* पूनम अहमद
कोरोना, तुला माझ्या देशाबद्दल काहीच माहिती नाही. आम्ही तुला नुसत्या शेणानेही पळवून लावू शकतो. तू येथे येऊन एका गृहिणीवर अन्याय केला आहेस. जेव्हा माझ्या मुलाच्या शाळेत तु याबाबत भीती निर्माण होत होती तेव्हा मी फेशियल करत होते.
पती अमित दौऱ्यावर होते. माझा मोबाइल वाजला. तसा तर मी तो उचलणार नव्हते, पण शाळेचे नाव पाहून मला तो उचलावाच लागला. मेसेज आला होता की, तुमच्या मुलाला घेऊन जा. त्यावेळी मला एवढा मोठा धक्का बसला की, मी तुला खूपच वाईटसाईट बोलले. कारण, त्यानंतर आमची किटी पार्टी होणार होती. टिश्यू पेपरने चेहरा पुसल्यानंतर मी बंटीला आणण्यासाठी त्याच्या शाळेत गेले. तर वाईट बातमी ऐकायला मिळाली. शाळा बंद झाल्या आहेत. तुम्ही बंटीला ओळखत नाही. त्याला सुट्टी म्हणजे माझ्या डोक्याला ताप. त्याच्या कलेने वागावे लागते.
अमित जेव्हा बाहेरून गाणे गुणगुणत येतात तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की, मी सावध राहिले पाहिजे, कारण असे काहीतरी घडलेले असते जे अमितला खूप आवडले आहे, पण माझ्यासाठी ते डोईजड ठरणार आहे. नेमके तसेच झाले. तुला याबाबत लिहिताना माझ्या डोळयात अश्रू तरळले आहेत, कारण अमितच्या कार्यालयातील सर्वांना पुढील ३ महिन्यांसाठी वर्क फ्रॉम होम दिले आहे. नवऱ्याच्या वर्क फ्रॉम होमचा त्रास किती असतो, ते गृहिणीला विचारा.
तर मग वर्क फ्रॉम होम सुरू झाले. याचा अर्थ अमित आता आरामात उठतील, त्यांच्या चहा-नाश्त्याची वेळ निश्चित नसेल. म्हणजे आता माझे मॉर्निंग वॉक गेले तेल लावत... बंटी आणि अमित दिवसभर असा ताप देतील की विचारूच नका. बंटीची शाळा कदाचित काही दिवसांनंतर उघडेलही, पण अमित ३ महिने ते ही घरून काम? लॅपटॉप सतत उघडाच असेल. रमाबाईने केलेल्या साफसफाईला अमित सतत नावे ठेवत राहतील. माझ्या चांगल्या दिनक्रमावर सतत टिका करत राहतील. मध्येच चहा बनिवण्याचे फर्मान येईल. बाजारातून काही आणायला सांगितले तर, ‘घरातून काम करणे अवघड आहे,’ हा टोमणा ठरलेलाच.