मिश्किली * डॉ. अरुणा शास्त्री

अहो मॅडम, हो, तुम्हालाच म्हणतेय मी... हल्ली आम्ही बाईसाहेब, माईसाहेब वगैरे न म्हणता सरळ मॅडमच म्हणतो. काही जणी म्याडम म्हणतात. तर मॅडम, तुमची हिम्मत कशी झाली मला मोलकरीण, कामवालीबाई, भांडी घासणारी, धुणंभांडी करणारी वगैरे म्हणायची? मला हाक मारताना माझ्या नावाने अन् प्रेमाने हाक मारायची नाही तर सरळ मेड सर्व्हंट किंवा मेड म्हणायचं. नीट लक्ष देऊन ऐकून घ्या. मी मोलकरीण किंवा कामवाली नाही. जिथे काम करायला जाते तिथे राणीच्या रूबाबात राहाते. मोलकरीण तर कुणी मला म्हणूच शकत नाही. कुठल्याही नोकरीची पत्रास मी बाळगत नाही. मनात येईल तेव्हा तुमची टुकार नोकरी मी सोडू शकते. गरज तुम्हाला आहे माझी...मला नाही. वाट्टेल तेवढी कामं मिळतात मला. एक घर सुटलं तर दहा घरं असतात जी मला हातोहात उचलतात. ठेवायचं तर ठेवा, नाही तर मी चालले...मै चली, मै चली...ला ला ला. लाला ला...

कामं मी माझ्या मर्जींने आणि माझ्या अटींवर करते हे तुम्ही विसरायच नाही हं, मॅडम. मला कामावर ठेवाल तेव्हा वेळेचं बंधन मला घालायचं नाही. मी काही तुमच्यासारखी किंवा साहेबांसारखी ऑफिसात काम करत नाही जिथे वेळेत पोहोचणं कंपलसरी असतं. मी आरामात माझ्या घरातली कामं करून, मग नटूनथटून कामावर येते. म्हणून ‘उशीर केला, वेळेवर आली नाहीस’ वगैरे कटकट करायची नाही...कळलं?

एक गोष्ट अजून ऐकून घ्या. माझ्याकडे माझा मोबाइल आहे. त्यावरून मी कुणाशीही, कितीही वेळ, केव्हाही अन् कधीही बोलेन. तुम्ही त्यावर आक्षेप घ्यायचा नाही, की कामं खोळंबली आहेत, ही गप्पा मारते, असं बडबडायचं नाही.

त्याशिवाय मला जेव्हा वाटेल तेव्हा, जितक्या वेळा वाटेल तितक्या वेळा हवा तेवढा म्हणजे दीड दोन कप चहा लागतो. त्याशिवाय माझं हातपाय चालत नाहीत. कडक अन् गोडगट्ट चहा घेताना मला कुणी हटकलेलं खपत नाही.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...