कहानी के बाकी भाग पढ़ने के लिए यहां क्लिक करें

(शेवटचा भाग)

कथा * पूनम अहमद

पूर्व कथा :

मुंबईतल्या मुस्लिम बहुल वस्तीतल्या शौकतअली अन् आयेशा बेगमला तीन मुली अन् एक मुलगा अशी चार अपत्यं होती. सना, रूबी, हिबा या तीन मुलींवर झालेला मुलगा हसन आईच्या अतोनात लाडामुळे बिघडलाच होता. आईला वाटे दर्ग्याजवळ बसणाऱ्या जमाल बाबामुळे हसनला धर्माच्या चार गोष्टी शिकता येतील. तंत्रमंत्र चमत्कार करून जमालबाबा लोकांची फसवणूक करत होता. पण भोळ्या लोकांना काहीच संशय येत नव्हता. हळूहळू हसन बदलत होता. स्वत:च्या सख्ख्या बहिणींकडे तो वाईट नजरेनं बघत होता. लग्न होऊन बहिणी सासरी गेल्या. शिक्षण पूर्ण होऊन हसनला नोकरी लागली. चांगली बायकोही मिळाली. आता त्याला नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा होता. त्यासाठी तो बहिणींकडे कर्ज म्हणून पैसे मागत होता. त्यांचे दागिने तरी त्यांनी द्यावे म्हणून त्यांच्यावर दबाव आणत होता.            - आता पुढे वाचा..

त्या रात्री सगळेच काळजीनं ग्रासले होते. झोपायला गेल्यावरही कुणाला झोप येईना. हिबानं बहिणीला विचारलं, ‘‘बाजी, कसला विचार करते आहेस? हसननं तर भलतंच संकटात टाकलंय आपल्याला. माझे दागिने मी त्याला कशी देऊ? सासूबाई, सासरे, नवरा सगळ्यांना विचारावं लागेल...त्यांना काय वाटेल? अन् न दिले तर हा काय करेल ते सांगता येत नाही...’’

‘‘तेच तर गं? काय करावं काही समजत नाहीए. आईचा चेहरा तर बघवत नाहीए. तिच्यासाठी तरी असं वाटतं की हसनला थोडी मदत करावी. अब्बूंनी जरी नाही म्हटलं तरी मी रशीदशी या बाबतीत बोलेन म्हणतेय.’’

दुसऱ्या दिवशी रशीद अन् जहांगीर आले तेव्हादेखील हसनचा मूड चांगला नव्हताच. त्या दोघांनी त्याला हसवायचा, बोलतं करण्याचा प्रयत्न केला, पण तो गुश्श्यातच होता. बहिणींनी त्यांना खूण करून गप्प बसायला संगितलं, मग त्यांनीही विषय फार ताणला नाही.

दोघी बहिणी आपापल्या कुटुंबासोबत त्यांच्या घरी निघून गेल्या. शौकतनं हसनला बोलावून घेतलं अन् प्रेमानं म्हणाले, ‘‘बाळा, ही चूक करू नकोस, चांगली नोकरी मिळाली आहे. नियमित पैसा मिळतोय...बिझनेसचा ना तुला अनुभव आहे ना पैसा आहे...हे खूळ डोक्यातून काढून टाक.’’

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...