कथा * पौर्णिमा अत्रे

कवितानं मनगटावरच्या घड्याळात बघितलं. सहा वाजत आलेले बघून ती दचकली. कपिलची ऑफिसातून परतायची वेळ झाली होती. खरं तर त्यांची भिशी पार्टी आटोपली होती, पण अजून गप्पा संपत नव्हत्या. कुणालाच घरी जाण्याची घाई नव्हती.

आपली पर्स उचलून कविता म्हणाली, ‘‘मी निघते, सहा वाजून गेलेत.’’

डोळे वटारून नीलानं म्हटलं, ‘‘तुला कसली एवढी घाई झालीये? नवराबायको दोघंच तर आहात. घरी सासू, नणंद वगैरे कुणीही नाही...माझ्या घरी बघ, मी घरी पोहोचेन तेव्हा सासू संतापानं लाल झालेली दिसेल...अन् मग बंबार्डिंग सुरू करेल. पण त्यासाठी मी माझा आत्ताचा आनंद थोडीच घालवणार आहे.’’

‘‘नाही तर काय? कविता तू इतकी घाई नको करूस. आपण रोज रोज थोडीच भेटतो?’’ अंजलीनं म्हटलं.

‘‘खरंय गं! पण कपिल येतच असतील.’’

‘‘तर काय झालं? नवरा आहे, सासू थोडीच आहे? जाऊयात ना थोड्या वेळानं.’’

कविता बसली खरी, पण सगळं लक्ष कपिलच्या येण्याकडेच लागलेलं. आज     दुपारी नेमकी ती टीव्हीवर येत असलेला एक जुना मराठी सिनेमा बघत बसली. सगळी कामं तशीच राहिली आहेत अन् मग ही भिशी पार्टी...हॉल पसरलेला, बेडरूममध्येही पसारा...

भिशीच्या पार्टीत मजा तर येतेच. खूप दिवसांनी सगळ्या समवयस्क मैत्रिणी भेटतात. छान छान गप्पा, छान छान खाणंपिणं...पण हे सगळे आपलं घर अगदी व्यवस्थित आवरून घराबाहेर पडलं तरच एन्जॉय करता येतं. या क्षणी तिला फक्त घरातला पसारा दिसत होता.

तिला आता तिथं बसवेना. ताडकन् उठली. ‘‘मी निघतेच, मला घरी कामं आहेत,’’ ती म्हणाली.

‘‘अगं, घरी गेल्यावर कर ना? इतकी काय घाई करते आहेस? घरी काय सासू, आजे सासू हातात काठी घेऊन उभ्या आहेत का?’’ वैतागून सीमानं म्हटलं, ‘‘अशी घाबरते आहे, जशी घरी सासवांची फौज आहे.’’

कवितानं फक्त हसून मान डोलावली अन् ती सर्वांना बाय करून तिथून निघाली. घर फार काही लांब नव्हतं. पायीच जाऊयात, सकाळी फिरणंही झालं नाहीए असा विचार करून ती भरभरा चालायला लागली. मैत्रिणींचं बोलणं आठवून तिला हसू येत होतं. सगळ्या म्हणत होत्या, ‘‘घरात सासू, आजेसासू, चुलतसासू, आत्तेसासू, मामेसासू अशा अनेक सासवा असतात कुणाकुणाला, पण नवरे सासू ऐकलीये कधी कुणी? तिला पुन्हा हसायला आलं. तिच्या घरात नवरेसासू आहे. तिचं लग्न झालं, तेव्हा सगळ्या मैत्रिणींना केवढी असूया वाटली होती.’’

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...