मिश्किली * मधु गोयल
‘‘तुम्ही प्रेसच्या कपडयांमध्ये अंडरवेअरदेखील दिली होती काय?’’ शिखाने तिचा पती शेखरला विचारले.
‘‘बहुधा... चुकून कपडयांसोबत गेली असावी,’’ शेखर म्हणाला.
‘‘प्रेसवाल्याने तिचेदेखील रुपये ५ लावले आहेत. आता असे करा की उद्या अंडरवेअर घालाल तेव्हा त्यावर पँट घालू नका. रुपये ५ जे लागले आहेत,’’ शिखा म्हणाली.
‘‘तू पण ना... नेहमी विनोदाच्या मूडमध्येच असते. कधीकधी तू सिरीयसही होत जा.’’
‘‘अहो, मी तर आहेच अशी... म्हणूनच आजही वयाच्या ५० व्या वर्षीही कुणीही माझ्याशी लग्न करेन.’’
मुलगी नेहा म्हणाली, ‘‘बाबा, तू माझ्यासाठी व्यर्थ मुलगा शोधत आहेस... आईचे लग्न लावून द्या. तसेही मला लग्न करायचे नाहीए.’’
शेखरने विचारले, ‘‘का मुली?’’
‘‘पपा, मी आतापर्यंत जे आयुष्य जगले आहे त्यात असेच जाणवले आहे... लग्न करून मी माझे स्वातंत्र्य गमावणार आहे... लग्न एक बंधन आहे आणि मी बंधनात बांधली जाऊ शकत नाही. मी याबद्दल माझ्या आईशी सर्व काही सामायिक करेन,’’ नेहाने स्पष्ट उत्तर दिले.
तेवढयात शेखरची नजर दारावर पडली. एक कुत्रा घुसला होता. शेखर शिखाला म्हणाला, ‘‘तू बाहेरचा दरवाजाही नीट बंद केला नाहीस. बघ कुत्रा आत आला.’’
‘‘अहो, जरा व्यवस्थित तर बघत जा, हा कुत्रा नाही, कुत्री आहे. बहुधा तुम्हांला भेटायला आली असेल. भेटून घ्या. मग तिला बाहेरचा मार्ग दाखवा,’’ शिखा म्हणाली.
‘‘तू तर सदैव माझ्या पाठीच लागून राहतेस,’’ शेखर रागाने फणफणत म्हणाला.
शिखा त्वरित उत्तरली, ‘‘तुमच्या पाठी नाही लागणार तर मग काय शेजाऱ्याच्या पाठी लागणार? तेही तुला आवडणार नाही आणि असे तर होतच आले आहे की पती पुढे-पुढे आणि पत्नी मागे-मागे,’’ शिखाने पटकन् उत्तर दिले.
‘‘बरं, सोड मी तुझ्याशी जिंकू शकत नाही.’’
‘‘लग्न हीदेखील एक लढाई आहे. तुम्ही त्यात मला जिंकूनच तर आणले आहे. हाच सर्वात मोठा विजय आहे... अशी पत्नी शोधूनही मिळणार नाही,’’ असे शिखा म्हणाली.
‘‘बरं सोड, आपले गुण खूप गाऊन झालेत तुझे. आता माझे ऐक,’’ शेखर म्हणाला.