कथा * आशा ताटके

‘‘नेहा, खूप दमलोय गं! एक कप गरमागरम चहा अन् त्याच्यासोबत झणझणीत कांदा भजी देशील का? जरा लवकर...फास्ट!’’ राजननं येताच सोफ्यावर पाय पसरून जवळजवळ लोळणच घेतली.

कसंनुसं हसत नेहानं राजनला पाण्याचा ग्लास दिला अन् ती त्याच्या शेजारीच बसली. ‘‘चहा अन् भजी करते मी, पण थोडा वेळ लागेल. भराभर नाही होणार आज.’’

‘‘का? सगळं ठीक आहे ना?’’ जरा नाराज होत राजननं विचारलं.

‘‘गेले काही दिवस मला थकवा वाटतोय. थोडी विश्रांती घ्यावीशी वाटतेय.’’

नवऱ्याची नाराजी जाणवल्यामुळे नेहानं अगदी थोडक्यात आपली अडचण सांगितली. गेली इतकी वर्षं तेच तर करतेय ती...समस्या कोणतीही असो, कुणाचीही असो, ती सोडवणं हे नेहाचं काम होतं. सगळं सुरळीत झाल्यावरच ती राजनला सांगायची. त्याच्यावर कुठल्याही तऱ्हेचा ताण येऊ नये हाच तिचा प्रयत्न असायचा. त्यातच तिचं सुख सामावलेलं असायचं.

‘‘ठीक आहे, माझी नाजूक राणी, भजी नाही तर नाही, चहासोबत निदान बिस्किटं तर देशील?’’ राजननं टोमणा दिला अन् नेहाकडे अजिबात लक्ष न देता तो फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला.

नाजूक नेहाच्या मनाच्या आरशावर जणू काही दगड मारला असं वाटलं तिला. खळकन् मनाचा आरसा फुटला. पण नाजूक असली तरी गेली पंधरा वर्षं ती हा संसार एकटीनं सांभाळतेय. लहान मोठी कित्येक कामं परस्पर करते ती. त्यामुळे त्याची आच किंवा त्याचा त्रास राजनपर्यंत पोहोचत नाही. टपटपणारा बाथरूमचा नळ कधी नीट झाला, बंद पडलेला पंखा कधी फिरायला लागला, बाथरूममधलं छताचं लीकेज कसं थांबलं याचा राजनला पत्ताही लागत नसे. मुलांचं संगोपन, बँकेची, पोस्टाची, विम्याची कामं सगळं तिच तर बघते आहे. बाजारहाट, वाणसामान, विजेची, पाण्याची बिलं भरणं इतकं व्यवस्थित होतंय ते तिच्यामुळेच ना?

एवढंच नाही तर लहान मुलांच्या ट्यूशन्स करून ती घरबसल्या थोडा फार पैसाही मिळवत होती.

नवरा अन् मुलांच्या सुखासाठी तिनं आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं. स्वत:ला पार विसरली होती ती. राजन जेव्हा तिला झाशीची राणी किंवा राणी चेनम्मा म्हणायचा, तेव्हा तिला स्वत:चाच अभिमान वाटायचा. या संसाराची ती राणी होती, हेच तिचं सुख होतं. त्यासाठी स्वत:च्या इच्छांचा, आवडीचा त्याग करावा लागला याचंही तिला काही फार वाईट वाटत नव्हतं. त्याबद्दल तिनं कधी तक्रार केली नव्हती. पण आज तिला फार वाईट वाटलं. तिला थकवा वाटतोय. अशक्तपणा जाणवतोय त्याची थोडीसुद्धा काळजी राजनला वाटू नये? स्वत:ला कमी समजणं ही तिची चूकच होती.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...