाली म्हणजे छान वाटतं. सौ. कुठं असेल असा विचार करत असतानाच स्वयंपाकघरातून खमंग वास आला. मी स्वयंपाकघरात आलो. सौ. ओट्यावर गरमागरम पराठे करत होती. मी मागून जाऊन तिच्या गळ्यात हात टाकले. तशी मला झिडकारत ती म्हणाली, ‘‘पुरे हो, मुलांना उठवा. शाळा आहे त्यांना. म्हातारपणी कसला रोमांस करताय.’’

मीही अजूनही त्याच मूडमध्ये होतो. मी बोलून गेलो, ‘‘अगं म्हातारपण शरीराचं असतं. तू म्हातारी शरीरानं झाली आहेस. पण मनात तरूण राहा ना. ओ मेरी जोहराजबी, तुझे मालम नहीं...तू अभी तक है हसीन और मैं, जवान...अगं. यंग फॉर एव्हर थेरेपी करून तर बघ.’’

‘‘तर तर? तुम्ही आहात सदाबहार तरूण आणि रोमँटिक...मी तर झालेच ना म्हातारी, अन् सौंदर्यही गेलं लयाला. संसाराचा रामरगाड्यात पिचतेय मी. तरूण आणि सुंदर कशी राहणार होते? अन् ही कुठली थेरेपी काढली आहे? रोमँटिक बनायची की तरूण दिसायची?’’

‘‘अगं, हा फॉर्मुला ट्राय करून बघ. एकदम बार्बी डॉलसारखी सुंदर अन् आकर्षक दिसायला लागशील,’’ मी तिला मिठीत घेत म्हटलं.

तेवढ्यात मुलं उठून स्वयंपाकघरात आली. आम्हाला तशा अवस्शेत बघून गोंधळली. मीसुद्धा सौ.ला सोडून बाथरूममध्ये गीझर ऑन करायला धावलो.

बायकांना, कुणी मावशी किंवा म्हातारी म्हटलेलं अजिबात खपत नाही. चुकून रिक्षावाल्यानं किंवा भाजीवाल्यानं असा उल्लेख केला तर त्याची धडगत नसते. पण सौ.ने स्वत:च, स्वत:चा उल्लेख म्हातारी असा केला, तेव्हा मात्र मला खूपच आश्चर्य वाटलं. तिला दिलासा द्यावा म्हणून मी म्हटलं, ‘‘तू फॉरएव्हर यंग दिसलं पाहिजे. म्हणजे वय वाढलं तरी ते तिथंच थांबलंय असं वाटलं पाहिजे. मग बघ, तूसुद्धा रोमँटिक गाणी गायला लागशील.’’

‘‘पण आता वाढलेलं वय कमी कसं दिसणार? घरातली कामं संपली तर ना इतर काही करता येईल? तुम्ही तर मला सतत स्वयंपाकघरातच अडकवून ठेवलंत. लग्नाला पंधरा वर्षं होताहेत अन् मी पन्नाशीची दिसायला लागलेय. शरीर बघा केवढं थुलथुलीत झालंय...’’ वाढलेला पोटाचा घेर दाखवत सौ. म्हणाली.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...