कथा * सोनाली बढे

सकाळी राघव ऑफिसला जायला निघाला, तेव्हा त्याचं लक्ष कॅलेंडरकडे गेलं. आजची तारीख बघितली अन् मनात काहीतरी खळ्ळकन् फुटलं. आज नऊ जानेवारी. त्याच्या एकटेपणाला आज एक वर्ष पूर्ण झालं होतं.

जुई त्याच्या आयुष्यातून निघून गेली. त्याला एक वर्ष झालं. जुई त्याची पत्नी. म्हणायला त्यांचं नातं आजही होतं. कायेदशीर दृष्टीनं ती दोघं पतीपत्नी होती. पण नातं फक्त नावालाच होतं. जुई आता त्याच्याजवळ राहत नव्हती. हे नातं टिकवण्यासाठी राघवनं प्रयत्न केला नव्हता. जुईनंदेखील कायेदशीर घटस्फोट घेतला नव्हता.

मनात घोंघावणाऱ्या वादळानं आता राघव पार अवस्थ झाला होता. आपली ऑफिस बॅग, लॅपटॉप अन् मोबाइल त्यानं खोलीतल्या टेबलावर ठेवला. काम करणाऱ्या शांती मोलकरणीला ‘एक कप कॉफी कर’ असं सांगून तो आपल्या कपाटाकडे वळला. त्यात निळ्या रंगाचं एक पाकीट होतं. पाकिटावर अत्यंत सुबक अक्षरात ‘राघव’ असं लिहिलं होतं. जुईचं सुंदर अक्षर हे तिचं एक वैशिष्ट्य होतं.

‘‘राघव या कोऱ्या कागदांवर आज मी माझी व्यथा मांडायचा प्रयत्न करते आहे. खरं तर लिहिताना माझे हात कापताहेत. हे पत्र तुला मिळेल तेव्हा मी तुझ्या आयुष्यातून निघून गेलेली असेल. तुझं हे बेगडी जीवन मला सोसत नाहीए. फक्त जाण्यापूर्वी काही गोष्टी तुला सांगाव्यात असं वाटतं. काल मला पुन्हा तेच भीतिदायक स्वप्न पडलं. तू मला तुझ्या ऑफिसच्या कुठल्यातरी पार्टीला घेऊन गेला आहेस. ओळखीच्या काही लोकांशी नमस्कार वगैरे झाल्यावर काही जुजबी गप्पा मी मारते अन् बघता बघता सर्वांच्या चेहऱ्यावर विकृत, खुनशी हास्य उमटतं.

बघता बघता ते हास्य गडगडाटात बदललं. सगळेच ओरडायला, किंचाळायला लागतात. त्या सगळ्या घाबरून टाकणाऱ्या आवाजातच मला तुझा चेहरा दिसतो. खूपच भीतिदायक...चेहऱ्यावर कमालीची घृणा, डोळ्यात क्रौर्य, डोक्यावर दोन शिंग, तू जणू यमदूत दिसतो आहेस. मी घाबरून किंचाळते. जागी होते तेव्हा जानेवारीच्या थंडीतही मी घामानं चिंब भिजलेली असते. मी या स्वप्नाबद्दल तुझ्याशी बोलले तेव्हा ‘तू तुझ्या डोक्यात भलतंच काही असतं, म्हणून तुला अशी स्वप्न पडतात असं सांगून उडवून लावलं होतंस. खरी गोष्ट ही आहे की तुझ्यामुळेच माझ्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. त्यातून हे स्वप्नं मला पुन्हा:पुन्हा पडत होतं.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...