- कथा प्राच भारद्वाज

रचना वरकरणी शांतपणे घरकाम आटोपत असली तरी मनात प्रचंड वादळ घोंघावत होतं. तिला शारीरिकदृष्ट्या काहीच त्रास नव्हता, पण मन मात्र रक्तबबांळ झालं होतं. ओठांवर नेहमीचं स्निग्ध हसू ठेऊनच ती वावरत होती, पण एकुलता एक लाडक्या लेकीच्या, त्यातून अगदी एवढ्यातच लग्न झालेल्या लेकीच्या आयुष्यात आलेल्या या भूकंपानं मनातून तीसुद्धा हादरलीच होती. फक्त नवरा अन् लेक यांना काही कळू नये म्हणून हास्याचा मुखवटा घालून होती.

रचनानं अलीकडेच पेपरला वाचलं होतं, ‘‘हनीमूनहून परतल्याबरोबर नवविवाहित जोडपी सरळ घटस्फोटाचीच मागणी करतात. अशा तऱ्हेच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होते आहे.

खरं तर हनीमूनला गेल्यावर जेव्हा दोघंच सतत एकमेकांबरोबर असतात, तेव्हा त्यांना एकमेकांच्या गुणदोषांची जाणीव होते. मुलांमध्ये तशीही सहनशीलता कमी असते. पण समाजानं ते गृहीत धरलंय. समजूतीची, तडजोडीची अपेक्षा अर्थात्च वधूकडून जास्त असते. पण आता बदललेल्या काळात मुलीही तेवढ्याच असहिष्णू अन् तापटपणे वागू लागल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रात त्या पुरुषांची बरोबरी करतात, प्रसंगी अधिक चांगला परफॉर्मन्स देतात तर मग त्यांनी तडजोड का म्हणून करायची?

पेपरला असं वाचणं अन् आपल्याच घरात असं काही घडणं यात फार फरक असतो. रचनाला त्यामुळेच धक्का बसला होता.

तिनं अन् सुधीरनं खूप थाटात अन् धूमधडाक्यानं आपल्या एकुलत्या एका मुलीचं लग्न करून दिलं होतं. सगळं अगदी रीतसर, विधीवत केलं होतं. किती पाहुणे, नातलग, इष्टमित्र, परिचित लग्नाला आले होते. व्याहीदेखील तोलामोलाचे होते. लतिका अन् मोहन जवळजवळ एक वर्ष कोर्टशिपमध्ये होते. त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण केली गेली होती. संगीत, मेंहदी, प्रत्येक प्रसंगाला नामवंत बॅण्ड अन् गाणारी मंडळी बोलावलेली. लग्नालाही प्रत्येक क्षेत्रातली बडी बडी मंडळी हजेरी लावून गेली होती. लतिका अन् मोहित खूप आनंदात होते. लेटेस्ट डिझाइनचे पोषाख, दागिने, जेवायला पारंपरिक अन् परदेशी असे मिळून शंभर एक पदार्थ...काही म्हणता काही उणीव नव्हती त्या समारंभात.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सब्सक्राइब करें

डिजिटल + 24 प्रिंट मैगजीन

(1 साल)
USD79
 
सब्सक्राइब करें
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...