कथा * माधव गवाणकर

निखिल ड्रयव्हर असला तरी स्मार्टबॉय होता. आधी ‘हेवी’ वाहन चालवत होता, पण गावाकडून शहराकडे जाताना घाटरस्ते लागायचे. जागरण घडायचं. बॉडी उतरू लागली. मग बिपीनकडे ते काम सोपवून तो रीनाकडे नोकरीला लागला. तिचा आधीचा ड्रायव्हर व्यसनी होता. रीनाला निर्व्यसनी ड्रायव्हर हवा झाला. निखिल शाळेत असल्यापासून जिम करायचा. त्यामुळे तंदुरूस्त दिसायचा. त्याच्या चालण्यातला, बोलण्यातला रूबाबही रीनाला आवडला. तिचा नवरा आता परदेशात सेटल झाला होता. रीनालाही तिकडेच बोलावलं होतं. मात्र, निखिल तिला ‘मित्रासारखा’ वाटू लागल्यावर तिने त्यालाही परदेशी येऊन त्यांच्याबरोबर राहण्याची गळ घातली. ती त्याला लाडाने ‘निक’ म्हणू लागली. निकला पैशांची फार गरज होती. त्यामुळे घरच्या माणसांचा तसा विरोध असतानाही त्याने ती नोकरी स्वीकारली. ‘मी तीन वर्षांनी परत आलो की लग्न करतो, नक्की!’ असं आश्वासन घरी देऊन टाकलं. ‘निक’ नशीब वगैरे मानत नव्हता. अशी संधी परत मिळणार नाही याची त्याला कल्पना होती.

परदेशी गेल्यावर तिथले काही रहदारीचे वेगळे नियम त्याने जाणून घेतले. तिकडच्या भाषेतले शब्द व्यवहारापुरते शिकू लागला. आपला मुलगा दुसऱ्या देशात भरपूर कमाई करतो याचा गर्व हळूहळू इकडे त्याच्या गावातील आईलाही वाटू लागला.

हळूहळू रीना निखिलला लाडेलाडे नको ती कामं सांगू लागली. त्याच्या भरदार शरीराचं कौतुक करू लागली. ‘माझा नवरा माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे. शोभत नाही तो मला. कदाचित तो ‘गे’ असेल. कारण तरूण मुलांचे त्याला इंडियात असताना सारखे फोन यायचे. तू मला तो घरी नसताना ‘सुख’ दे, मला आता तूच नवऱ्यासारखा आहेस असं रीनाने स्पष्टच सांगितलं. निखिलच्या मनात अशी कोणतीही वाईट भावना नव्हती. शिवाय रीना त्याच्यापेक्षा वयाने मोठी होती. निखिलला आवडणारी एक मुलगी प्रथमी त्याच्या गावातच राहायची. तो भारतात आल्यावर तिलाच मागणी घालणार होता. तिचं कॉलेज शिक्षण सुरू होतं. रीनाला त्याने स्पष्ट नकार दिला. ती त्याच्याशी लगट करू लागताच तिला त्याने ‘मॅडम प्लीज असं करू नका. मी फक्त जॉबसाठी इथं आलोय,’ असं म्हणत मागे ढकळलं. त्यांची झटापट झाली. रीना त्याला बेडवर खेचत होती, पण तसा अत्याचार होण्यापूर्वीच निखिलने झटकन बेडरूमबाहेर पडून दाराला बाहेरून कडी घातली. रीना त्याला फार वाईट अपशब्द बोलत होती. ‘तू माझ्या नवऱ्याच्या लायकीचा आहेस. त्याच्याबरोबर झोप तू. तू पण गे आहेस. तुला लाज वाटत नाही...’ म्हणत रीना दारावर लाथा मारती होती. निखिलने झटपट मिळतील ते कपडे बॅगेत भरले. पगार नुकताच झाला होता म्हणून काही रक्कमच त्याच्याकडे होती. घर सोडून फोन स्विच ऑफ करून तो घराच्या बाहेर पडला, पण जाणार कुठे? आता त्याच्याकडे कार नव्हती. हॉटेलात जेवण तर मिळालं, पण रात्र कुठे काढणार? हॉटेलचे दर परवडणारे नव्हते.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...